AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA 2nd Test: अखेरच्या दिवशी टीम इंडिया जिंकणार, चेतेश्वर पुजाराने सांगितली रणनीती

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरची सेंच्युरियन कसोटी जिंकल्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताची स्थिती अत्यंत वाईट झाली आहे. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 240 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बुधवारी 2 बाद 118 धावा केल्या, त्यामुळे ते विजयाच्या अगदी जवळ आले आहेत.

IND vs SA 2nd Test: अखेरच्या दिवशी टीम इंडिया जिंकणार, चेतेश्वर पुजाराने सांगितली रणनीती
Cheteshwar Pujara
| Edited By: | Updated on: Jan 06, 2022 | 10:54 AM
Share

जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरची सेंच्युरियन कसोटी जिंकल्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताची स्थिती अत्यंत वाईट झाली आहे. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 240 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बुधवारी 2 बाद 118 धावा केल्या, त्यामुळे ते विजयाच्या अगदी जवळ आले आहेत. मात्र, भारताचा दिग्गज फलंदाज चेतेश्वर पुजाराला विश्वास आहे की, भारत या स्थितीतून पूर्णपणे बाहेरच येणार नाही तर चौथ्या दिवशी विजयदेखील मिळवू शकतो. (India vs South Africa 2nd test : Cheteshwar Pujara reveals 4th day plan, says first hour in important)

चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दक्षिण आफ्रिकेचा संघ विजयापासून 122 धावांनी मागे होता. त्यावेळी कर्णधार डीन एल्गर 46 धावांवर आणि रॉसी व्हॅन डर ड्युसेन 11 धावांवर खेळत होते. भारताकडून शार्दुल ठाकूर आणि रविचंद्रन अश्विनने प्रत्येकी एक विकेट घेतली. पुजाराच्या (Cheteshwar Pujara) मते, सामन्याच्या चौथ्या दिवसाचा पहिला तास खूप महत्त्वाचा असणार आहे.

चौथ्या दिवसाचा पहिला तास महत्त्वाचा

तिसर्‍या दिवसाचा खेळ संपल्यानंतर चेतेश्वर पुजारा पत्रकार परिषदेला सामोरा गेला, त्यावेळी पुजारा म्हणाला की, ‘खेळपट्टीवर जड रोलर ज्या पद्धतीने चालवले जात होते, त्यावरुन लक्षात येईल की खेळपट्टी सपाट झाली आहे. खेळपट्टीला पडलेल्या भेगा पुन्हा दिसू लागतील, पण त्यासाठी तासाभराचा खेळ व्हावा लागेल. तासाभरानंतर खेळपट्टीवर अनइव्हन बाऊन्स नक्कीच असेल. अशा परिस्थितीत आम्ही सुरुवातीचा एक तास सावधपणे खेळणे आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.याशिवाय पुजाराने दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरची विकेट खूप महत्त्वाची असल्याचे सांगितले.

विराट कोहली केप टाऊन कसोटी खेळण्याची शक्यता

पाठीच्या दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याला मुकलेला कर्णधार विराट कोहली पूर्वीपेक्षा चांगला असून तो लवकरच पूर्ण तंदुरुस्त होईल, असे चेतेश्वर पुजाराने बुधवारी सांगितले. पुजारा म्हणाला, ‘अधिकृतपणे मी यापेक्षा जास्त खुलासा करू शकत नाही, पण तो (कोहली) आता निश्चितच चांगल्या स्थितीत आहे आणि मला वाटते की तो लवकरच फिट होईल.’ पाठदुखीमुळे कोहली दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडला आहे. केएल राहुलकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सुरु असलेल्या कसोटी सामन्यात कर्णधार राहुलने नाणेफेकीच्या वेळी सांगितले होते की, 11 जानेवारीपासून केपटाऊनमध्ये होणाऱ्या तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यापर्यंत कोहली फिट होण्याची शक्यता आहे. पुजारा म्हणाला की, टीम फिजिओच कोहलीच्या फिटनेसची नेमकी स्थिती सांगू शकतात.

इतर बातम्या

कसोटीचा निकाल आज लागणार पण कोणाच्या बाजूने? भारतीय बॉलर्स ‘तो’ खतरनाक स्पेल टाकतील?

IPL 2022 च्या मेगा ऑक्शन संदर्भात येऊ शकते एक वाईट बातमी

IND vs SA: दक्षिण आफ्रिकेचं जोरदार प्रत्युत्तर, भारतीय गोलंदाज ठरले निष्प्रभ

(India vs South Africa 2nd test : Cheteshwar Pujara reveals 4th day plan, says first hour in important)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.