IND vs SL : श्रीलंकेचा फलंदाज कोरोनाच्या विळख्यात, संपूर्ण संघ विलगीकरणात, भारत श्रीलंका सामने धोक्यात

भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळवण्यात येणाऱ्या क्रिकेट सामन्यांवर एकामागून एक संकट येतच आहे. आधी सपोर्ट स्टाफमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर आता श्रीलंका संघातील एका फलंदाजालाच कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आ

IND vs SL : श्रीलंकेचा फलंदाज कोरोनाच्या विळख्यात, संपूर्ण संघ विलगीकरणात, भारत श्रीलंका सामने धोक्यात
श्रीलंकन क्रिकेटपटू सँडुन वीराक्कोडी
Follow us
| Updated on: Jul 10, 2021 | 5:00 PM

कोलंबो : भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील सामने कोरोनाच्या संकटामुळे पुढे ढकलण्याचा निर्णय शनिवारी (10 जुलै) घेण्यात आला. त्यामुळे 13 जुलैला सुरु होणारी एकदिवसीय मालिका 18 जुलैला सुरु करण्यात येणार आहे. एकीकडे वेळपत्रकात बदल झाला असतानाच आता खेळाडूंनाच कोरोनाची बाधा झाल्याची माहितीही समोर येत आहे. श्रीलंकान मीडियाने दिलेल्या माहितीनुसार बायो-बबल असतानाही एका खेळाडूला कोरोनाची बाधा झाली आहे. त्याला सध्या विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. (India vs Sri Lanka Series Under Corona Attack Sri lankan Batsman Sandun Weerakkodi Tested Positive)

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसा, श्रीलंकेचे क्रिकेटपटू हे दोन वेगवेगळ्या बायो-बबलमध्ये विलगीकरणात आहेत. एका बबलमधील खेळाडूला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्या बबलमधील त्याच्या संपर्कात आलेल्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. श्रीलंकेच्या ‘न्यूजवायर.एलके’ या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार कोरोनाची बाधा झालेल्या खेळाडूचे नाव सँडुन वीराक्कोडी (Sandun Weerakkodi) असे असून तो श्रीलंका संघासाठी 3 वनडे सामने खेळला आहे.

कोलंबोमधील स्क्वॉडमध्ये होता सँडुन

श्रीलंका क्रिकेट संघ नुकताच इंग्लंड दौऱ्यावरुन परतला यावेळी सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यावेळी संघाचे फलंदाजी प्रशिक्षक ग्रँट फ्लॉवर आणि जी. टी. निरोशान यां दोघांची कोरोना टेस्ट पॉजीटिव्ह आली. त्यामुळेच संपूर्ण श्रीलंका संघाला विलगीकरणात ठेवण्यात आले होते. यात काही खेळाडू कोलंबो आणि काही दांबुला या ठिकाणी बायो-बबलमध्ये होते. दरम्यान सँडुन हा कोलंबोतील संघासोबत विलगीकरणात होता आणि त्याची कोरोना चाचणी पॉजिटिव्ह आली असल्याने संपूर्ण संघाला विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. दरम्यान 18 तारखेपासून सामने सुरु होण्यापूर्वी श्रीलंकेचा एक संघ संपूर्णपणे तंदुरुस्त होऊन सामने खेळण्यासाठी सज्ज झाल्यास सामने वेळेत सुरु होतील अन्यथा या संपूर्ण मालिकेवरच संकट ओढावले आहे.

वेळापत्रकात बदल

श्रीलंका दौऱ्यावर 13 जुलै रोजी पहिला एकदिवसीय सामना खेळवला जाणार होता. पण कोरोनाच्या शिरकावामुळे आता श्रीलंका दौऱ्याच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. आता पहिला एकदिवसीय सामना 18 जुलैला खेळवला जाणार आहे.

असे असेल नवे वेळापत्रक

  • पहिला एकदिवसीय सामना – 18 जुलै
  • दुसरा एकदिवसीय सामना –  20 जुलै
  • तिसरा एकदिवसीय सामना – 23 जुलै
  • पहिला टी-20 सामना –  25 जुलै
  • दुसरा टी-20 सामना –  27 जुलै
  • तिसरा टी-20 सामना –  29 जुलै

हे ही वाचा :

मोठी बातमी : भारत आणि श्रीलंका सामन्यांच्या वेळापत्रकात बदल, ‘या’ दिवशीपासून सुरु होणार सामने, बीसीसीआयने दिली माहिती

भारत-श्रीलंका मालिकेपूर्वीच ‘हा’ दिग्गज घेतोय निवृत्ती, 90 टेस्‍ट आणि 218 वनडे खेळलेल्या खेळाडूची मोठी घोषणा

Sri Lanka Tour : भारतीय संघाचा सराव जोमात सुरु, आपआपसांत सामना खेळून रणनीती मजबूत करण्याचे काम सुरु, पाहा फोटो

(India vs Sri Lanka Series Under Corona Attack Sri lankan Batsman Sandun Weerakkodi Tested Positive)

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.