अरेच्चा! इशांत शर्मा आणि हनुमा विहारीकडून गडबडीत चूकीचं ट्विट, चूक कळताच केलं डिलीट

भारताचे आघाडीचे कसोटीस क्रिकेटपटू हनुमा विहारी आणि इशांत शर्मा हे दोघेही इंग्लंडच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी गडबडीमध्ये एक चूकीचं ट्विट केलं.

अरेच्चा! इशांत शर्मा आणि हनुमा विहारीकडून गडबडीत चूकीचं ट्विट, चूक कळताच केलं डिलीट
इशांत शर्मा आणि हनुमा विहारीने केलं चूकीचं ट्विट

लंडन : सर्व भारतीयांची नजर जपानमध्ये सुरु असलेल्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic 2021) आहे. शनिवारी मीराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक मिळवत भारताचं खातं खोललं. त्यानंतर अजूनपर्यंत टोक्योमध्ये भारताला पदक मिळालं नसलं तरी हंगेरी इथे वर्ल्ड कॅडेट चॅम्पियनशिपमध्ये भारताची कुस्तीपटू प्रिया मलिकने (Priya Malik) सुवर्णपदक मिळवलं आहे. दरम्यान या विजयानंतर अनेकांना हे पदक ऑलम्पिकमध्येच मिळालं असल्याचा समज झाला. अनेकांनी तशा शुभेच्छाही सोशल मीडियावर दिल्या. भारतीय क्रिकेटपटू इशांत शर्मा आणि हनुमा विहारी यांच्याकडून पण अशीच चूक झाली.

कुस्तीपटू प्रिया मलिकने वर्ल्ड कॅडेट चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकलं.दरम्यान ऑलम्पिक स्पर्धाही सुरु असल्याने अनेकांना प्रियाने ऑलम्पिकमध्येच पदक मिळवलं असं वाटलं.इशांत शर्मा आणि हनुमा विहारी यांनीही प्रियाला टोक्यो ऑलिम्पकमध्ये पदक मिळाल्याबद्दल अभिनंदन असं ट्विट केलं. पण त्यांना त्यांची चूकी कळताच त्वरीत त्यांनी संबधित ट्विट डिलीटं केलं.

hanuma vihari tweet

हनुमा विहारी ट्विट

 

Ishant Sharma tweet

इशांत शर्मा ट्विट

75 किलोग्राम वर्गात प्रियाने जिंकल सुवर्णपदक

प्रिया मलिकने हंगेरीच्या बुडापेस्ट येथे सुरु असलेल्यावर्ल्ड कॅडेट चॅम्पियनशिपमध्ये (World cadet wrestling championship)  75 किलोग्राम वजन गटात सुवर्णपदक पटकावलं आहे. प्रियाने बेलारूसच्या कुस्तीपटूला 5-0 च्या फरकाने पराभूत करत हे सुवर्ण पदक मिळवलं आहे.

इशांत, विहारी इंग्लंडमध्ये

भारतीय संघ सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. 4 ऑगस्टपासून भारत आणि इंग्लंड (India vs England) या दोन्ही संघात  सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी दोन्ही संघ कसून सराव करत आहेत. इशांत शर्मा आणि हनुमा विहारी हे सुद्धा संघासोबत सराव करत आहेत. इशांत WTC Final च्या सामन्यात भारतीय संघामध्ये होता. पण विहारीला त्यावेळी जागा देण्यात आली नव्हती. आता संघातील सलामीवीर शुभमन गिलसह काही खेळाडूंना दुखापत झाली आहे. त्यामुळे विहारीला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेचे वेळापत्रक

पहिली कसोटी, 4 ते 8 ऑगस्ट

दुसरी कसोटी, 12 ते 16 ऑगस्ट

तिसरी कसोटी, 25 ते 29 ऑगस्ट

चौथी कसोटी, 2 ते 6 सप्टेंबर

पाचवी कसोटी, 10 ते 14 सप्टेंबर.

अशी आहे टीम इंडिया :

विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर (दुखापतग्रस्त), जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव. केएल राहुल आणि वृद्धिमान साहा

राखीव खेळाडू : अभिमन्यू इश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान (दुखापतग्रस्त) आणि अर्जान नाग्वासवाला.

हे ही वाचा

भारताला मिळालं सुवर्णपदक, कुस्तीपटू प्रिया मलिकचं वर्ल्ड कॅडेट चॅम्पियनशिपमध्ये यश

श्रीलंकेतून थेट इंग्लंडमध्ये, सूर्यकुमार यादवला निरोप, आणखी दोन खेळाडू इंग्लंडविरुद्ध मैदानात उतरणार?

IND vs ENG : भारताविरुद्ध मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, चार दिग्गज खेळाडूंचे पुनरागमन

(Indian Cricketer hanuma vihari and ishant sharma mistakenly tweeted congratulating priya malik for Olympic Gold later deleted it)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI