AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs Ireland : भारताच्या आयर्लंडवरील विजयामुळे पाकिस्तानच स्वप्न मोडलं, जाणून घ्या कसं

IND vs IRE T20 WC : भारताने विजय मिळवून पाकिस्तानला धक्का दिला. सोमवारी हरमनप्रीत कौरच्या भारतीय महिला क्रिकेट टीमने पाकिस्तानला आणखी एक झटका दिला.

India vs Ireland : भारताच्या आयर्लंडवरील विजयामुळे पाकिस्तानच स्वप्न मोडलं, जाणून घ्या कसं
pakistan womens cricket teamImage Credit source: pcb
| Updated on: Feb 21, 2023 | 7:46 AM
Share

IND vs IRE T20 WC : क्रिकेट विश्वात भारत आणि पाकिस्तान या दोन परंपरागत कट्टर प्रतिस्पर्धी टीम आहेत. दोन्ही टीम्स परस्पराविरुद्ध द्विक्षीय सीरीज खेळत नाहीत, पण आयसीसी टुर्नामेंट्स आणि एशिया कप सारख्या टुर्नामेंटमध्ये दोन्ही टीम्स आमने-सामने येतात. सध्या दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या आयसीसी टी 20 वर्ल्ड कपमध्ये दोन्ही टीम्समध्ये सामना झाला होता. भारत आणि पाकिस्तानचा पहिलाच सामना परस्पराविरुद्ध होता. यात भारताने विजय मिळवून पाकिस्तानला धक्का दिला. सोमवारी हरमनप्रीत कौरच्या भारतीय महिला क्रिकेट टीमने पाकिस्तानला आणखी एक झटका दिला. पाकिस्तानच स्वप्न मोडलं, असं म्हटलं तरी चालेल.

टीम इंडियाने किती रन्स केल्या?

भारतीय महिला टीमने सोमवारी आयसीसी महिला टी 20 वर्ल्ड कपमध्ये आयर्लंड विरुद्ध ग्रुप स्टेजमधला शेवटचा सामना खेळला. सेमीफायनल प्रवेशासाठी भारताला हा सामना जिंकण आवश्यक होतं. भारताने डकवर्थ लुइस नियमांतर्गत हा सामना 5 धावांनी जिंकला. सेमीफायनलमध्ये टीम इंडियाने प्रवेश केला. भारताने पहिली बॅटिंग केली. 6 विकेट गमावून 155 धावा केल्या. आयर्लंडच्या टीमने 8.2 ओव्हर्समध्ये 2 विकेट गमावून 54 धावा केल्या. त्याचवेळी पाऊस सुरु झाला. आयर्लंडची टीम नियमाच्या हिशोबाने भारतपेक्षा 5 धावांनी पिछाडीवर होती. पावसामुळे सामना पुन्हा सुरु होऊ शकला नाही. त्यामुळे भारताला विजयी घोषित केलं. भारताने सेमीफायनलमध्ये प्रवेश करुन पाकिस्तानच स्वप्न मोडलं.

View this post on Instagram

A post shared by ICC (@icc)

ग्रुप 2 मधून पहिलं सेमीफायनलच तिकीट कोणाला?

भारत-आयर्लंडमधील या मॅचकडे पाकिस्तानचे डोळे लागले होते. कारण या मॅचच्या निकालावर पाकिस्तानच टुर्नामेंटमधील पुढील भवितव्य ठरणार होतं. ग्रुप 2 मधून भारताच्या आधी इंग्लंड टीमने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता. पाकिस्तानचा रविवारी वेस्ट इंडिज विरुद्ध सामना झाला. या मॅचमध्ये पाकिस्तानचा पराभव झाला. नेट रनरेटमध्ये भारतापेक्षा पाकिस्तान सरस

पाकिस्तानचा सेमीफायनल प्रवेश भारत-आयर्लंड सामन्यावर अवलंबून होता. आयर्लंडने भारताला हरवल्यास पाकिस्तान टीमच्या सेमीफायनलच्या आशा जिवंत रहाणार होत्या. आय़र्लंड जिंकल्यास पाकिस्तानच्या मंगळवारी इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या सामन्याला महत्त्व प्राप्त होणार होतं. पाकिस्तानने इंग्लंडला हरवल्यास त्यांना सेमीफायनलच तिकीट मिळणार होतं. नेट रनरेटमध्ये भारतापेक्षा पाकिस्तानची बाजू सरस होती. या सगळ्या जर-तरच्या खेळावर पाकिस्तानच वर्ल्ड कप विजयाच स्वप्न अवलंबून होतं.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच