IPL 2021 Final: चेन्नई फॅन्सचा आनंद गगनात मावेना, केकेआरला मात देत चौथ्यांदा कोरलं ट्रॉफीवर नाव

कोरोनाच्या संकटामुळे स्थगितीच्या अडचणीत सापडल्यानंतरही अखेर आयपीएलचं 14 वं पर्व पार पडलं. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या सामन्यांमध्ये फायनपर्यंत कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपरकिंग्स या संघानी मजल मारली. ज्यानंतर अंतिम सामन्यात चेन्नईने केकेआरला 27 धावांनी मात देत विजय मिळवला.

IPL 2021 Final: चेन्नई फॅन्सचा आनंद गगनात मावेना, केकेआरला मात देत चौथ्यांदा कोरलं ट्रॉफीवर नाव
सीएसके संघाची अप्रतिम गोलंदाजी
Follow us
| Updated on: Oct 16, 2021 | 12:21 AM

IPL 2021 Final: इंडियन प्रिमीयर लीग अर्थात आयपीएल (IPL) या जगप्रसिद्ध क्रिकेट लीगचं 14 वे पर्व (IPl 2021) नुकतेच पार पडले. अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि चेन्नई सुपरकिंग्स (CSK) हे संघ आमने-सामने होते. काही ओव्हर्स अगदी सामना चुरशीचा होईल असं वाटतं असतानाच चेन्नईच्या गोलंदाजानी दमदार कमबॅक करत सामना एकहाती जिंकला.

चेन्नईने ठेवलेल्या 193 धावांचे आव्हान पूर्ण करण्यासाठी केकेआरने सुरुवात तर चांगली केली होती. सलामीवीर गिल आणि अय्यर यांनी दमदार सुरुवात केली खरी पण 91 धावांवर अय्यरची विकेट पडली आणि संघाला उतरती कळाच लागली. शार्दूलने एका षटकात अय्यर आणि राणाची विकेट घेतली आणि त्यानंतर संघातील सर्व खेळाडू एकामागोमाग एक बाद होत गेले. ज्यानंतर सामना चेन्नईने अप्रतिम गोलंदाजीच्या जीवावर 27 धावांनी जिंकला.

फाफची धमाकेदार खेळी

सामन्यात नाणेफेक जिंकत केकेआरचा कर्णधार इयॉन मॉर्गनने गोलंदाजीचा निर्णय़ घेतला. ज्यामुळे चेन्नईला प्रथम फलंदाजी करावी लागली. दरम्यान आजही सीएसकेची सलामीवीरांची जोडी ऋतुराज गायकवाड आणि फाफ डुप्लेसीस यांनी संघाला उत्तम सुरुवात करुन दिली. पण 31 धावा करताच गायकवाडला सुनील नारायणने आपल्या जाळ्यात अडकवलं. पण ऋतुराज बाद झाल्यानंतरही फाफने आपली झुंज कायम ठेवली.

त्याला सोबत रॉबीन उथप्पाने साथ दिली. उथप्पाने 15 चेंडूत 3 षटकार ठोकत 31 धावा केल्या. पण सुनीलच्या फिरकीच्या जादूवर तो पायचीत झाला. ज्यानंतरही फाफने आपली खेळी सुरुच ठेवली. शेवटच्या चेंडूवर शिवमच्या बोलिंगवर फाफ बाद झाला. पण तोवर त्याने 59 चेंडूत 7 चौकार आणि 3 षटकार खेचत 86 धावा केल्या होत्या. अखेरच्या षटकात त्याला मोईन अलीने नाबाद 37 धावांची साथ दिली. त्याने 20 चेंडूत 2 चौकार आणि 3 षटकार ठोकले. अशाप्रकारे चेन्नईने महत्त्वाच्या सामन्यात केकेआरसमोर 193 धावांचे लक्ष्य ठेवले.

सीएसकेचं अप्रतिम कमबॅक

सीएसकेने ठेवलेल्या 193 धावांचा पाठलाग केकआरने अतिशय वेगात सुरु केला. दोन्ही सलामीवीर गिल आणि अय्यर यांनी अप्रतिम फलंदाजी केली. 10 षटकापर्यंत एकही विकेट गेला नव्हता. अय्यरने तर अर्धशतकही झळकावलं होतं. पण 11 व्या षटकात शार्दूने सेट फलंदाज अय्यरला (50) बाद करत पहिला झटका दिला. त्याच षटकात राणाही शून्य धावांवर बाद झाला. त्यानंतर पाहता पाहता संघाचे फलंदाज बाद होत गेले. शुभमन गिलचं (51) अर्धशतक पूर्ण झालं खरं पण तोही लगेचच बाद झाला. अखेरच्या काही षटकात मावी (20) आणि फर्ग्यूसन (18) यांनी डाव सावरायचा प्रयत्न केला. पण तोवर फाळ वेळ झाली होती. ज्यामुळे अखेर चेंडू शिल्क न राहिल्याने केकेआर 27 धावांनी पराभूत झाली. चेन्नईकडून शार्दूलने 3, जाडेजा आणि हेजलवुड यांनी प्रत्येकी 2 तर दीपक आणि ब्राव्हो यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतला.

हे ही वाचा

T20 World Cup 2021 मध्ये पाकिस्तानची पहिली लढत भारताशी, सामन्याच्या काही दिवस आधीच संघाला मोठा झटका

ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू मॅक्सवेलची गर्लफ्रेंड भारतीय वंशाची, लवकरच लग्नबंधनात अडकणार, पाहा PHOTO

पंचांच्या निर्णयाआधीच पव्हेलियनकडे परतणारी पूनम राऊत म्हणते, ‘हा खेळ आहे, युद्ध नाही’

(IPL 2021 Final in CSK vs KKR match Chennai Superkings Won match with 27 runs and Kolkata knight riders dream to win third title breakes)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.