Glenn Maxwell | ग्लेन मॅक्सवेलचा धमाका, 2016 नंतर झळकावलं अर्धशतक

Glenn Maxwell | ग्लेन मॅक्सवेलचा धमाका, 2016 नंतर झळकावलं अर्धशतक
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या ग्लेन मॅक्सवेलने (glenn maxwell) सनरायजर्स हैदराबाद (sunrisers hyderabad) विरुद्धच्या सामन्यात 59 धावांची शानदार (scored 59 runs) अर्धशतकी खेळी केली.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या ग्लेन मॅक्सवेलने (glenn maxwell) सनरायजर्स हैदराबाद (sunrisers hyderabad) विरुद्धच्या सामन्यात 59 धावांची शानदार (scored 59 runs) अर्धशतकी खेळी केली.

sanjay patil

|

Apr 14, 2021 | 10:26 PM

चेन्नई | रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यात आयपीएलच्या 14 व्या मोसमातील (IPL 2021) 6वा सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यात बंगळुरुचा आक्रमक अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने (Glenn Maxwell) शानदार अर्धशतकी खेळी केली आहे. मॅक्सवेलच्या या अर्धशतकाच्या जोरावर बंगळुरुने हैदराबादला विजयासाठी 150 धावांचे आव्हान दिले आहे. (ipl 2021 srh vs rcb glenn maxwell scored 59 runs against sunrisers hyderabad in ma chidambaram stadium at chennai)

ग्लेनचे 2016 नंतर अर्धशतक

मॅक्सवेल आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. एकहाती सामना फिरवण्यात त्याचा हातखंडा आहे. पण तो गेल्यास काही वर्षांपासून अपयशी ठरत होता. मात्र ग्लेनला हैदराबाद विरुद्धच्या या सामन्यात सूर गवसला. ग्लेनने 2016 नंतर पहिल्यांदा आयपीएलमध्ये अर्धशतक झळकावलं. ग्लेनच्या आयपीएल कारकिर्दीतील हे 7 वं अर्धशतक ठरलं. ग्लेनने एकूण 41 चेंडूत 5 चौकार आणि 3 सिक्ससह 59 धावांची खेळी केली. ग्लेनच्या 59 धावांच्या खेळीच्या जोरावर बंगळुरुला निर्धारित 20 षटकांमध्ये 149 धावांपर्यंत मजल मारता आली.

विराटची 33 धावांची खेळी

ग्लेन व्यतिरिक्त बंगळुरुकडून कर्णधार विराट कोहलीने 33 धावांची खेळी केली. विराट मैदानात सेट झाला होता. मात्र विराटही आऊट झाला. विराटने 29 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 33 धावा केल्या.

14 कोटी 25 लाख

बंगळुरुने या 14 व्या मोसमासाठी ग्लेनला लिलावातून आपल्या ताफ्यात घेतलं. पंजाबने रिलीज केल्यानंतर ग्लेनने त्याची बेस प्राईज 2 कोटी ठेवली होती. मात्र बंगळुरने ग्लेनसाठी 14 कोटी 25 लाख मोजून आपल्या गोटात घेतलं. ग्लेनला आता या मोसमात चांगला सूर गवसला आहे. त्यामुळे या मोसमात ग्लेन आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करेल, अशी आशा बंगळुरुला आहे.

सनरायजर्स हैदराबाद प्लेइंग इलेव्हन : डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), रिद्धिमान साहा, मनीष पांडे, जॉनी बेयरस्टो, जेसन होल्डर, राशिद खान, विजय शंकर, अब्दुल समद, भुवनेश्वर कुमार, टी. नटराजन आणि शहबाज नदीम.

विराटसेनेचे अंतिम 11 खेळाडू : विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडीक्कल, ग्लेन मॅक्सेवेल, एबी डीव्हीलियर्स, शाहबाज अहमद,डॅनियल ख्रिस्टियन, वॉशिंगटन सुंदर, कायले जेमिन्सन, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज आणि युजवेंद्र चहल.

संबंधित बातम्या :

 SRH vs RCB Live Score, IPL 2021 | डेव्हिड वॉर्नर-मनिष पांडेची जोडी जमली, हैदराबाद मजबूत स्थितीत

IPL 2021 : शाहरुख खानच्या माफीवाल्या ट्विटवर आंद्रे रसेलची प्रतिक्रिया, म्हणाला…

(ipl 2021 srh vs rcb glenn maxwell scored 59 runs against sunrisers hyderabad in ma chidambaram stadium at chennai)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें