IPL 2022 DC vs RR: कमरेच्यावर फुलटॉस ‘नो-बॉल’ बद्दल काय आहेत नियम? तिसऱ्या अंपायरचा यात काय रोल असतो? जाणून घ्या…

IPL 2022 DC vs RR: IPL 2022 मध्ये शुक्रवारी राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये (RR vs DC) रोमांचक सामना झाला. राजस्थानने हा सामना जिंकला.

IPL 2022 DC vs RR: कमरेच्यावर फुलटॉस 'नो-बॉल' बद्दल काय आहेत नियम? तिसऱ्या अंपायरचा यात काय रोल असतो? जाणून घ्या...
DC vs RR no ball controversy
दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Apr 23, 2022 | 1:13 PM

मुंबई: IPL 2022 मध्ये शुक्रवारी राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये (RR vs DC) रोमांचक सामना झाला. राजस्थानने हा सामना जिंकला. पण सामन्याच्या अखेरीस जोरदार वाद झाला. शेवटच्या षटकात दिल्लीता विजयासाठी 36 धावांची आवश्यकता होती. राजस्थान रॉयल्सकडून ओबेड मेकॉय गोलंदाजी करत होता. समोर दिल्ली कॅपिटल्सचा रोव्हमॅन पॉवेल फलंदाजी करत होता. पॉवेलने आपल्या फलंदाजीने हा सामना रोमांचक वळणावर नेऊन ठेवला. त्याने पहिल्या दोन चेंडूंवर षटकार ठोकले. तिसऱ्या चेंडूवरही त्याने षटकार ठोकला. पण खऱ्या वादाची सुरुवात इथेच झाली. चेंडू फुलटॉस होता. पॉवेलने चेंडूला थेट सीमारेषेपार पाठवलं. दिल्लीच्या टीमच्या मते हा नो बॉल होता. (No ball Controversy) पण मैदानावरील पंचांनी नो बॉल दिला नाही.

हा नो-बॉल का नाही

नो बॉलवरुन दिल्लीचा संघ पंचांशी हुज्जत घालत होता. पॉवेल आणि कुलदीप मैदानावरील पंचांना हा नो-बॉल का नाही? म्हणून विचारणा करत होते. दिल्लीचे सहाय्यक कोच प्रवीण आमरे सुद्धा मैदानावर पंचांशी बोलण्याासठी आले होते. दिल्लीचा कॅप्टन ऋषभ पंतने खेळाडूंना माघारी पॅव्हेलियनमध्ये बोलावलं होतं.

म्हणून तिसरा पंच इथे हस्तक्षेप करु शकत नाही

या नो-बॉल न देण्यावरही सोशल मीडियावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. कमेरच्या वर चेंडू असल्याने अनेकांच्या मते हा नो-बॉल होता. गोलंदाजी करताना पायाच्या नो-बॉलचा निर्णय तिसऱ्या पंचाचा असतो. मग इथे तिसऱ्या पंचांनी हस्तक्षेप का नाही केला?. या वादात तिसऱ्या पंचाची मदत घेणं, उपयुक्त ठरलं असतं. पण आयपीएलच्या नियमानुसार, विकेट गेला असेल, तरच तिसरा पंच हस्तक्षेप करु शकतो. म्हणजेच पॉवेल इथे आऊट झाला असता, तर तिसऱ्या पंचाला हस्तक्षेप करता आला असता. पण पॉवेल बाद नव्हता. त्यामुळे नियमानुसार, तिसरा पंच इथे हस्तक्षेप करु शकत नाही.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें