IPL 2022: मुंबईचा मुलगा बनू शकतो RCB किंवा KKR चा कॅप्टन

प्रत्येक संघ यंदाच्या सीजनसाठी रणनिती आखत आहे. फक्त चालू मोसमच नाही, तर भविष्याच्या दृष्टीने संघबांधणी करण्याचा प्रत्येक फ्रेंचायजीचा प्रयत्न आहे.

IPL 2022:  मुंबईचा मुलगा बनू शकतो RCB किंवा KKR चा कॅप्टन
file photo
Follow us
| Updated on: Feb 03, 2022 | 5:22 PM

मुंबई: IPL 2022 च्या सीजनसाठी लवकरच मेगा ऑक्शन पार पडणार आहे. प्रत्येक संघ यंदाच्या सीजनसाठी रणनिती आखत आहे. फक्त चालू मोसमच नाही, तर भविष्याच्या दृष्टीने संघबांधणी करण्याचा प्रत्येक फ्रेंचायजीचा प्रयत्न आहे. म्हणूनच आता खेळाडू विकत घेताना, प्रत्येक संघाची काही ना काही रणनिती असणार आहे. परदेशातील नामांकित खेळाडूंप्रमाणे देशातील युवा खेळाडुंसाठीही मोठी बोली लागणार आहे. भारतीय संघातून खेळणाऱ्या मुंबईकर श्रेयस अय्यरवर (Shreyas Iyer) यंदा सर्वात जास्त लक्ष असेल. यंदाच्या सीजनमधला तो सर्वात महागडा खेळाडू ठरु शकतो, असा माजी क्रिकेटपटू आकाशा चोप्रा यांचं मत आहे. श्रेयसवर बहुतांश फ्रेंचायजी बोली लावतील. पण कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) या दोन संघांमुळे श्रेयसला आपल्या संघात घेण्यासाठी प्रामुख्याने चुरस असेल. भावी कर्णधार असाच विचार करुन, या दोन टीम्स श्रेयसवर बोली लावतील.

रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, पॅट कमिन्स, क्विंट डिकॉक, शिखर धवन, फाफ डु प्लेसिस, कागिसो राबाडा, मोहम्मद शमी आणि डेव्हिड वॉर्नर या क्रिकेटपटूंवर सुद्धा मोठी बोली लागू शकते. खांद्याच्या दुखापतीमुळे श्रेयसला IPL 2021 च्या पहिल्या भागामध्ये खेळता आले नव्हते. त्यामुळे ऋषभ पंतला दिल्लीचं कर्णधारपद देण्यात आलं. त्यानंतर श्रेयस अय्यर परतल्यानंतरही ऋषभ पंतच दिल्लीचा कर्णधार होता.

“श्रेयस अय्यर केकेआर आणि आरसीबीचा कर्णधार बनू शकतो. पंजाब त्याचा विचार करणार नाही. अय्यर सर्वात महागडा खेळाडू ठरु शकतो” असे आकाश चोप्रा यांनी त्यांच्या अधिकृत युट्यूब चॅनलवर म्हटलं आहे.

संबंधित बातम्या: Sourav Ganguly: रहाणे-पुजाराची बॅग पॅक करण्याची वेळ झाली, गांगुलीने सांगितलं ‘आता रणजी खेळा’ U19 World Cup: मायकल वॉनला दिसला भारताच्या अंडर 19 टीममध्ये असामान्य खेळाडू, म्हणाला…. Yash Dhull: यश धुलने मैदानाबाहेर लगावलेला ‘हा’ सिक्सर नक्की पाहा, तुम्ही सुद्धा म्हणाल What a hit, पाहा VIDEO

Non Stop LIVE Update
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.