DC vs KKR : Angkrish Raghuvanshi चा धमाका, दिल्ली विरुद्ध वादळी अर्धशतक

Angkrish Raghuvanshi Maiden Fifty : अंगकृष रघुवंशी याने आयपीएलमधील पहिलंवहिलं अर्धशतक हे आपल्या दुसऱ्याच सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध ठोकलं आहे.

DC vs KKR : Angkrish Raghuvanshi चा धमाका, दिल्ली विरुद्ध  वादळी अर्धशतक
Angkrish Raghuvanshi Maiden Fifty,Image Credit source: BCCI/IPL
Follow us
| Updated on: Apr 03, 2024 | 9:49 PM

देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचं प्रतिनिधित्व करणारा आणि आयपीएलच्या 17 व्या हंगामातील सर्वात युवा खेळाडू असलेल्या अंगक्रिश रघुवंशी याने कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध झंझावाती अर्धशतक ठोकलं आहे. अंगक्रिश याने अर्धशतकी खेळी दरम्यान तोडफोड खेळी करत चौफेर फटकेबाजी केली. अंगक्रिशने 25 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 4 चौकारांच्या मदतीने आणि 200 च्या स्ट्राईक रेटने हे अर्धशतक ठोकलं. अंगक्रिशने आयपीएल कारकीर्दीतील पहिलंवहिलं अर्धशतक ठोकलं.  अंगक्रिश कोलकाता नाईट रायडर्ससाठीअर्धशतक करणारा दुसरा युवा फलंदाज ठरलाय.

पहिल्याच डावात अर्धशतक

अंगक्रिशने 29 मार्च रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध आयपीएलमध्ये पदार्पण केलं. मात्र अंगक्रिशला त्या सामन्यात बॅटिंग मिळाली नाही. मात्र त्यानंतर अंगक्रिशने कारकीर्दीतील दुसऱ्या सामन्यात दिल्ली विरुद्ध अर्धशतक ठोकून आपली दखल घ्यायला सर्वांना भाग पाडलंय. अंगक्रिशच्या या खेळीनंतर केकेआरचा मालक आणि अभिनेता शाहरुख खान यानेही थंब दाखवत दाद दिली. अंगक्रिशला अर्धशतकानंतर मोठी खेळी करण्याची संधी होती. मात्र अंगक्रिशला एनरिच नॉर्तजे याने 4 धावांनंतर त्याला रोखण्यात यश मिळवलं. नॉर्तजे याने अंगक्रिशला ईशांत शर्मा याच्या हाती कॅच आऊट केलं. अंगक्रिशने 27 बॉलमध्ये 5 चौकार आणि 3 सिक्ससह 200 च्या स्ट्राईक रेटने एकूण 54 धावांची खेळी केली. अंगक्रिशची आयपीएल कारकीर्दीतील ही सर्वोच्च धावसंख्या ठरली.

17 व्या हंगामातील युवा खेळाडू

अंगक्रिश रघुवंशी आयपीएलच्या 17 व्या मोसमातील सर्वात युवा खेळाडू आहे. अंगक्रिश 19 वर्षांपेक्षा लहान आहे. अंगक्रिशचा जन्म 6 मे 2005 रोजी साली झाली. कोलकाता नाईट रायडर्सने अंगक्रिशला मिनी ऑक्सनमधून 20 लाख रुपयांच्या बेस प्राईजमध्ये आपल्या ताफ्यात घेतलं होतं. तसेच अंगक्रिशने अंडर 19 वर्ल्ड कप 2022 स्पर्धेत चमकदार कामगिरी केली होती.

अंगक्रिशचा अर्धशतकी धमाका

आई-वडीलांकडून टीम इंडियाचं प्रतिनिधित्व

अंगक्रिश याला क्रीडा पार्श्वभूमी आहे. अंगक्रिशला घरातूनच खेळाचे बाळकडू मिळालं. अंगक्रिशचे आई-वडील हे दोघे क्रीडापटू होते. या दोघांनी वेगवेगळ्या खेळात टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं. अंगकृशचे वडील अवनीश यांनी टेनिस आणि आई मलिका यांनी बास्केटबॉलमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. आता त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवत अंगक्रिशने जोरदार सुरुवात केली आहे.

दिल्ली कॅपिट्ल्स प्लेईंग ईलेव्हन : ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, रसिक दार सलाम, एनरिक नॉर्टजे, इशांत शर्मा आणि खलील अहमद.

कोलकाता नाईट रायडर्स प्लेईंग ईलेव्हन : श्रेयस अय्यर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, अंगक्रिश रघुवंशी, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.