Video KKR vs DC : दिल्लीला फोडणाऱ्या रसेलला इशांत शर्माने लोळवलं, व्हिडीओ एकदा पाहाच

Ishant Sharma Bold Andre Russerl Video : आयपीएलमधील केकेआर आणि दिल्ली कॅपिटल्स सामन्यात आयपीएल इतिहासामधील सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड रचला गेला आहे. केकेआरकडून तोडफोड फलंदाजी करणाऱ्या रसेल याला दिल्लीचा वेगवान गोलंदाज याने यॉर्करवर खाली लोळवलं.

Video KKR vs DC : दिल्लीला फोडणाऱ्या रसेलला इशांत शर्माने लोळवलं, व्हिडीओ एकदा पाहाच
ipl 2024 Ishant Sharma Bold Andre Russel video
Follow us
| Updated on: Apr 03, 2024 | 10:41 PM

आयपीएल 2024 मधील 16 वा सामना केकेआर आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये सुरू आहे. या सामन्यामध्ये केकेआरने प्रथम फंलदाजी करताना आयपीएलमधील दुसरी सर्वाधिक धावसंख्या करण्याचा विक्रम रचला. केकेआरने 20 ओव्हरमध्ये 272-7 धावा केल्या. यामध्ये सलामीला आलेल्या सुनील नारायणे याने आक्रमक 85 धावा करत दमदार सुरूवात करून दिली. तो आऊट झाल्यावर अंगकृष्ण रघुवंशी याची 54 धावांची अर्धशतकी खेळी आणि त्यानंतर शेवटला खतरनाक आंद्रे रसेलने अवघ्या 19 बॉलमध्ये 41 धावा करत मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवलं. या सामन्यात दिल्ली कॅपिट्लचा बॉलर इशांत शर्माने रसेलला घातक यॉर्कर टाकत आऊट केलं. यॉर्कर खेळताना रसेल खाली पडला, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पाहा व्हिडीओ:-

आजच्या सामन्यामध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाला सुरूवातील सुनील नारायण याने फोडायला सुरूवात केली. अवघ्या 39 बॉलमध्ये 85 धावा केल्या, यामध्ये तब्बल 7 चौकार आणि 7 षटकार मारले. सुनील नारायण याला मार्श याने आऊट केलं. त्यानंतर दिल्ली आगीमधून फुफाट्यात पडल्यासारखी झाली. कारण युवा अंगकृष्ण रघुवंशी यानेही दिल्लीवर सुरूवातीपासून हल्ला चढवला. अवघ्या 18 वर्षाच्या  रघुवंशीने 27 बॉलमध्ये 54 धावा करत नारायण याने केलेल्या आक्रमक सुरूवातीचा टेम्पो त्याने सुरू ठेवला. आपल्या 54 धावांच्या खेळीमध्ये त्याने 5 चौकार आणि 3 षटकार मारले.

दोघेही परतल्यावर रसेल याने सामन्याची सूत्रे आपल्या हातात घेतली. 19 बॉलमध्ये 41 धावा करत 3 षटकार आणि 4 चौकारांची बरसात केली. केकेआर हैदराबादचा रेकॉर्ड मोडणार असं वाटत होतं. मात्र इशांत शर्माने 20 व्या ओव्हरमधील पहिल्याच बॉलवर यॉर्कर टाकत त्याला माघारी पाठवलं.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, रसिक दार सलाम, एनरिक नॉर्टजे, इशांत शर्मा, खलील अहमद.

कोलकाता नाईट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, अंगकृष्ण रघुवंशी, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.