AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2024, KKR vs RR : जोस बटलरने पुन्हा लढवला किल्ला, राजस्थानने 2 गडी राखून कोलकात्याला केलं पराभूत

आयपीएल 2024 स्पर्धेतील 31 व्या सामन्यात राजस्थानने 2 गडी राखून कोलकात्याला मात दिली. यासह गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली आहे. कोलकाता नाईट रायडर्सने विजयासाठी 224 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान कोलकात्याने 2 गडी राखून पूर्ण केलं.

IPL 2024, KKR vs RR : जोस बटलरने पुन्हा लढवला किल्ला, राजस्थानने  2 गडी राखून कोलकात्याला केलं पराभूत
| Updated on: Apr 17, 2024 | 12:03 AM
Share

आयपीएल 2024 स्पर्धेतील 31व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि कोलकातान नाईट रायडर्स हे संघ आमनेसामने आले होते. हा सामना राजस्थान रॉयल्सने 2 गडी राखून जिंकला. या सामन्यात कोलकात्याचा वरचष्मा पहिल्या डावापासून दिसला होता. सुनील नरीनने शतकी खेळी करत राजस्थानला आधीच बॅकफूटवर ढकलला होतं. सुनील नरीनने 56 चेंडूत 13 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 109 धावा केल्या. कोलकाता नाईट रायडर्सने 20 षटकात 6 गडी गमवून 223 धावा केल्या आणि विजयासाठी 224 धावांचं आव्हान दिलं होतं. पण समोर असलेल्या जोस बटलरने त्यांच्या तोंडातून विजयाचं घास खेचून घेतला. अगदी मोक्याच्या क्षणी राजस्थान रॉयल्सने विकेट्स गमवल्या, तरी जोस बटलरने एकाकी झुंज दिली. जोस बटरलने शतकी खेळीपुढे सुनील नरीनची सेंच्युरी फिकी पडली. जोस बटलरने 60 चेंडूत नाबाद 107 धावा केल्या. यात 9 चौकार आमि 6 षटकार मारले. शेवटच्या चेंडूपर्यंत जोस बटलरने किल्ला लढवला आणि विजय मिळवून दिला. जोस बटलरने आरसीबीविरुद्ध अशीच खेळी केली होती आणि विजय मिळवून दिला होता. तेव्हा विराटची सेंच्युरी फुकट गेली होती. या विजयासह राजस्थान रॉयल्सने गुणतालिकेतील आपलं पहिलं स्थान कायम ठेवलं आहे.

ओपनिंगला आलेल्या यशस्वी जयस्वालकडून अपेक्षा होत्या. मात्र चुकीच्या चेंडूवर फटका मारता विकेट देऊन बसला. त्यानंतर क्रीडाप्रेमींना संजू सॅमसन काहीतरी करेल असं वाटलं होतं. मात्र उंच फटका मारताना शॉट हुकला आणि चेंडू वर चढला. सीमेवर असलेल्या नरीनने कोणतीही चूक न करता झेल पकडला.  12 धावांवर संजू सॅमसनची इनिंग संपली. रियान पराग आणि जोस बटलरने 50 धावांची भागीदारी केली. मात्र हार्षित राणाने रियानला बाद केल्याने राजस्थानला मोठा धक्का बसला. रियान परागने 14 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 34 धावा केल्या. त्यानंतर आलेला ध्रुव जुरेलही काही खास करू शकला नाही आणि बाद झाला. रविचंद्रन अश्विनही काही खास करू शकला नाही 8 धावा करून बाद झाला. त्यानंतर त्याच्या पुढच्याच चेंडूवर शिम्रॉन हेटमायर शून्यावर बाद झाला आणि विजय लांबला. रोवमॅन पॉवेलने आक्रमक खेळी केली आणि 13 चेंडूत 26 धावा केल्या. मात्र सुनील नरीनने त्याला पायचीत केलं.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

कोलकाता नाईट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरीन, आंग्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा.

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, कुलदीप सेन, युझवेंद्र चहल.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.