AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Suryakumar Yadav फिट! मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी

IPL 2024 Mumbai Indians Suryakumar Yadav : मुंबई इंडियन्सच्या गोटातून या क्षणाची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. सूर्यकुमार यादव अखेर फिट झाला आहे.

Suryakumar Yadav फिट! मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी
suryakumar yadav mumbai indians ipl
| Updated on: Apr 03, 2024 | 8:43 PM
Share

आयपीएलच्या 17 व्या मोसमात सलग 3 सामने गमावणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईचा स्टार बॅट्समन सूर्यकुमार यादव अखेर फिट झाला आहे. सूर्याला फिट जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या गोटात आणि चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. तसेच मुंबईची ताकद एका झटक्यात दुप्पट झाली आहे.  मुंबई या हंगामातील आपला चौथा सामना हा दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध 7 एप्रिल रोजी खेळणार आहे. सूर्यकुमार यादव या सामन्यातून कमबॅक करण्याची शक्यता आहे. एकूणच सूर्या फिट झाल्याने सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे.

सूर्यकुमार यादवला एनसीए अर्थात राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने हिरवा सिग्नल देत खेळण्यासाठी फिट असल्याचं जाहीर केलं आहे. सूर्यकुमार यादव दुखापतीमुळे क्रिकेटपासून गेल्या 3 महिन्यांपासून दूर होता. सूर्याला दक्षिण आफ्रिका दौऱ्यात टी 20 मालिकेदरम्यान घोट्याला दुखापत झाली होती. सूर्याला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर दुखापत झाली होती. तेव्हापासून सूर्या मैदानापासून बाहेर होता. सूर्यावर या दरम्यान शस्त्रक्रिया पार पडली. त्यानंतर सूर्याने एनसीए फिट होण्यासाठी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कमबॅकसाठी तयारी केली. त्यानंतर आता सूर्या सज्ज झाला आहे.

बीसीसीआयच्या सूत्रांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार, सूर्याची एकूण 3 वेळा फिटनेस टेस्ट करण्यात आली. सूत्राने दिलेल्या माहितनुसार, “सूर्या आता फिट आहे. सूर्या एनसीएत सराव सामने खेळला. तो मुंबईसोबत जोडला जाऊ शकतो. सूर्या मुंबईसह जोडला जाईल तेव्हा तो 100 टक्के फिट असावा, हे आम्ही निश्चित करु पाहत होतो. सूर्या आयपीएलआधी पहिल्या फिटनेसआधी पूर्णपणे फिट वाटत नव्हता. त्यामुळे आम्ही सूर्याला बॅटिंग करताना त्रास होतोय की नाही? याची प्रतिक्षा करत होतो”.

सूर्यकुमार यादव सज्ज

मुंबई इंडियन्स टीम : हार्दिक पंड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, टीम डेव्हिड, इशान किशन, विष्णू विनोद, नेहल वढेरा, सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, पियुष चावला, श्रेयस गोपाल, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शम्स मुलानी, रोमॅरियो शेफर्ड, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह, जेराल्ड कोएत्झी, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा, नमन धीर, शिवालिक शर्मा, ल्यूक वुड आणि क्वेना माफाका.

निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.