Video : प्लेऑफसाठी पंजाब किंग्स आणि आरसीबीचे फॅन्स सोशल मीडियावर भिडले, सामन्यापूर्वी वातावरण तापलं

आयपीएल 2024 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्स यांचं सर्व गणित जर तर अवलंबून आहे. एक पराभव झाला की जर तर गणितही संपुष्टात येईल. 9 मे रोजी पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सामना होत आहे. या सामन्यात एकाचा पत्ता कापला जाणार आहे.

Video : प्लेऑफसाठी पंजाब किंग्स आणि आरसीबीचे फॅन्स सोशल मीडियावर भिडले, सामन्यापूर्वी वातावरण तापलं
Image Credit source: IPL/BCCI
Follow us
| Updated on: May 08, 2024 | 6:06 PM

आयपीएल 2024 स्पर्धेत एकूण 56 सामने पार पडले आहेत. मात्र अजूनही प्लेऑफचं स्पष्ट होताना दिसत नाही. राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांचं स्थान पक्कं असलं तरी अधिकृतरित्या काही स्पष्ट होत नाही. त्यामुळे प्लेऑफची शर्यत रंगतदार वळणावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे प्रत्येक सामन्याचं महत्त्व वाढलं आहे. आयपीएलमधील 58 वा सामना पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होत आहे. हा सामना धर्मशाळामध्ये होणार आहे. पण या सामन्यापूर्वी पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे चाहते आमनेसामने आले आहेत. पंजाबचा संघ धर्मशाळेत यजमानपद भूषविणार आहे. तसं पाहिलं तर दोन्ही संघांचं प्लेऑफमध्ये पोहोचणं कठीण आहे. मात्र फॅन्सला ही बाब मान्यच होत नाही. दोन्ही बाजूचे फॅन्स प्लेऑफसाठीचं गणित करून बसले आहेत. या सामन्यापूर्वी पंजाब किंग्सच्या चाहत्यांनी कॅलक्युलेशनवरून आरबीची खेचली आहे.

कॉमेडियन आणि अभिनेता जसमीतने एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात पंजाब किंग्सचा फॅन्स असल्याचं दाखवून दोन सायंटिफिक कॅलक्युलेटर मागतो. जेव्हा विचारलं गेलं की दोन कॅलक्युलेटर का हवेत. तेव्हा तो उत्तर देतो की पंजाबसोबत आरसीबीही खेळत आहे. या रीलच्या माध्यमातून पाय खेचण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून येत आहे. जसप्रीतच्या या व्हिडीओने धर्मशाळेतील सामन्यापूर्वी वातावरण तापलं आहे. आता चाहतेही एकमेकांना सोशल मीडियावर खरीखोटी सुनवत आहेत. काही जण तर दोन्ही संघ प्लेऑफमध्ये जाणार नसल्याचं सांगत समजूत काढत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Jasmeet (@duhjizzy)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ 11 पैकी 4 सामने जिंकत सातव्या स्थानी, तर पंजाब किंग्सचंही असंच गणित आहे. पण पंजाब किंग्सच्या तुलनेत आरसीबीचा नेट रनरेट चांगला आहे. दोन्ही संघांचे सध्या 8 गुण असून प्रत्येकी तीन सामने उरले आहेत. या दोन्ही संघांनी तीन पैकी तीन सामने जिंकले तर 14 गुण होतील. पण तरीही प्लेऑफचं गणित जर तर वर अवलंबून असणार आहे. दुसरीकडे, पंजाब विरुद्ध बंगळुरु सामन्यात जो संघ पराभूत होईल. तो संघ बाद होईल. पंजाबचा मागचा सामना चेन्नई सुपर किंग्ससोबत झाला होता. या सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. बंगळुरुने मागच्या तिन्ही सामन्यात विजय मिळवला आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात पंजाबला पराभूत केलं होतं. पंजाब किंग्सने 20 षटकात 6 गडी गमवून 176 धावा केल्या आणि विजयासाठी 177 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान आरसीबीने 6 गडी गमवून 19.2 षटकात पूर्ण केलं होतं.

Non Stop LIVE Update
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ.
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या...
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या....
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.