AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LSG vs PBKS : नाणेफेकीचा कौल जिंकताच श्रेयस अय्यरने निवडली गोलंदाजी, या 11 खेळाडूंना स्थान देत म्हणाला…

Lucknow Super Giants vs Punjab Kings Confirmed Playing XI in Marathi: आयपीएल 2025 स्पर्धेतील 13वा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्स यांच्यात होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल पंजाबच्या बाजूने लागला आणि श्रेयसने प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे.

LSG vs PBKS : नाणेफेकीचा कौल जिंकताच श्रेयस अय्यरने निवडली गोलंदाजी, या 11 खेळाडूंना स्थान देत म्हणाला...
| Updated on: Apr 01, 2025 | 7:08 PM
Share

आयपीएल 2025 स्पर्धेतील 13 वा सामना पंजाब किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात होत आहे.  दोन्ही संघ मागचा सामना जिंकून आले आहेत. लखनौ सुपर जायंट्सचा तिसरा, तर पंजाब किंग्सचा हा दुसरा सामना आहे. त्यामुळे या सामन्याची उत्सुकता आहे. पंजाब किंग्सने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या मैदानावर फार स्कोअर होत नाही. त्यामुळे धावांचा पाठलाग करणं चांगलं राहील. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर श्रेयस अय्यर म्हणाला की, ‘आम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहोत. हे एक नवीन मैदान आहे, नवीन खेळपट्टी आहे म्हणून आपण पाठलाग करणार आहोत. खेळाडूंना स्वतःला व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आहे. तुम्हाला परिस्थितीनुसार खेळावे लागेल, महत्त्वाचे ध्येय जिंकणे आहे. आम्ही गोष्टी सोप्या ठेवण्याचा प्रयत्न करतो. खेळपट्टी कशी खेळणार आहे हे आम्हाला माहित नाही परंतु आम्हाला लवकर जुळवून घ्यावे लागेल. लॉकी संघात येत आहे.’

लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंत याने सांगितलं की, ‘आम्हालाही प्रथम गोलंदाजी करायची होती पण प्रथम फलंदाजी करण्यास आनंद झाला. आम्हाला पाठिंबा देण्यासाठी बरेच लोक आले आहेत, आम्ही निश्चितच आमचे सर्वोत्तम देणार आहोत. आमच्यासाठी कोणताही बदल नाही.’

दोन्ही संघांची प्लेइंग 11

पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), शशांक सिंग, मार्कस स्टॉइनिस, ग्लेन मॅक्सवेल, सूर्यांश शेडगे, मार्को जॅनसेन, लॉकी फर्ग्युसन, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग.

लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): मिचेल मार्श, एडन मार्कराम, निकोलस पूरन, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), आयुष बडोनी, डेव्हिड मिलर, अब्दुल समद, दिग्वेश सिंग राठी, शार्दुल ठाकूर, आवेश खान, रवी बिश्नोई

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.