CSK vs KKR Toss : कोलकाताने टॉस जिंकला, पुणेकर ऋतुराज गायकवाडच्या जागी कुणाला संधी? धोनीचा मोठा निर्णय
Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders Toss : ऋतुराज गायकवाड याला कोपराच्या दुखापतीमुळे आयपीएलच्या 18 व्या मोसमातून बाहेर व्हावं लागलं आहे. त्यामुळे चेन्नईच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल होणार, हे निश्चित होतं.

आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 25 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने आहेत. हा सामना चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. सामन्याला 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर त्याआधी 7 वाजता टॉस झाला. कोलकाताच्या बाजूने टॉस जिंकला. कर्णधार अजिंक्य रहाणे याने फिल्डिंगचा निर्णय घेत होम टीम सीएसकेला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. तर दुसर्या बाजूला आम्हाला बॅटिंगच करायची होती, असं चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने म्हटलं. ऋतुराज गायकवाड याला दुखापतीमुळे या हंगामातून बाहेर पडावं लागलं आहे. त्यामुळे ऋतुराजच्या अनुपस्थितीत महेंद्रसिंह धोनी उर्वरित सामन्यात चेन्नईचं नेतृत्व करणार आहे.
प्लेइंग ईलेव्हनमध्ये कुणाला संधी?
केकेआरने प्लेइंग ईलेव्हनमध्ये एकमेव बदल केला आहे. स्पेन्सर जॉन्सन याच्या जागी ऑलराउंडर मोईन अली याचा समावेश करण्यात आला आहे. कर्णधार अजिंक्य रहाणे याने टॉसनंतर ही माहिती दिली. तर चेन्नईने या सामन्यात बरेच बदल केले आहेत. चेन्नईने 2 बदल केले आहेत. दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर झालेल्या ऋतुराज गायकवाड याच्या जागी राहुल त्रिपाठी याचा समावेश करण्यात आला आहे. तर मुकेश चौधरी याच्या जागी अंशुल कंबोजला संधी देण्यात आली आहे.
दोन्ही संघांचा पाचवा सामना
दरम्यान चेन्नई आणि केकेआरचा हा या मोसमातील सहावा सामना आहे. चेन्नईने विजयी सुरुवातीनंतर सलग 4 सामने गमावले आहेत. तर केकेआरला 5 पैकी फक्त 2 सामन्यांतच विजय मिळवता आला आहे. त्यामुळे केकेआरला जिंकायचं असेल तर त्यांना चेन्नईचा गड भेदावा लागेल. तर चेन्नईसमोर सलग पाचवा पराभव टाळण्याचं आव्हान असणार आहे.
कोलकाता नाइट रायडर्स प्लेइंग ईलेव्हन : क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), सुनील नारायण, अजिंक्य रहाणे (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, मोईन अली, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, हर्षित राणा, वैभव अरोरा आणि वरुण चक्रवर्ती.
चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग ईलेव्हन : रचीन रवींद्र, डेव्हॉन कॉनव्हे, राहुल त्रिपाठी, विजय शंकर, शिवम दुबे, एमएस धोनी (कॅप्टन आणि विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, नूर अहमद, अंशुल कंबोज आणि खलील अहमद.
