AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सांगितलं होतं ना मला जाऊ दे..! Live सामन्यात ऋषभ पंतने झहीर खानला झापलं, नेमकं काय झालं? Video

लखनौ सुपर जायंट्स संघात बरंच काही घडत असल्याचं दिसत आहे. दिल्ली कॅपिटल्सकडून मिळालेल्या पराभवानंतर काही व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. असं असताना लखनौ सुपर जायंट्सच्या डगआऊटमधील व्हिडीओने खळबळ उडाली आहे. यात कर्णधार ऋषभ पंत आपल्या बॅटिंग ऑर्डरमुळे नाराज असल्याचं बोललं जात आहे.

सांगितलं होतं ना मला जाऊ दे..! Live सामन्यात ऋषभ पंतने झहीर खानला झापलं, नेमकं काय झालं? Video
ऋषभ पंत आणि झहीर खानImage Credit source: Twitter
| Updated on: Apr 23, 2025 | 2:39 PM
Share

आयपीएल 2025 स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सकडून लखनौ सुपर जायंट्सला दुसऱ्यांदा पराभूत व्हावं लागलं आहे. या पराभवामुळे लखनौ सुपर जायंट्सचा टॉप 4 मध्ये जाण्याचं स्वप्न तुर्तास भंगलं आहे. मात्र या सामन्यात काही विचित्र प्रकार पाहायला मिळाले. यात सर्वाधिक चर्चा झाली ती ऋषभ पंतच्या बॅटिंग ऑर्डरची. कारण फलंदाजीची मोठी संधी असताना ऋषभ पंतसारखा आक्रमक फलंदाज सातव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला. शेवटी त्याला दोन चेंडू खेळण्याची संधी मिळाली. मात्र त्या दोन चेंडूवर भोपळा फोडता आला नाही आणि बाद होत तंबूत परतला. ऋषभ पंत आयपीएल करिअरमध्ये दोन वेळा शून्यावर बाद झाला आहे. विशेष म्हणजे या पर्वात आणि ते देखील दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध.. मुकेश कुमार विरुद्ध पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात चूक झाली आणि निर्धाव गेला. दुसऱ्या चेंडूवर रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू थेट स्टंपवर आदळला. यामुळे त्याचा संताप झाला आणि रागातच तंबूत परतला. त्याच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत पाहू शकता की ऋषभ पंत हेल्मेट घालून डगआऊटमध्ये बसला आहे. त्याच्या आधी डेव्हिड मिलर आणि आयुष बडोनी फलंदाजीसाठी गेले होते. पण मिलर फलंदाजी करताना अडचणीत असल्याचं दिसून आलं. त्याने 15 चेंडूत 14 धावा केल्या. यावेळी कॅमेरा लखनौ सुपर जायंट्सच्या डगआऊटकडे वळला. तेव्हा ऋषभ पंत रागान लाल लाल झाल्याचं दिसलं. त्याच्या हावभावावरून समालोचक आपला अंदाज बांधत होते. ऋषभ पंत झहीर खानला सांगत असावा की, ‘मी बोललो होतो की मला जाऊ दे.’

ऋषभ पंत आयपीएल 2016 मध्ये सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी दोन वेळा आला होता. त्यानंतर आता पुन्हा फलंदाजीला या क्रमांकावर उतरला. पण यावेळेस ऋषभ पंतचे हावभाव पाहता संघात काहीतरी सुरु असल्याचं दिसत आहे. संघ व्यवस्थापनाच्या निर्णयाने खूश नाही, अशी चर्चा रंगली आहे. ऋषभ पंतने या पर्वातील 9 डावात 96.36 च्या स्ट्राईक रेटने आणि 13.25 च्या सरासरीने 106 धावा केल्या. यावेळी त्याने फक्त एक अर्धशतक ठोकलं. विशेष म्हणजे आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू म्हणून पंतची ख्याती आहे. त्याच्यासाठी 27 कोटी रुपये मोजले आहेत.

Follow Us
कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
Siya Goyal Breaking | केतन हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पुन्हा चर्चेत; कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय
Tukaram Mundhe | दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय, कोणते आहेत नवे नियम?
राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! खोतांचा घणाघात; महायुतीला सावध...
Sadabhau Khot | राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! सदाभाऊ खोतांचा घणाघात; महायुतीला सावध राहण्याचा इशारा
अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची..
Ram Mandir News | अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची पहिली मोठी प्रतिक्रिया
मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा...
Mumbai | मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा; संदीप देशपांडेंचा भाजपवर घणाघात
काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? ठाकरेंच्या आंदोलनावर...
Breaking | काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनावर उदय सामंतांचा घणाघात!
धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! अन् पुढे जे झालं....
Tree Collapse Mumbai | धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; निष्काळजीपणामुळे आणखी एकाचा बळी
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला जीव
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला 2 वर्षांच्या सोहमचा जीव
मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
ब्रेकिंग! मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील दुपारच्या सत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
Rain Update | पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय