AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2025, MI vs RR: वैभव सूर्यवंशी 100 ते 0 प्रवास, मुंबई इंडियन्सविरुद्ध दोन चेंडूत डब्बा गुल

आयपीएल 2025 स्पर्धेतील 50वा सामना मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सुरु आहे. हा सामना राजस्थानच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा आहे. नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पण मुंबईच्या फलंदाजांनी 200 पार धावा केल्या. त्यात राजस्थानचा हुकूमाचा एक्का फेल गेला.

IPL 2025, MI vs RR: वैभव सूर्यवंशी 100 ते 0 प्रवास, मुंबई इंडियन्सविरुद्ध दोन चेंडूत डब्बा गुल
वैभव सूर्यवंशीImage Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 01, 2025 | 10:10 PM
Share

आयपीएल 2025 स्पर्धेत मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने आले आहेत. हा सामना प्लेऑफच्या दृष्टीने राजस्थानला जिंकणं भाग आहे. अन्यथा या स्पर्धेतून बाद होणारा दुसरा संघ ठरेल. या सामन्यात नाणेफेकीचा कौल राजस्थान रॉयल्सच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी करण्यााच निर्णय घेतला. पण रोहित शर्मा आणि रिकल्टनने चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या विकेटसाठी 116 धावांची मजबूत भागीदारी केली. रिकल्टनने 38 चेंडूत 7 चौकार आणि 3 षटकार मारत 61 धावा केल्या. तर रोहित शर्मा 36 चेंडूत 9 चौकार मारत 53 धावांवर बाद झाला. तर कर्णधार हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव यांनी प्रत्येकी नाबाद 48 धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावार 20 षटकात 2 गडी गमवून 217 धावा केल्या आणि विजयासाठी 218 धावांचं आव्हान दिलं. इतकं मोठं आव्हान असताना सर्वांच्या नजरा या 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीकडे लागून होत्या. कारण मागच्या सामन्यात त्याने वादळी खेळी करून जिंकून दिलं होतं. पण या सामन्यात तसं काही झालं नाही. त्याला आपलं खातंही खोलता आलं नाही.

वैभव सूर्यवंशीने मागच्या सामन्यात 101 धावांची खेळी केली होती. मात्र या सामन्यात फक्त 2 चेंडूंचा सामना केला आणि भोपळा न फोडता बाद झाला. पहिलं षटक टाकण्यासाठी दीपक चाहर आला. स्ट्राईकला जयस्वाल होता. पहिला चेंडू निर्धाव गेला आणि दुसर्‍या चेंडूवर एक धाव घेत त्याने वैभवला स्ट्राईक दिली. दीपक चाहरने वैभवचं स्वागत यॉर्कर चेंडूने केलं. पहिला चेंडू निर्धाव गेला. त्यानंतरच्या चेंडूवर मिड ऑनच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू सर्कलच्या आतच राहीला आणि विल जॅक्सने सहज झेल पकडला. त्यामुळे 14 वैभवला निराश होत तंबूत परतावं लागलं.

वैभव सूर्यवंशीने पहिल्या दोन सामन्यात दुहेरी आकडा गाठला होता. तिसऱ्या सामन्यात तिहेरी आकडा म्हणजेच शतक ठोकलं होतं. त्यामुळे त्याच्याकडून फार अपेक्षा होत्या. पण यावेळी मात्र भ्रमनिरास झाला. चौथ्या सामन्यात त्याला खातंही खोलता आलं नाही.

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.