RCB vs RR : कोहली-देवदत्तची ‘विराट’ खेळी, राजस्थानसमोर 206 धावांचं आव्हान, आरसीबी घरात पहिला विजय मिळवणार?
Royal Challengers Bengaluru vs Rajasthan Royals : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने होम ग्राउंड अर्थात एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये विराट कोहली आणि देवदत्त पडीक्कल या जोडीने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 200 पार मजल मारली आहे.

विराट कोहली आणि देवदत्त पडीकक्ल या जोडीने केलेल्या अर्धशतकी आणि वादळी खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनने घरच्या मैदानात पाहुण्या राजस्थान रॉयल्ससमोर 206 धावांचं अवघड आव्हान ठेवलं आहे. आरसीबीने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 205 धावा केल्या. आरसीबीसाठी विराटने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. तर देवदत्तने अर्धशतकी खेळी केली. तर इतर फलंदाजांनीही चांगली साथ दिली. आरसीबीने या मोसमात आतापर्यंत एकूण पाच सामने जिंकले आहेत. मात्र आरसीबीला घरच्या मैदानात एकही सामना जिंकता आलेला नाही. त्यामुळे आरसीबी राजस्थानवर मात करत घरच्या मैदानात विजयाचं खातं उघडणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
आरसीबीची बॅटिंग
राजस्थानचा कर्णधार रियान पराग याने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला. आरसीबीकडून एकूण 7 जणांनी बॅटिंग केली,त्यापैकी फक्त एकालाच दुहेरी आकडा गाठता आला नाही. विराटने आरसीबीसाठी सर्वाधिक धावा केल्या. विराटने 42 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 8 फोरसह 70 रन्स केल्या. देवदत्त पडीक्कल याने 27 चेंडूत 3 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 50 धावा केल्या. ओपनर फिल सॉल्ट याने 26 धावांचं योगदान दिलं. फिलने 23 बॉलमध्ये 4 फोरसह ही खेळी केली. टीम डेव्हीड याने 15 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 2 फोरसह छोटेखानी मात्र 23 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. तर जितेश शर्मा नाबाद परतला. जितेशने 200 च्या स्ट्राईक रेटने 10 बॉलमध्ये 4 फोरसह नॉट आऊट 20 रन्स केल्या. तर कर्णधार रजत पाटीदार याला दुहेरी आकडा गाठता आला नाही.रजतने 1 धाव केली.
राजस्थान रॉयल्सकडून एकूण 6 जणांनी बॉलिंग केली.त्यापैकी फक्त तिघेच यशस्वी ठरले. संदीप शर्मा याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर जोफ्रा आर्चर आणि वानिंदु हसरंगा या जोडीने प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
कोण मिळवणार 2 पॉइंट्स?
Innings Break! #RCB post a target of 2⃣0⃣0⃣+ for the first time at the M.Chinnaswamy this season 👏
Stay tuned for #RR‘s chase ⌛️
Scorecard ▶ https://t.co/mtgySHgAjc #TATAIPL | #RCBvRR pic.twitter.com/l3rswpNFd9
— IndianPremierLeague (@IPL) April 24, 2025
राजस्थान परतफेड करणार?
राजस्थान आणि बंगळुरु या हंगामात 13 एप्रिलनंतर पुन्हा एकदा आमनेसामने आहेत. आरसीबीने 13 एप्रिलला राजस्थानचा 9 विकेट्सने धुव्वा उडवला होता. त्यामुळे राजस्थानकडे आता या पराभवाची परतफेड करण्याची संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला आरसीबी घरच्या मैदानातील पहिल्या आणि एकूण सहाव्या विजयाच्या प्रतिक्षेत आहे.आरसीबीचा हा या मोसमातील एम चिन्नास्वामी स्टेडियममधील चौथा सामना आहे. आरसीबीला याधीच्या तिन्ही सामन्यात पराभूत व्हावं लागलं आहे. त्यामुळे आरसीबीचा घरच्या मैदानात पहिला विजय मिळवण्याचा प्रयत्न असणार आहे.
