AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयपीएल 2025 स्पर्धेचं सुधारित वेळापत्रक जाहीर, अंतिम फेरीचा सामना 3 जूनला

भारत पाकिस्तान तणावपूर्ण स्थितीमुळे आयपीएल 2025 स्पर्धा स्थगित करण्यात आली होती. मात्र आता तणाव निवळल्यानंतर पुन्हा एकदा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा क्रीडा रसिकांना सामन्यांची अनुभूती घेता येणार आहे.

आयपीएल 2025 स्पर्धेचं सुधारित वेळापत्रक जाहीर, अंतिम फेरीचा सामना 3 जूनला
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 12, 2025 | 11:08 PM
Share

आयपीएल 2025 स्पर्धेत 58 वा सामना अर्धवट थांबवण्यात आला आणि त्यानंतर स्पर्धा स्थगित केल्याची घोषणा करण्यात आली. ही स्पर्धा भारत पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण स्थितीमुळे थांबवण्यात आली होती. पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना 8 मे रोजी अर्धवट थांबवण्यात आला होता. त्यामुळे इतर सामने कधी होतील हे मात्र निश्चित नव्हतं. पण आयपीएलचं वेळापत्रक नव्याने जाहीर करण्यात आलं आहे. 17 मे पासून या स्पर्धेला पुन्हा सुरुवात होणार आहे. तसेच 3 जून रोजी या स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे. यापूर्वी अंतिम फेरीचा सामना 25 मे रोजी होणार होता. मात्र आता या स्पर्धेचा अंतिम सामना 3 जून रोजी होणार आहे.

भारत पाकिस्तान तणावामुळे 9 मे पासून एका आठवड्यासाठी ही स्पर्धा थांबवण्यात आली होती. भारत पाकिस्तान या देशातील तणाव निवळल्यानंतर बीसीसीआयने उर्वरित सामन्यांचं नवं वेळापत्रक जाहीर केलं आहे. नव्या वेळापत्रकानुसार 17 मे पासून उर्वरित 17 सामन्यांचा खेळ सुरु होईल. सहा ठिकाणी उर्वरित सामने खेळवले जातील. बीसीसीआयने उर्वरित सामने बेंगळुरू, दिल्ली, लखनौ, मुंबई, अहमदाबाद आणि जयपूर या सहा ठिकाणी आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने अद्याप प्लेऑफ सामन्यांसाठी ठिकाणे निश्चित केलेली नाहीत. बीसीसीआयने यावेळी भारतीय सशस्त्र दलांच्या शौर्याला सलाम केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे क्रिकेटचे सुरक्षित पुनरागमन शक्य झाले आहे, असं बीसीसीआयने आपल्या निवदेनात म्हंटलं आहे.

आयपीएलने एका प्रेस रिलीज जारी करताना म्हटले की, ‘बीसीसीआयला टाटा आयपीएल 2025 पुन्हा सुरू झाल्याची घोषणा करताना आनंद होत आहे. एकूण 17 सामने 6 ठिकाणी खेळवले जातील. 17 मे पासून सुरू होतील आणि 3 जून रोजी अंतिम सामना होईल. नवीन वेळापत्रकात दोन डबल-हेडर सामने समाविष्ट आहेत. यावेळी दोन सामने रविवारी खेळवले जातील. प्लेऑफचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.

  • क्वालिफायर 1 – 29 मे,
  • एलिमिनेटर – 30 मे,
  • क्वालिफायर 2 – 1 जून
  • अंतिम सामना 3 जून

पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात पुन्हा सामना

आयपीएल 2025 स्पर्धेतील 58 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स यांच्यात सुरु होता. मात्र हा सामना अर्धवट थांबवण्यात आला होता. पण आता 17 सामने होणार असल्याने हा सामना परत होईल असे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. हा सामना 24 मे रोजी जयपूरमध्ये होईल असं सांगण्यात येत आहे. हा सामना पुन्हा होणार असल्याने गुणतालिकेत बदल झालेला नाही.

उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक

  • 17 मे, शनिवार, सायंकाळी 7:30 वाजता: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, बंगळुरू
  • 18 मे, रविवार, दुपारी 3:30 वाजता: राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज, जयपूर
  • 18 मे, रविवार, सायंकाळी 7:30 वाजता: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स, दिल्ली
  • 19 मे, सोमवार, सायंकाळी 7:30 वाजता: लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, लखनौ
  • 20 मे, मंगळवार, सायंकाळी 7:30 वाजता: चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स, दिल्ली
  • 21 मे, बुधवार, सायंकाळी 7:30 वाजता: मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, मुंबई
  • 22 मे, गुरुवार, संध्याकाळी 7:30 वाजता: गुजरात टायटन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स, अहमदाबाद
  • 23 मे, शुक्रवार, सायंकाळी 7:30 वाजता: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, बंगळुरू
  • 24 मे, शनिवार, सायंकाळी 7:30 वाजता: पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, जयपूर
  • 25 मे, रविवार, दुपारी 3:30 वाजता: गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, अहमदाबाद
  • 25 मे, रविवार, सायंकाळी 7:30 वाजता: सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, दिल्ली
  • 26 मे, सोमवार, सायंकाळी 7:30 वाजता: पंजाब किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स, जयपूर
  • 27 मे, मंगळवार, सायंकाळी 7:30 वाजता: लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, लखनौ
  • 29 मे, गुरुवार, संध्याकाळी 7:30 वाजता: पात्रता 1
  • 30 मे, शुक्रवार, संध्याकाळी 7:30 वाजता: एलिमिनेटर
  • 01 जून-रविवार, संध्याकाळी 7:30 वाजता: पात्रता 2
  • 03 जून, मंगळवार, संध्याकाळी 7:30 वाजता: अंतिम सामना
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...