IPL 2025 RR vs PBKS Live Streaming: पंजाब राजस्थानचा हिशोब करत प्लेऑफमध्ये पोहचणार? रविवारी कोण जिंकणार?
Rajasthan Royals vs Punjab Kings Live Streaming : पंजाब किंग्स प्लेऑफमध्ये पोहण्यासाठी उत्सूक आहे. अशात श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वात पंजाब रविवारी राजस्थानचा धुव्वा उडवत प्लेऑफचं तिकीट कन्फर्म करणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष आहे.

आयपीएलच्या 18 व्या मोसमात रविवारी 18 मे रोजी डबल हेडरचा थरार रंगणार आहे. डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स आमनेसामने असणार आहेत. संजू सॅमसन याच्याकडे राजस्थानचं कर्णधारपद आहे. तर श्रेयस अय्यर पंजाबचं नेतृत्व करणार आहे. पंजाब प्लेऑफच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे पंजाबसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. तर राजस्थानचं प्लेऑफमधून आधीच पॅकअप झालंय. त्यामुळे राजस्थानसाठी गमावण्यासारखं काहीच नाही. अशात राजस्थान या सामन्यात विजय मिळवून पंजाबच्या अडचणीत वाढ करणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं आणि इतर संघांचं लक्ष असणार आहे.
पंजाब परतफेड करणार का?
पंजाब आणि राजस्थान या दोन्ही संघांची या मोसमात आमनेसामने येण्याची दुसरी वेळ असणार आहे. याआधी 5 एप्रिलला पंजाब विरुद्ध राजस्थान आमनेसामने होते. तेव्हा राजस्थानने पंजाबला 50 धावांच्या फरकाने पराभूत केलं होतं. त्यामुळे आता पंजाबकडे या पराभवाची परतफेड करण्यासह प्लेऑफमध्ये पोहचण्याची सुवर्णसंधी आहे. त्यामुळे पंजाब यात यशस्वी ठरते की राजस्थान पुन्हा विजयी होते? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
पॉइंट्स टेबलमध्ये कोण कुठे?
ताज्या आकडेवारीनुसार, पंजाब पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानी आहे. पंजाबने 11 सामने खेळले आहेत. पंजाबने त्यापैकी 7 सामने जिंकले आहेत. तर 3 वेळा पंजाबला पराभूत व्हावं लागलंय. तर 26 एप्रिलला कोलकाता विरुद्धचा सामना हा पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे पंजाबच्या खात्यात 15 पॉइंट्स आहेत. पंजाबचा नेट रनरेट हा +0.376 असा आहे.
राजस्थान विरुद्ध पंजाब सामना केव्हा?
राजस्थान विरुद्ध पंजाब सामना रविवारी 18 मे रोजी आयोजित करण्यात आला आहे.
राजस्थान विरुद्ध पंजाब सामना कुठे?
राजस्थान विरुद्ध पंजाब सामना जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.
राजस्थान विरुद्ध पंजाब सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
राजस्थान विरुद्ध पंजाब सामन्याला दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 3 वाजता टॉस होईल.
राजस्थान विरुद्ध पंजाब सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?
राजस्थान विरुद्ध पंजाब सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर लाईव्ह मॅच मोबाईलवर जिओहॉटस्टार एपवर पाहता येईल.
राजस्थानची निराशाजनक कामगिरी
तसेच राजस्थान रॉयल्सची या मोसमात निराशाजनक कामगिरी राहिली आहे. राजस्थाने आतापर्यंत 12 सामने खेळले आहेत. त्यापैकी राजस्थानला केवळ 3 सामनेच जिंकता आहे आहेत. तर तब्बल 9 सामन्यांमध्ये राजस्थानचा पराभव झालाय. राजस्थान 6 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये नवव्या स्थानी आहे.
हेड टु हेड रेकॉर्ड्स
आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात एकूण 29 वेळा लढत झाली आहे. यामध्ये राजस्थानचा वरचष्मा राहिला आहे. राजस्थानने 17 सामने जिंकले आहेत. तर पंजाबला 12 वेळा जिंकण्यात यश आलं आहे.
