IPL 2026 Auction : 19 व्या मोसमासाठी मिनी ऑक्शन कुठे? या तारखेला खेळाडूंचा फैसला;ठिकाणही फिक्स!
IPL 2026 Auction and Venue : क्रिकेट वर्तुळात सध्या आयपीएल 2026 च्या रिटेन्शनची चर्चा सुरु आहे. अशात आता आगामी हंगामाच्या मिनी ऑक्शनची संभाव्य तारीख समोर आली आहे. जाणून घ्या.

आयपीएल अर्थात इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेतील 19 व्या मोसमाआधी (IPL 2026) क्रिकेट चाहत्यांना रिटेन्शनचे वेध लागले आहेत. एकूण 10 फ्रँचायजी आपल्या गोटातील कोणत्या खेळाडूंना रिटेन करणार आणि कुणाला कायम राखणार? याची उत्सूकता क्रिकेट चाहत्यांना लागून आहे. अशात आता मिनी ऑक्शन (IPL 2026 Mini Auction) कधी होणार आणि कुठे होणार? याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यंदाही विदेशातच खेळाडूंचा फैसला होणार आहे.
ऑक्शन कधी आणि कुठे?
पीटीआयच्या रिपोर्टनुसार, 19 व्या मोसमासाठीचं ऑक्शन हे यूएई अर्थात संयुक्त अरब अमिरातीतील अबुधाबी शहरात होणार आहे. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही आतली बातमी दिली आहे. “यंदा ऑक्शनसाठी अबुधाबी या शहराची निवड करण्यात आली आहे”, अशी माहिती बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला दिली.
रिपोर्टनुसार, आयपीएल 2026 मिनी ऑक्शन 15 किंवा 16 डिसेंबरला होण्याची शक्यता आहे. त्यानुसार ऑक्शनसाठी महिन्याभराचाच कालवधी शेष आहे. त्याआधी आता सध्या ट्रेड विंडो सुरु आहे. तसेच फ्रँचायजीसाठी रिटेन्शन यादी जाहीर करण्यासाठी शेवटचे काही दिवस बाकी आहे. रिटेन्शन यादी जाहीर झाल्यांनतर रिलीज केलेले खेळाडू ऑक्शनमध्ये आपलं भाग्य आजमावतील. या खेळाडूंपैकी काही खेळाडू हे नव्या संघात सामील होतील. तर काही खेळाडू अनसोल्ड ठरतील.
ऑक्शनआधी संघांमध्ये बदल होण्याची शक्यता
सध्या ट्रेड विंडो ओपन आहे. ट्रेड विंडोद्वारे हव्या असलेल्या खेळाडूंची अदलाबदल करु शकता. त्यामुळे मिनी ऑक्शनआधी संघांमध्ये बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. क्रिकबझच्या रिपोर्ट्सनुसार, ऑलराउंडर रवींद्र जडेजा आणि सॅम करनच्या बदल्यात संजू सॅमसन असा व्यवहार निश्चित समजला जात आहे. राजस्थान रॉयल्ससाठी खेळणारा विकेटकीपर बॅट्समन संजू सॅमसन मिनी ऑक्शनआधी चेन्नईच्या गोटात असेल, असं निश्चित समजलं जात आहे. तर रवींद्र जडेजा आणि सॅम करन याची राजस्थान टीममध्ये एन्ट्री होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
ट्रेड विंडो फ्रँचायजींसाठी फायदेशीर
ट्रेड विंडो हा पर्याय सर्व फ्रँचायजीसाठी फायदेशीर आहे. फ्रँचायजी या ट्रेड विंडोद्वारे त्यांना हव्या असलेल्या खेळाडूची संमतीने अदलाबदल करु शकते. ट्रेड विंडोद्वारे फ्रँचायजी आपल्या उणीवा दुरुस्त करु शकते. या ट्रे़ड विंडोबाबत महत्त्वाचं म्हणजे ही विंडो ऑक्शनच्या 7 दिवसांआधी बंद होते. त्यामुळे फ्रँचायजींना जो काही व्यवहार करायचाय तो ऑक्शनला 7 दिवस बाकी असताना करावा लागतो.
