AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GT vs SRH Toss : गुजरातची अहमदाबादमध्ये बॅटिंग, हैदराबाद विरुद्ध किती धावा करणार?

Gujarat Titans vs Sunrisers Hyderabad Toss and Playing 11 : गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद दोन्ही संघांकडे हा सामना जिंकून प्लेऑफमधील आपली जागा जवळपास निश्चित करण्याची संधी आहे. त्यामुळे चाहत्यांना या सामन्यात चढाओढ पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

GT vs SRH Toss : गुजरातची अहमदाबादमध्ये बॅटिंग, हैदराबाद विरुद्ध किती धावा करणार?
Pat Cummins and Shubman Gill GT vs SRH TossImage Credit source: Bcci
| Updated on: May 12, 2026 | 8:47 PM
Share

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 56 व्या सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद आमनेसामने आहेत. दोन्ही संघांचा हा या हंगामातील 12 वा सामना आहे. सामन्याचं आयोजन हे गुजराच टायटन्सचा होम ग्राउंड अर्थात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. हैदराबादच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कॅप्टन पॅट कमिन्स याने फिल्डिंगचा निर्णय घेत गुजरातला घरच्या मैदानात बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. आता शुबमन गिल याच्या नेतृत्वात गुजरात किती धावा करण्यात यशस्वी ठरते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दोन्ही संघांचा प्लेइंग ईलेव्हनबाबत सारखाच निर्णय

गुजरात आणि हैदराबादची या मोसमात आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ आहे. गुजरात टायटन्सने घरच्या मैदानातील सामन्यात प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. तर सनरायझर्स हैदराबादनेही गेल्या सामन्यातील 11 खेळाडूंसोबतच खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

कोण होणार नंबर 1?

हैदराबाद आणि गुजरातच्या खात्यात 11 सामन्यानंतर प्रत्येकी 14 गुण आहेत. हैदराबाद नेट रनरेट चांगला असल्याने पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. तर गुजरात तिसऱ्या स्थानी विराजमान आहे. त्यामुळे आता दोघांपैकी कोणता संघ 2 गुणांची कमाई करुन प्लेऑफसाठी आवश्यक असलेल्या 16 गुणांपर्यंत मजल मारतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

साई सुदर्शनच्या कामगिरीकडे लक्ष

गुजरातचा ओपनर साई सुदर्शन याने आतापर्यंत 19 व्या मोसमात एकूण 4 आणि सलग 2 अर्धशतक झळकावले आहेत. साई सातत्याने धावा करत आहे. त्यामुळे साई आता घरच्या मैदानात सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध अर्धशतकी हॅट्रिक पूर्ण करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच कॅप्टन शुबमन गिल याच्याकडूनही चाहत्यांना चांगल्या खेळीची अपेक्षा असणार आहे. अशात शुबमन-साई सलामी जोडी गुजरातला कशी सुरुवात मिळवून देते हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.

सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन : अभिषेक शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), हेनरिक क्लासेन, सलील अरोरा, नितीश कुमार रेड्डी, स्मरण रविचंद्रन, पॅट कमिन्स (कॅप्टन), शिवांग कुमार, एशान मलिंगा, साकिब हुसेन आणि प्रफुल हिंगे.

गुजरात टायटन्स प्लेइंग ईलेव्हन : शुबमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, जेसन होल्डर, निशांत सिंधू, राहुल तेवतिया, रशीद खान, अर्शद खान, कगिसो रबाडा आणि मोहम्मद सिराज.

Follow Us
खरातवरील महाराष्ट्र एपस्टीन फाईल्समध्ये अनेक नेत्यांची व्यक्तिरेखा,
खरातवरील महाराष्ट्र एपस्टीन फाईल्समध्ये अनेक नेत्यांची व्यक्तिरेखा, शिंदे, चाकणकर अन्..
उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, नेमकं काय घडलं? थेट व्हिडीओ आ
उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, नेमकं काय घडलं? थेट व्हिडीओ आला समोर
विलास घुले प्रकरणात हे काय घडलं? 'पुरावे मिटवण्यासाठी 10 व्या आरोपीला
विलास घुले प्रकरणात हे काय घडलं? 'पुरावे मिटवण्यासाठी 10 व्या आरोपीला... बड्या नेत्याच्या दाव्याने राजकारणात खळबळ
प्रवाशांचा श्वास घुसमटला; तब्बल 20 मिनिटे... कोकण स्पेशल मांडवी एक्सप्
मोठी बातमी! प्रवाशांचा श्वास गुदमरला; तब्बल 20 मिनिटे... कोकण स्पेशल मांडवी एक्सप्रेस
ओमराजेंच्या निकवर्तीय नेत्याचं धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सभेआधीच मोठं
Omraje Nimbaklar | ओमराजेंच्या निकवर्तीय नेत्याने धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सभेआधीच केलं मोठं विधान, पुन्हा...
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री
CM Devendra Fadnavis | केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री कुटुंबीयांच्या भेटीला
लवकरच ठाकरे गटात मोठी चलबिचल दिसेल, त्यांचे आमदार शिंदेंकडे कैफियत...
लवकरच ठाकरे गटात मोठी चलबिचल दिसेल, त्यांचे आमदार शिंदेंकडे कैफियत... बड्या नेत्याने एक एक करत सगळंच सांगितलं
एकच खळबळ! सियानं लग्नासाठी नकार दिला होता? प्रकरणात आणखी एकाची एन्ट्री
खळबळ! सियानं लग्नासाठी नकार दिला होता? प्रकरणात आणखी एकाची एन्ट्री; त्याला सगळंच... डोकं चक्रावणारा खुलासा
भाजपमध्ये हे काय घडतंय? मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या कार्यक्रमातच दोन
भाजपमध्ये हे काय घडतंय? मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या कार्यक्रमातच दोन नेत्यांमध्ये रुसवारुसवी... कारण अत्यंत चकित करणार
शिवसेना मोठ्या तयारीत? उदय सामंतांकडून वडेट्टीवारांना पक्षप्रवेशाची
शिवसेना मोठ्या तयारीत? उदय सामंतांकडून वडेट्टीवारांना पक्षप्रवेशाची ऑफर?