AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 Points Table : कोलकाताला एकतर्फी फरकानंतर पॉइंट्स टेबलमध्ये फायदा, दिल्लीचं पराभवासह पॅकअप!

IPL 2026 Points Table : कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिट्ल्सला पराभूत करुन विजयी चौकार लगावला आहे. केकेआरला या विजयानंतर पॉइंट्स टेबलमध्ये फायदा झाला आहे. जाणून घ्या केकेआर विजयानंतर कितव्या स्थानी पोहचली.

IPL 2026 Points Table : कोलकाताला एकतर्फी फरकानंतर पॉइंट्स टेबलमध्ये फायदा, दिल्लीचं पराभवासह पॅकअप!
KKR vs DC Ipl Points TableImage Credit source: Bcci
| Updated on: May 09, 2026 | 7:46 AM
Share

कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल 2026 स्पर्धेतील (IPL 2026) 51 व्या सामन्यात शुक्रवारी 8 मे रोजी दिल्ली कॅपिट्ल्सवर एकतर्फी विजय मिळवला. कोलकाताने दिल्लीचा 8 विकेट्सने धुव्वा उडवला. कोलकाताचा हा या मोसमातील एकूण आणि सलग चौथा विजय ठरला. कोलकाताला या विजयांनतर पॉइंट्स टेबलमध्ये फायदा झाला आहे. कोलकाताने विजयानंतर पॉइंट्स टेबलमध्ये कितव्या स्थानी झेप घेतलीय? तसेच पराभवानंतर दिल्ली कॅपिट्ल्स कोणत्या स्थानी आहे? हे जाणून घेऊयात.

केकेआरची 19 व्या मोसमात अतिशय वाईट आणि निराशाजनक सुरुवात झाली होती. केकेआरला पहिल्या 6 पैकी 5 सामन्यांत पराभूत व्हावं लागलेलं. तर 1 सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. त्यामुळे केकेआरच्या खात्यात 6 सामन्यानंतर फक्त 1 गुण होता. मात्र त्यानंतर केकेआरने मागे वळून पाहिलं नाही. केकेआरने सलग 4 सामने जिंकून 8 गुणांची कमाई केली. यासह केकेआरच्या खात्यात 10 सामन्यांनंतर 9 गुण झाले आहेत. तसेच केकेआरला दिल्ली विरुद्ध मोठ्या फरकाने विजय मिळवल्याने नेट रनरेटमध्ये फायदा झाला आहे. केकेआरने दिल्ली विरुद्ध 143 धावांचं आव्हान हे 34 बॉलआधी पूर्ण केलं.

केकेआरला किती फायदा?

केकेआरला 34 बॉल ठेवून विजय मिळवल्याने नेट रनरेटमध्ये किती फायदा झालाय हे जाणून घेऊयात. केकेआरचा नेट रनरेट हा सामन्याआधी -0.539 असा होता जो विजयानंतर -0.169 असा झाला आहे. तसेच केकेआरने आठव्या स्थानावरुन सातव्या स्थानी झेप घेतली आहे. तर दिल्लीची पराभवामुळे सातव्या स्थानावरुन आठव्या क्रमांकावर घसरण झाली आहे.

दिल्लीचं पॅकअप?

दिल्लीचं या पराभवासह स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे. दिल्लीने 11 पैकी 4 सामने जिंकले आहेत. तर दिल्लीचा 7 सामन्यांत पराभव झाला आहे. दिल्लीच्या खात्यात 8 गुण आहेत. त्यामुळे दिल्लीने उर्वरित 3 सामने जिंकले तरी त्यांचे एकूण 14 गुण होतील, जे प्लेऑफसाठी पुरेसे ठरणार नाहीत. त्यामुळे दिल्लीचं उर्वरित सामने जिंकून मोहिमेची सन्मानाने सांगता करणयाचा प्रयत्न असणार आहे.

एकूण 10 संघांची पॉइंट्स टेबलमधील स्थिती

शनिवारी कुणाचा सामना?

दरम्यान शनिवारी 9 मे रोजी राजस्थान विरुद्ध गुजरात यांच्यात सामना होणार आहे. जयपूरमधील सवाई मानसिंह स्टेडियममध्ये हा सामना होणार आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी 6 सामने जिंकले आहेत. त्यामुळे या 2 गुणांसाठी राजस्थान आणि गुजरातमध्ये चुरशीचा सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

Follow Us
पक्षप्रवेश करणाऱ्या 6 खासदारांची खासदारकी जाणार? शिंदेंनी एका झटक्यातच
Big Breaking | पक्षप्रवेश करणाऱ्या 6 खासदारांची खासदारकी जाणार? शिंदेंनी एका झटक्यातच दिलं उत्तर; कायदेशीर...
ठाकरेंच्या 6 खासदारांचा शिवसेने जाहीर पक्षप्रवेश; पत्रकार परिषदेच्या..
ठाकरेंच्या 6 खासदारांचा शिवसेने जाहीर पक्षप्रवेश; पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच शिंदेंचं ओमराजेंबाबत मोठं विधान
गेल्या दोन तासांपासून बैठक सुरु; 6 फुटीर खासदार Y. B. चव्हाण सेंटरवर
गेल्या दोन तासांपासून बैठक सुरु; 6 फुटीर खासदार Y. B. चव्हाण सेंटरवर पोहोचण्याआधीच...
हुबेहुब रुपाली चाकणकर! महाराष्ट्रभर गाजलेल्या खरात प्रकरणावरील चित्रपट
हुबेहुब रुपाली चाकणकर! महाराष्ट्रभर गाजलेल्या खरात प्रकरणावरील चित्रपटाचा First Look समोर
6 खासदार गेलेच, आता ते 3 आमदारही नाराज? ठाकरेंच्या बैठकीला मारली दांडी
मोठी घडामोड! 6 खासदार गेलेच, आता ते 3 आमदारही नाराज? उद्धव ठाकरेंच्या बैठकीला मारली दांडी!
पक्ष प्रवेशापूर्वीच शिंदेकडून ओमराजेंना मोठं गिफ्ट? थेट दिल्लीत...
Omraje Nimbalkar | पक्ष प्रवेशापूर्वीच मोठं घडलं; शिंदेकडून ओमराजेंना मोठं गिफ्ट? थेट दिल्लीत...
शिंदे-मींदे बाळंत झालेत, 6 गद्दारांना जन्म दिला; राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut | शिंदे-मींदे बाळंत झालेत, 6 गद्दारांना जन्म दिला, नंदनवनात पाळणा...शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल
उद्धव ठाकरेंच्या बाजूला बसलेलेही त्यांनी फसवतायेत? बड्या नेत्याच्या
उद्धव ठाकरेंच्या बाजूला बसलेलेही त्यांनी फसवतायेत? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ऑपरेशन टायगर 2 पण होणार, शिंदेंच्या बड्या नेत्याने दिले मोठे संकेत
मोठी बातमी! 6 खासदारांनंतर आणखी मोठा धक्का; ऑपरेशन टायगर 2 पण होणार, शिंदेंच्या शिवसेनेच्या बड्या नेत्याने दिले मोठे संकेत
उद्धव ठाकरेंची 20 आमदारांसोबत बैठक, बैठकीला कोण हजर अन् कोण गैरहजर?
Thackeray MLA Meeting | उद्धव ठाकरेंची 20 आमदारांसोबत बैठक, बैठकीला कोण हजर अन् कोण गैरहजर?