AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

6,6,6,6,6,6..! रोहित शर्माने मारले 11 षटकार, मुंबई इंडियन्सने Video केला शेअर

आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्सने पहिल्याच सामन्यात विजयी सलामी दिली आहे. या सामन्यात रोहित शर्माचा आक्रमक अंदाज दिसला. त्याने 38 चेंडूत 78 धावांची खेळी केली. आता एक व्हिडीओतून त्याचा फॉर्म काय आहे ते अधोरेखित होत आहे.

6,6,6,6,6,6..! रोहित शर्माने मारले 11 षटकार, मुंबई इंडियन्सने Video केला शेअर
6,6,6,6,6,6..! रोहित शर्माने मारले 11 षटकार, मुंबई इंडियन्सने Video केला शेअरImage Credit source: Mumbai Indians Twitter
| Updated on: Mar 31, 2026 | 7:37 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेला सुरूवात झाली असून मुंबई इंडियन्सने 14 वर्षानंतर पहिल्याच सामन्यात विजयी सलामी दिली आहे. या सामन्यात मुंबई राजा म्हणून क्रीडाप्रेमी स्तुती करत असलेल्या रोहित शर्माने तुफानी खेळी केली. त्याच्या अर्धशतकी खेळीमुळे केकेआरने दिलेल्या 221 धावांचा यशस्वीरित्या पाठलाग करता आला. आता त्या विजयावरच थांबून न राहता रोहित शर्मा आता पुढच्या कामाला लागला आहे. मुंबई इंडियन्सचा पुढचा सामना 4 एप्रिलला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणार आहे. हा सामना दिल्लीच्या अरूण जेटली मैदानात होणार आहे. या सामन्यासाठी मुंबई इंडियन्सने जोरदार तयारी सुरू केली आहे. रोहित शर्माने सरावदरम्यान आपल्या फॉर्मची झलक दाखवून दिली आहे. खरं तर सामन्यापूर्वीचा ट्रेलर आहे असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. रोहित शर्माचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात रोहित शर्मा षटकारांची आतषबाजी करताना दिसत आहे.

रोहित शर्माने मारले11 षटकार

रोहित शर्माचा हा व्हिडीओ मुंबई इंडियन्सने आपल्या अधिकृत सोशल मिडिया खात्यावर शेअर केला आहे. या व्हिडिओत रोहित शर्मा जबरदस्त स्ट्रोक्स खेळताना दिसत आहे. रोहित शर्माने मैदानाच्या व्ही भागात जोरादार फटकेबाजी केली. म्हणजेच कव्हर्स, लाँग ऑफ, लाँग ऑन, मिड विकेट या भागात षटकार मारले. रोहित शर्माने या व्हिडीओत एकूण 11 षटकार मारले. सर्व फटके एकदम जबरदस्त होते. त्यामुळे रोहित शर्मा जबरदस्त फॉर्मात असल्याचं दिसून येत आहे. आता दिल्लीच्या अरूण जेटली मैदानात त्याच्या षटकारांची आतषबाजी क्रीडाप्रेमींना पाहायला मिळेल, असं जाणकार सांगत आहेत.

केकेआरच्या गोलंदाजांची धुलाई

मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात 29 मार्चला सामना पार पडला. या सामन्यात ओपनिंग आलेल्या रोहित शर्माने तुफान फटकेबाजी केली. त्याने 38 चेंडूत 78 धावा केल्या. यात 6 षटकार आणि 6 चौकारांचा समावेश होता. रोहित शर्माचा स्ट्राईक रेट हा 205.2 चा होता. तर सलामीला आलेल्या रिकल्टसोबत त्याने 71 चेंडूत 148 धावांची भागीदारी केली. मुंबईने केकेआरने दिलेलं 221 धावांचं लक्ष्य 19.1 षटचकात 4 गडी गमवून पूर्ण केलं.

Follow Us
शरद पवारांचे फोटो पुन्हा राष्ट्रवादीच्या बॅनरवर झळकणार? परवानगी
NCP Banner | शरद पवारांचे फोटो पुन्हा राष्ट्रवादीच्या बॅनरवर झळकणार? परवानगी अन्... राजकीय चर्चांना उधाण
आधी मकोका, मगच अंत्यसंस्कार! युवकाच्या मृत्यूनंतर श्रीरामपूरमध्ये....
Shrirampur Crime Case | आधी मकोका, मगच अंत्यसंस्कार! युवकाच्या मृत्यूनंतर श्रीरामपूरमध्ये मृतदेहासह पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन
मध्य रेल्वेचा खोळंबा! मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड; लोकलसह....
Asangaon to Vasind | मध्य रेल्वेचा खोळंबा! मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड; लोकलसह एक्स्प्रेस गाड्या अर्धा तास रांगेत
री-डेव्हलपमेंटचा बेफिकीर खेळ! भर रस्त्यात कोसळली इमारत; खिडकीतून...
Kalyan Collapsed Building | री-डेव्हलपमेंटचा बेफिकीर खेळ! भर रस्त्यात कोसळली इमारत; खिडकीतून उडी मारून...
मोठी बातमी! ठाकरेंच्या गटातील नगरसेविका शिंदे सेनेच्या वाटेवर? राजकीय
मोठी बातमी! ठाकरेंच्या गटातील नगरसेविका शिंदे सेनेच्या वाटेवर? राजकीय घडामोडींना वेग
विनायक राऊत यांच्या कुटुंबावर गंभीर आरोप, गिरीजा राऊतांच्या तक्रारीनंत
विनायक राऊत यांच्या कुटुंबावर गंभीर आरोप, गिरीजा राऊतांच्या तक्रारीनंतर विशेष पथक स्थापन, आता...
तब्बल 7 हजार सायकलवरून पंढरी गाठणाऱ्या वारकऱ्यांचा उत्साह पाहाच
Pandharpur | आषाढी वारीत सायकल वारीची धूम! तब्बल 7 हजार सायकलवरून पंढरी गाठणाऱ्या वारकऱ्यांचा उत्साह पाहाच
नीता अंबानी ठरल्या मोस्ट पॉवरफुल वुमन 2026, मुंबईतील भव्य कार्यक्रमात
Nita Ambani | नीता अंबानी ठरल्या मोस्ट पॉवरफुल वुमन 2026, मुंबईतील भव्य कार्यक्रमात बहुमान!
भारतासह इतर देशांचे 650 विमान उड्डाण रद्द; अचानक... नेमकं काय घडतंय?
भारतासह इतर देशांचे 650 विमान उड्डाण रद्द; अचानक... नेमकं काय घडतंय?
जाता पंढरीशी सुख वाटे जिवा... संत सोपानदेवांच्या पालखीने धरला पंढरीचा
जाता पंढरीशी सुख वाटे जिवा... संत सोपानदेवांच्या पालखीने धरला पंढरीचा मार्ग