AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL स्पर्धेत पहिल्यांदाच पिता पुत्राचा आमनासामना होणार, या दिवशी रंगणार लढत

आयपीएल 2026 स्पर्धेचं 19वं पर्व सुरू आहे. प्रत्येक सामन्यानंतर स्पर्धा पुढे सरकत आहे. असं असताना एका सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कारण या सामन्यात पिता पुत्र आमनेसामने येणार आहेत. चला जाणून घेऊयात हा सामना कधी आणि काय आहे ते..

IPL स्पर्धेत पहिल्यांदाच पिता पुत्राचा आमनासामना होणार, या दिवशी रंगणार लढत
IPL स्पर्धेत पहिल्यांदाच पिता पुत्राचा आमनासामना होणार, या दिवशी रंगणार लढतImage Credit source: IPL/BCCI
| Updated on: Mar 31, 2026 | 4:29 PM
Share

आयपीएल स्पर्धेतील प्रत्येक पर्वात एक नवा इतिहास रचला गेला आहे. आतापर्यंत अनेक विक्रम रचले गेले आणि मोडले गेले. त्यामुळे या स्पर्धेची लोकप्रियता जगभरात आहे. इतकंच दिवसागणिक या लीग स्पर्धेची ब्रँड व्हॅल्यू आणि लोकप्रियता वाढत आहे. यंदा आयपीएल स्पर्धेचं 19वं पर्व सुरू आहे. 28 मार्चपासून स्पर्धेला सुरूवात झाली असून तीन सामने पार पडले आहेत. जेतेपदासाठी शर्यतीत राहण्यासाठी संघांची चुरस सुरू झाली आहे. प्रत्येक जय पराजयानंतर गुणतालिकेत उलथापालथ होणार आहे. असं असताना आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात एक गोष्ट पहिल्यांदाच घडणार आहे. यापूर्वी या स्पर्धेत असं कधी घडलं नव्हतं. आयपीएल स्पर्धेत पहिल्यांदाच पिता पुत्राचा आमनासामना होणार आहे. हा सामना कधी होणार? याची उत्सुकता लागून आहे. चला जाणून घेऊयात सविस्तर

सचिन विरुद्ध अर्जुन सामना रंगणार

आयपीएल स्पर्धेतील सचिन आणि अर्जुन तेंडुलकर या पितापुत्रांबाबत सांगत आहोत. खरं तर सचिन तेंडुलकरने क्रिकेटला रामराम ठोकलं आहे. सध्या मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहे. सचिन तेंडुलकर मुंबई इंडियन्सचा मेंटॉर आहे. तर अर्जुन तेंडुलकर हा लखनौ सुपर जायंट्स संघात आहे. ट्रेड विंडोच्या माध्यमातून त्याला लखनौ सुपर जायंट्सने त्याला घेतलं आहे. आयपीएल 2025 पर्यंत ही जोडी मुंबई इंडियन्ससोबत होती. मात्र आता ही जोडी फुटली असून एकमेकांच्या समोर उभे ठाकणार आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्स विरूद्ध लखनौ सुपर जायंट्स सामन्याला एक वेगळं रूप प्राप्त होणार आहे. पण यासाठी क्रीडाप्रेमींना एक महिना वाट पाहावी लागणार आहे. कारण हे दोन्ही संघ या स्पर्धेत 4 मे रोजी भिडणार आहेत. हा सामना वानखेडे स्टेडियमवर होईल.

मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स सामना होईल तेव्हा अर्जुन तेंडुलकर प्लेइंग 11 चा भाग असेल की नाही हे सांगता येत नाही. कारण आतपर्यंत त्याने फक्त 5 आयपीएल सामने खेळले आहेत. मुंबई इंडियन्सकडून त्याने 2023 मध्ये डेब्यू केलं होतं. त्याने आयपीएलमधील 5 सामन्यात तीन विकेट घेतल्या आहेत. आता लखनौ सुपर जायंट्स संघात तगडे स्टार गोलंदाज असताना अर्जुन तेंडुलकरला स्थान देणार का? हा देखील प्रश्न आहे.

Follow Us
मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर
Breaking! मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर, प्रशासन अॅक्शन मोडमध्ये
'दादांच्या आठवणी कुठे नाहीत...' पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं
Sunetra Pawar | 'दादांच्या आठवणी कुठे नाहीत...' पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं भावनिक विधान
कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ
Heavy Rain | कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! अचानक मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ
जयंत पाटील–विनोद तावडे भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ
NDAमध्ये शरद पवारांची एन्ट्री? जयंत पाटील–विनोद तावडे भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ
इतका भयंकर वेग की मोठमोठे कंटेनर फरफटले गेले, दोघांचा मृत्यू अन्...
इतका भयंकर वेग की मोठमोठे कंटेनर फरफटले गेले, दोघांचा मृत्यू अन्... भुस्खलनाचा थरारक व्हिडीओ समोर
मृत्यूवर हसलो नाही! अमित साटम यांचा सभागृहात मोठा खुलासा; म्हणाले...
Amit Satam | मृत्यूवर हसलो नाही! अमित साटम यांचा सभागृहात मोठा खुलासा; म्हणाले...
देवस्थानाच्या पाहणीला गेले अन् कार चिखलातच अडकली; गिरीश महाजन यांनाही
देवस्थानाच्या पाहणीला गेले अन् कार चिखलातच अडकली; गिरीश महाजन यांनाही पूरस्थितीचा फटका
खाली धावपट्टी आहे की नाही? हेच समजेना! अखेर वैमानिकाने... अंगावर काटा
Navi Mumbai | खाली धावपट्टी आहे की नाही? हेच समजेना! अखेर वैमानिकाने... अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
स्थानिकांना दिलासा! वाऱ्यांची दिशा बदलेली अन् मोठं संकट टळलं, आता...
स्थानिकांना दिलासा! वाऱ्यांची दिशा बदलेली अन् मोठं संकट टळलं, आता या शहरावर ओढावलं ढगफुटीचं संकट
संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना! 427 वर्षांची परंपरा...
Ashadhi Wari 2026 | संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना! 427 वर्षांची परंपरा, विठ्ठल... विठ्ठलच्या गजरात दुमदुमलं पैठण