AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PBKS vs MI : पंजाबच्या लोअर ऑर्डरचा धमाका, मुंबईसमोर 201 धावांचं आव्हान, कोण जिंकणार?

Punjab Kings vs Mumbai Indians, 1st Innings : मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी मधल्या टप्प्यात अप्रतिम बॉलिंग करत पंजाबला बॅकफुटवर टाकलं होतं. मात्र पंजाबने जोरदार कमबॅक करत 200 धावा केल्या. त्यामुळे आता मुंबईला जिंकायचं असेल तर 10.05 च्या रनरेटने धावा कराव्या लागणार आहेत.

PBKS vs MI : पंजाबच्या लोअर ऑर्डरचा धमाका, मुंबईसमोर 201 धावांचं आव्हान, कोण जिंकणार?
Prabhsimran Singh and Cooper ConnollyImage Credit source: IPL X Account
| Updated on: May 14, 2026 | 10:16 PM
Share

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 58 व्या सामन्यात पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्ससमोर 201 धावांचं आव्हान ठेवलं आहे. पंजाबने मुंबई विरुद्ध 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 200 धावा केल्या. पंजाबच्या टॉप ऑर्डरने अप्रतिम सुरुवात केली होती. मात्र त्यानंतर मुंबईच्या गोलंदाजांनी जबरदस्त कमबॅक करत पंजाबच्या मिडल ऑर्डरमधील फलंदाजांना झटपट आऊट केलं. त्यामुळे पंजाबला अडचणीत सापडली होती. पंजाब पूर्ण 20 ओव्हर खेळेल का? अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र पंजाबच्या लोअर ऑर्डरमधील फलंदाजांनी कमालीची बॅटिंग करत टीमला द्विशतकापर्यंत पोहचवलं. पंजाबला सलग 4 सामन्यांत पराभूत व्हावं लागलंय. त्यामुळे आता पंजाब मुंबई विरुद्ध विजय मिळवून पराभवाची मालिका खंडीत करण्यात यशस्वी होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

पंजाबची बॅटिंग

मुंबईने टॉस जिंकून पंजाबला बॅटिंगसाठी भाग पाडलं. प्रभसिमरन सिंह आणि प्रियांश आर्या सलामी जोडीने 50 धावांची भागीदारी केली. त्यानंतर प्रियांश आर्या 22 धावा करुन आऊट झाला. त्यानंतर प्रभसिमरन आणि कूपर कोनोली या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. त्यामुळे पंजाब मजबूत स्थितीत होती. त्यामुळे पंजाब सहज मोठी धावसंख्या उभारेल असं वाटत होतं. मात्र मुंबईने इथून कमबॅक केलं.

शार्दूल ठाकुर याने 12 व्या ओव्हरमध्ये पंजाबला 2 आणि मोठे झटके दिले. शार्दूलने प्रभसिमरन सिंह आणि कूपर कोनोली या दोघांची शिकार केली. प्रभसिमरनने 32 बॉलमध्ये 57 रन्स केल्या. तर कूपरने 21 धावांचं योगदान दिलं. त्यानंतर मुंबईच्या गोलंदाजांनी पंजाबच्या मिडल ऑर्डरचं कंबरडं मोडलं.

शार्दूलने कॅप्टन श्रेयस अय्यर याला 4 धावांवर बोल्ड केलं. शार्दूलने सूर्यांश शेडगे याला 8 धावांवर आऊट केलं. तर शशांक सिंह आणि मार्को यान्सेन या दोघांनी प्रत्येकी 2-2 धावा जोडल्या. यान्सेन आऊट झाल्याने पंजाबची 16.2 ओव्हरमध्ये 7 आऊट 140 अशी स्थिती झाली होती. मात्र इथून पंजाबच्या फलंदाजांनी कमाल केली.

पंजाबचं जबरदस्त कमबॅक

पंजाबसाठी अखेरच्या टप्प्यात अझमतुल्लाह ओमरझई, विष्णू विनोद आणि झेव्हीयर बार्टलेट या त्रिकुटाने कमाल केली. अझमतुल्लाहने अवघ्या 17 बॉलमध्ये 223.53 च्या स्ट्राईक रेटने 38 रन्स केल्या. अझमतुल्लाहने या खेळीत 4 सिक्स आणि 2 फोर खेचले. तर विष्णु विनोद आणि झेव्हीयर बार्टलेट हे दोघे नाबाद परतले. विष्णूने 8 बॉलमध्ये 15 रन्स केल्या. तर झेव्हीयरने 7 चेंडूत 18 रन्स केल्या.

लाईव्ह स्कोअरकार्ड

मुंबईसाठी शार्दूल ठाकुर याने सर्वाधिक 4 विकेट्स मिळवल्या. दीपक चाहर याने 2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर राज बावा आणि कॉर्बिन बॉश या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

Follow Us
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार.
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....