AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaibhav Sooryavanshi: वैभवच्या निशाण्यावर पोलार्डचा वर्ल्ड रेकॉर्ड, फक्त इतक्या सिक्सची गरज

Vaibhav Sooryavanshi World Record : राजस्थानचा युवा आणि सलामीवीर फलंदाज वैभव सूर्यवंशी याला दिल्ली विरूद्धच्या सामन्यात वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची संधी आहे. वैभव या वर्ल्ड रेकॉर्डपासून फक्त 1 सिक्स दूर आहे.

Vaibhav Sooryavanshi: वैभवच्या निशाण्यावर पोलार्डचा वर्ल्ड रेकॉर्ड, फक्त इतक्या सिक्सची गरज
Vaibhav Sooryavanshi Rajasthan RoyalsImage Credit source: PTI
| Updated on: Apr 30, 2026 | 6:51 PM
Share

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात (IPL 2026) आतापर्यंत राजस्थान रॉयल्सने जबरदस्त कामगिरी केली आहे. राजस्थानने 9 पैकी 6 सामन्यांत विजय मिळवला आहे. राजस्थानच्या या यशात टीममधील खेळाडूंचंही योगदान आहे. यशस्वी जैस्वाल आणि वैभव सूर्यवंशी या सलामी जोडीने अपवाद वगळता राजस्थानला अप्रतिम सुरुवात मिळवून दिली आहे. वैभव या 15 वर्षीय फलंदाजाने आपल्या कारकीर्दीतील दुसऱ्या मोसमातही तडाखा कायम ठेवला आहे. वैभव प्रत्येक खेळीसह काही न काही विक्रम करतोय. अवघ्या 14 व्या वर्षी पदार्पण करणाऱ्या या वैभवने आयपीएल स्पर्धेत अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. वैभवने या दरम्यान वर्ल्ड रेकॉर्डही आपल्या नावावर केले आहेत. त्यानंतर आता वैभवकडे आणखी एका माजी दिग्गजाला मागे टाकून वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची संधी आहे.

वैभव वेगवान100 टी 20 षटकारांसाठी सज्ज

राजस्थानचा 19 व्या मोसामातील 10 वा सामना 1 मे रोजी होणार आहे. राजस्थान या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध 2 हात करणार आहे. वैभव सूर्यवंशी याला या सामन्यात 1 सिक्स ठोकून किरॉन पोलार्ड याचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी आहे. वैभवच्या निशाण्यावर टी 20 क्रिकेटमध्ये वेगवान 100 षटकार लगावण्याचा विक्रम आहे.

पोलार्डने टी 20 क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 100 षटकार लगावले आहेत. पोलार्डने 843 बॉलमध्ये षटकारांचं शतक पूर्ण केलं आहे. तर पोलार्डच्या या विक्रमपासून वैभव 1 सिक्स दूर आहे. वैभवने पोलार्डच्या तुलनेत कित्येक सामन्यांआधीच 99 षटकार लगावले आहेत. वैभवने 27 टी 20 डावांत 99 सिक्स लगावले आहेत. वैभवने यासाठी 511 चेंडूंचा सामना केला आहे. वैभव आणि पोलार्ड यांच्यात 332 चेंडूंचं अंतर आहे. त्यामुळे आता क्रिकेट चाहत्यांना वैभवच्या 1 पण विक्रमी षटकाराची प्रतिक्षा आहे.

आयपीएल 2026 मध्ये सर्वाधिक षटकार

दरम्यान वैभवच्याच नावावर 19 व्या मोसमात आतापर्यंत सर्वाधिक षटकारांचा विक्रम आहे. वैभवने या हंगामात 37 षटकार लगावले आहेत. राजस्थानची कामगिरी पाहता ते प्लेऑफसाठीचे दावेदार आहेत. त्यामुळे राजस्थान प्लेऑफ आणि अंतिम सामन्यापर्यंत पोहचली तर वैभवला वेस्ट इंडिजच्या आणखी एका माजी विस्फोटक फलंदाजाचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी असणार आहे.

आयपीएलच्या एका मोसमात सर्वाधिक षटकारांचा विक्रम हा ख्रिस गेल याच्या नावावर आहे. गेलने 2012 साली 59 षटकार लगावले होते. त्यामुळे 2011 साली जन्मलेला वैभव सूर्यवंशी गेलला मागे टाकण्यात यशस्वी ठरणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Follow Us
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना शह देण्यासाठी उद्धव ठाकरेंचा मोठा डाव
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना शह देण्यासाठी उद्धव ठाकरेंचा मोठा डाव, अरविंद सावंतांच्या माध्यमातून थेट... दिल्लीत काय घडतंय?
मुख्यमंत्रिपदासाठी भस्मासूर निर्माण केला; अंधारेंचा स्फोटक दावा
Sushma Andhare On BJP | मुख्यमंत्रिपदासाठी भस्मासूर निर्माण केला...; 6 खासदारांच्या बंडाच्या चर्चांदरम्यान सुषमा अंधारेंचा स्फोटक दावा!
भाऊसाहेब वाकचौरे दिल्लीतील निवासस्थानी नाही; नेमकं घडतंय काय?
Shivsena Crisis | भाऊसाहेब वाकचौरे दिल्लीतील निवासस्थानी नसल्याची माहिती; नेमकं घडतंय काय?
ऑपरेशन टायगर यशस्वी होणार? ठाकरे गटातील 6 खासदार बंडाच्या तयारीत
मोठी घडामोड! ऑपरेशन टायगर यशस्वी होणार? ठाकरे गटातील 6 खासदार बंडाच्या तयारीत, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मध्यरात्री दिल्लीत दाखल!
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच,बंड करण्याआधी
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच, बंड करण्याआधीच...ऑपरेशन लोटसबाबत मोठी माहिती समोर!
राजकीय हालचालींना वेग! ठकारेंचे चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं
राजकीय हालचालींना वेग! ठकारे सेनेतील चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं घडणार?
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला...
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला... नागपूरमध्ये डोकं चक्रावणारा प्रकार
काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर... गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकद
Chandrapur | काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर...  गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकदा चिघळणार
महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
Chandrashekhar Bawankule | महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळं; संशयाचा काटा
Sanchita Ugle Case | तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळलं; संशयाचा काटा नेमका कुणावार