AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MI vs PBKS : मुंबई इंडियन्सकडून मिळालेल्या पराभवाचं खापर सॅम करनने असं फोडलं, सामन्यानंतर म्हणाला…

आयपीएल 2024 स्पर्धेतील हृदयाचे ठोके वाढवणारा सामना मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात पार पडला. या सामन्यात शेवटच्या क्षणापर्यंत कोण जिंकेल सांगता येत नव्हतं. प्रेक्षकही छातीवर हात ठेवून प्रत्येक चेंडू पाहात होते. अखेर या सामन्यात मुंबई इंडियन्सला विजय मिळाला. निसटत्या पराभवानंतर कर्णधार सॅम करनने नाराजी व्यक्त केली आहे.

MI vs PBKS : मुंबई इंडियन्सकडून मिळालेल्या पराभवाचं खापर सॅम करनने असं फोडलं, सामन्यानंतर म्हणाला...
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 19, 2024 | 1:01 AM
Share

आयपीएल स्पर्धेचं मध्यान्ह्य पार पडला असून येथून पुढे प्रत्येक सामन्यातील विजय महत्त्वाचा आहे. त्यामुळे प्रत्येक सामना तळाशी असलेल्या संघांना करो या मरोची लढाई आहे. अशीच काहीशी स्थिती मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्सच्या सामन्यात होती. कारण टॉप 4 मध्ये एन्ट्री मिळवण्यासाठी येथून पुढे विजय मिळवत जाणं खूप गरजेचं आहे. असं असताना नाणेफेकीचा कौल पंजाब किंग्सच्या बाजूने लागला. रात्रीच्या सुमारास पडणारं दव लक्षात घेत कर्णधार सॅम करनने गोलंदाजी स्वीकारली. तसेच मुंबई इंडियन्सला 20 षटकात 192 या धावसंख्येवर रोखलं. विजयासाठी मिळालेल्या 193 धावांचा पाठलाग करताना पंजाब किंग्सची सुरुवात एकदम खराब झाली. त्यामुळे पॉवर प्लेमध्ये सामन्याला मरगळ आली होती. मात्र आशुतोष शर्मा आणि शशांक सिंग यांनी आक्रमक फलंदाजी करत सामन्यात रंगत आणली. इतकंच काय तर सामना पूर्णपणे पंजाबच्या पारड्यात आणून सोडला. मात्र अखेरच्या क्षणी पंजाब किंग्सचा निसटचा पराभव झाला. या पराभवानंतर पंजाब किंग्सचा कर्णधार सॅम करनने नाराजी व्यक्त केली आहे. सामन्यानंतर त्याने या पराभवाचं विश्लेषण केलं.

“आणखी एक निसटता पराभव झाला. आम्ही विजयाच्या अगदी जवळ होतो, पण दुर्दैवाने पराभूत झालो. आशुतोष शर्मा आणि शशांक सिंगसारख्या तरुण खेळाडूंनी खरंच खूप छान खेळलं. पण असा निसटता पराभव पचवणं खरंच खूप कठीण असतं. आम्ही सुरुवातीलाच विकेट्स गमावल्या. पण आशुतोष आणि शशांकने सामना विजयाच्या जवळ आणला. त्यांच्यातील आत्मविश्वास वाखाण्याजोगा आहे. आशुतोषची फटकेबाजी बघून त्याचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. वेगवान गोलंदाजाला मारलेला स्वीप शॉट्स खरंच ग्रेट होता. त्याची खेळी पाहून आनंदी झालो. पण शेवटी पराभव झाल्याने निराश झालो.”, असं पंजाब किंग्सचा कर्णधार सॅम करनने सांगितलं.

“सामना हरलो असलो तरी संघात बऱ्याच सकारात्मक गोष्टी आहेत. आमचा संघावर पूर्ण विश्वास आहे. आम्ही हे येत्या सामन्यात विश्वासाने ते करून दाखवू. सूर्य उद्या उगवणार आहे आणि आम्हाला आशा आहे की आम्ही विजयाच्या ट्रॅकवर पुन्हा परतू.”, असंही कर्णधार सॅम करन पुढे म्हणाला.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

पंजाब किंग्स (प्लेइंग इलेव्हन): रिली रोसो, प्रभसिमरन सिंग, सॅम कुरन (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), लियाम लिव्हिंगस्टोन, शशांक सिंग, आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग.

मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, मोहम्मद नबी, जेराल्ड कोएत्झी, श्रेयस गोपाल, जसप्रीत बुमराह.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.