IPL 2024 Points Table: हैदराबादची प्लेऑफमध्ये धडक, चेन्नईला मोठा झटका
IPL Points Table 2024 65th Match : पावसामुळे आयपीएलच्या 17 व्या मोसमातील एकूण दुसरा सामना हा रद्द झाला आहे. हैदराबादने यासह प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला आहे. तर चेन्नईचं टेन्शन वाढलं आहे.
आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 65 वा सामना हा पावसाच्या जोरदार बॅटिंगमुळे अखेर रद्द करण्यात आला आहे. हा सामना हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला होता. हैदराबाद विरुद्ध गुजरात हे संघ आमनेसामने होते. मात्र हैदराबादमध्ये दुपारपासून पाऊस पडत होता. सामन्याला संध्याकाळी 7 वाजता टॉस होऊन 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणं अपेक्षिति होतं. मात्र पावसामुळे सामना लांबला. पाऊस थांबण्याची 10 वाजेपर्यंत प्रतिक्षा करण्यात आली. मात्र पाऊस न थांबल्याने सामना रद्द करण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला. गुजरातचा हा सलग दुसरा सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे गुजरातचं या मोहिमेचा शेवट विजयाने करण्याचं स्वप्न भंग झालं.
हैदराबाद आणि गुजरात सामना रद्द झाल्याने चेन्नईला मोठा फटका बसला आहे. हैदराबाद आणि गुजरात दोन्ही संघांना सामना रद्द झाल्याने प्रत्येकी 1-1 पॉइंट देण्यात आला. हैदराबाजने या 1 पॉइंटसह थेट प्लेऑफसाठी क्वालिफाय केलं. हैदराबाद 13 सामन्यानंतर पॉइंट्स टेबलमध्ये चेन्नई सुपर किंग्सला पछाडत प्लेऑफमध्ये पोहचलीय. आता ताज्या आकडेवारीनुसार हैदराबाद तिसऱ्या स्थानी 15 गुणांसह विराजमान झाली आहे. हैदराबाद केकेआर आणि राजस्थानंतर प्लेऑफमध्ये पोहचणारी तिसरी टीम ठरली आहे. तर चेन्नईची चौथ्या स्थानी घसरण झाली आहे. चेन्नईच्या नावावर 13 सामन्यांमध्ये 12 गुण आहेत.
हैदराबादची प्लेऑफमध्ये धडक
𝙎𝙪𝙣𝙧𝙞𝙨𝙚𝙧𝙨 𝙃𝙮𝙙𝙚𝙧𝙖𝙗𝙖𝙙 are through to #TATAIPL 2024 Playoffs 🧡
Which will be the final team to qualify 🤔#TATAIPL | #SRHvGT | @SunRisers pic.twitter.com/6Z7h5kiI4o
— IndianPremierLeague (@IPL) May 16, 2024
सनरायजर्स हैदराबाद टीम : पॅट कमिन्स (कॅप्टन), जयदेव उनाडकट, झटावेध सुब्रमण्यन, टी नटराजन, मयंक मार्कंडे, भुवनेश्वर कुमार, फजलहक फारुकी, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, सनवीर सिंग, ग्लेन फिलिप्स, नितीश रेड्डी, मार्को जॅनसेन, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, उपेंद्र यादव, एडन मारक्रम, हेनरिक क्लासेन, ट्रॅव्हिस हेड, अनमोलप्रीत सिंग, मयंक अग्रवाल, अब्दुल समद, आकाश महाराज सिंग, वानिंदू हसरंगा आणि उमरान मलिक.
गुजरात टायटन्स प्लेईंग ईलेव्हन : शुबमन गिल (कर्णधार), डेव्हिड मिलर, ऋद्धिमान साहा, साई सुधारसन, शाहरुख खान, मॅथ्यू वेड, केन विल्यमसन, अजमतुल्ला ओमरझाई, अभिनव मनोहर, रशीद खान, विजय शंकर, राहुल तेवतिया, स्पेन्सर जॉन्सन, कार्तिक त्यागी, जोशुआ लिटल, दर्शन नळकांडे, नूर अहमद, रविश्रीनिवासन साई किशोर, मोहित शर्मा, जयंत यादव, उमेश यादव, सुशांत मिश्रा, संदीप वॉरियर, शरथ बीआर आणि मानव सुथर.