AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील पहिल्याच सामन्यापूर्वी टीम इंडियाला धक्का, जसप्रीत बुमराहला झालं तरी काय?

T20 World Cup 2026 : भारत आणि अमेरिका यांच्यात पहिला सामना होत आहे. पण या सामन्यापूर्वी टीम इंडियाला धक्क्यांवर धक्के मिळत आहे. हर्षित राणानंतर आता जसप्रीत बुमराहच्या खेळण्याबाबत साशंकता आहे.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील पहिल्याच सामन्यापूर्वी टीम इंडियाला धक्का, जसप्रीत बुमराहला झालं तरी काय?
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील पहिल्याच सामन्यापूर्वी टीम इंडियाला धक्का, जसप्रीत बुमराहला झालं तरी काय?Image Credit source: PTI
| Updated on: Feb 07, 2026 | 12:15 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा भारतात होणार असल्याने टीम इंडियाला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. पण या स्पर्धेपूर्वी टीम इंडियाला नजर लागल्याचं दिसत आहे. कारण काही खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याने ऐनवेळी टीम इंडियाची धावाधाव सुरू झाली आहे. युवा वेगवान गोलंदाजी हर्षित राणाला गुडघ्याची दुखापत झाली. त्यानंतर टी20 वर्ल्डकप स्पर्धेला मुकला आहे. आता आणखी एक धक्का बसला आहे. खरं तर हा धक्का नाही तर संघाचं मनोबल यामुळे ढासळू शकते. रिपोर्टनुसार, टीम इंडियाचा स्टार गोलंदाजी जसप्रीत बुमराह अमेरिकेविरुद्ध होणाऱ्या सामन्यात खेळणं कठीण आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींची चिंता वाढली आहे. जसप्रीत बुमराहला नेमकं झालं तरी काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. जसप्रीत बुमराह आजारी असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे त्याला पहिल्या सामन्यात आराम दिला गेला आहे. संघ व्यवस्थापनाला स्पर्धा आणि बुमराहची किंमत माहिती आहे. त्यामुळे जसप्रीत बुमराहला आराम दिला जाण्याची शक्यता आहे.

जसप्रीत बुमराह न खेळण्याचं कारण काय?

भारत आणि अमेरिका यांच्या 7 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 7 वाजता मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये सामना होणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाने जोरदार तयारी केली आहे. अमेरिकेचं आव्हान जरी सोपं असलं तरी हलक्यात घेणं महागात पडू शकतं. कारण प्रत्येक विजय हा सुपर 8 फेरीचं गणित सोडवणार आहे. त्यामुळे दमदार खेळाडूंनी या स्पर्धेतील प्रत्येक सामन्यात खेळणं आवश्यक आहे. पण कर्णधार सूर्यकुमार यादवला पहिल्याच सामन्यात स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहसह उतरावं लागणार आहे. 6 फेब्रुवारीला जसप्रीत बुमराह सरावासाठी मैदानात आला होात. पण त्याने कोणताही सराव केला नाही. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, जसप्रीत बुमराहला ताप आला आहे. त्यामुळे त्याला पहिल्या सामन्यात आराम देण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

प्लेइंग 11 मध्ये कोणाला संधी?

जसप्रीत बुमराहला आराम दिला गेला तर प्लेइंग 11 मध्ये कोण? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. टीम इंडियाकडे जसप्रीत बुमराहच्या गैरहजेरीत अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज हे प्रमुख गोलंदाज आहेत. त्यामुळे टीम इंडिया दोघांसह पहिल्या सामन्यात उतरणार यात काही शंका नाही. इतकंच काय तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून हार्दिक पांड्याचा पर्याय आहे. तसेच शिवम दुबे देखील गोलंदाजी करतो. त्यामुळे टीम इंडियाकडे पर्याय आहेत. अचूक टप्प्याची गोलंदाजी आणि प्रतिस्पर्धी संघावर दबाव आणण्याची ताकद जसप्रीत बुमराहकडे आहे.

Follow Us
सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत..
Sachin Kharat : सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत केला गंभीर दावा, पुढे म्हणाले...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं
Delhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं, पोलिसांकडून आंदोलकांना...
शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत
Mumbai : शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत....
पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या
Diveagar Beach Raigad : पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या समुद्रात 8 मुलांचा दुर्दैवी अंत
मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा शिंदेंवर निशाणा
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा मीनाक्षी शिंदेंवर थेट निशाणा
कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
Rohit Pawar : कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही...
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही फरार...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका....
Delhi Protest : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका, इंटरनेट सेवा बंद
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...