AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयसीसीच्या अध्यक्षपदी निवड होताच Jay Shah यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….

Jay Shah 1st Reaction After Icc Chief: जय शाह आयसीसी अध्यक्षपदी नियुक्त होणारे पाचवे भारतीय ठरले. जय शाह यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर काय म्हटलं? जाणून घ्या.

आयसीसीच्या अध्यक्षपदी निवड होताच Jay Shah यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
jay shah bcciImage Credit source: PTI
| Updated on: Aug 27, 2024 | 11:13 PM
Share

क्रिकेट विश्वातील सर्वोच्च संस्थेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी एका भारतीयाला मिळाली आहे. बीसीसीआय सचिव आणि एसीसीचे अध्यक्ष जय शाह यांची आयसीसीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. जय शाह यांची बीसीसीआय सचिव म्हणून ही दुसरी वेळ आहे. तर शाह 2021 पासून एसीसीचं अध्यक्षपद सांभाळत आहेत. त्यानंतर आता त्यांना आयसीसीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली आहे. जय शाह 1 डिसेंबर 2024 रोजी अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार आहेत. जय शाह हे यासह आयसीसीचे सर्वात युवा अध्यक्ष ठरले आहेत. जय शाह यांनी वयाच्या 35व्या वर्षी हा कारनामा केला आहे.

जय शाह यांची प्रतिक्रिया

ग्रेग बार्कले यांची आयसीसी अध्यक्ष म्हणून दुसरी वेळ आहे. त्यांनी तिसऱ्या वेळ अध्यक्षपदी राहण्यास नकार दिला. त्यामुळे आयसीसी अध्यक्षपदासाठी अर्ज मागवण्यात आले. जय शाह यांच्याव्यतिरिक्त कुणीच शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज केला नाहबीत.त्यामुळे जय शाह हे बिनविरोध निवडून आले. आयसीसी अध्यक्ष म्हणून घोषणा होताच जय शाह आनंद व्यक्त केला. क्रिकेटची जागतिक स्तरावर लोकप्रियता वाढवण्याबाबत शाह म्हणाले. तसेच आयसीसी सदस्य राष्ट्रांसह क्रिकेटचा आणखी प्रचार आणि प्रसार करण्यासाठी कटीबद्ध असल्याचं शाह यांनी म्हटलं.

क्रिकेटमधील तिन्ही फॉर्मेटचं अस्तित्व जपण्यासाठी, आधुनिक तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणं आणि अनेक योजनांचं क्रिकेट वर्तुळात आयोजन करणं महत्त्वपूर्ण असल्याचं जय शाह म्हणाले. क्रिकेटला लोकप्रिय करणं हे माझं आधीपासून लक्ष्य असल्याचं जय शाह यांनी नमूद केलं. जय शाह सलग 2 वेळा अध्यक्षपदी कायम राहू शकतात. त्यानंतर ते 2028 साली बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळू शकतात. नियमांनुसार कुणीही बीसीसीआय अध्यक्षपदी 6 वर्षच राहू शकतो. त्यानंतर संबंधित व्यक्तीला 3 वर्ष दूर रहावं लागतं.

जय शाह आयसीसी अध्यक्ष होणारे पाचवे भारतीय

दरम्यान जय शाह यांना आयसीसीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने बीसीसीआय सचिव पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. शाह हे गेल्या 5 वर्षांपासून या पदावर आहेत. शाह हे सध्या आयसीसीच्या अर्थ-व्यवसायविषयक उपसमितीचे प्रमुख आहेत. जय शाह यांची आयसीसीच्या या पदावर 2022 साली नियुक्ती करण्यात आली होती.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.