केएल राहुलची एक चूक आणि टीम इंडियाला बसला 66 धावांचा फटका, Video
दक्षिण अफ्रिकेविरुद्धचा कसोटी सामना भारतासाठी करो या मरोची स्थिती आहे. हा सामना भारताला काहीही करून जिंकवाच लागणार आहे. असं असताना पहिल्या दिवसाचा खेळ दक्षिण अफ्रिकेच्या नावावर राहिला. त्यात केएल राहुलच्या एका चुकीमुळे 66 धावांचा फटका बसला.

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात दुसरा कसोटी सामना गुवाहाटीच्या बरसापरा क्रिकेट स्टेडियममध्ये सुरु आहे. या सामन्यातील पहिल्या दिवसाचा खेळ संपला आणि दक्षिण अफ्रिकेने 6 गडी गमवून 247 धावा केल्या. त्यामुळे पहिल्या दिवसाचा खेळ टीम इंडियाच्या नावावर राहिला. नाणेफेकीचा कौल दक्षिण अफ्रिकेच्या बाजूने लागला. कर्णधार टेम्बा बावुमाने क्षणाचाही विलंब न करता प्रथम फलंदाजी स्वीकारली. कारण पहिल्या तीन दिवसांसाठी खेळपट्टी फलंदाजीला मदत करणारी आहे. त्यामुळे त्याला बरोबर खेळपट्टीचा फायदा होणार हे माहिती होतं. झालंही तसंच.. पहिल्या डावात 247 धावांपर्यंत मजल मारली आहे. दुसऱ्या दिवशी 300 धावांपर्यंत खेळी करण्याची अपेक्षा असेल. दरम्यान दक्षिण अफ्रिकेच्या धावसंख्येत 66 धावांची भर एक चुकीमुळे पडली. कारण केएल राहुलने सातव्या षटकात चूक केली आणि फटका बसला.
संघाचं सातवं षटक टाकण्यासाठी जसप्रीत बुमराह आला होत. या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर जसप्रीत बुमराहने एडेन मार्करमला जाळ्यात ओढलं. पण एडेन मार्करमचा सोपा झेल केएल राहुलने सोडला. त्यामुळे जसप्रीत बुमराहही नाराज दिसला. कारण मार्करम दबावात होता आणि जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर त्याला अडचण जाणवत होती. पण केएल राहुलने सोपी संधी गमावली. केएल राहुल स्लिपला उभा होता आणि मार्करमच्या कट लागून चेंडू थेट त्याच्या हातात आला. पण त्याने झेल सोडल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. एडेन मार्करमचा झेल सोडला तेव्हा तो फक्त 4 धावांवर होता. तर दक्षिण अफ्रिकेची धावसंख्या 16 होती.
KL Rahul dropped the catch of A Markram 🫣#TeamIndia #IndvSA #TestCricket pic.twitter.com/yA8MzTtkWJ
— MEHRA (@DevMehra790) November 22, 2025
एडेन मार्करमने मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा उचलला. पहिल्या विकेटसाठी रियान रिकल्टनसोबत 82 धावांची भागीदारी केली. म्हणजेच पहिल्या विकेटसाठी टीम इंडियाला 66 अतिरिक्त धावा खर्च कराव्या लागल्या. केएल राहुलने 16 धावा असताना झेल पकडला असता तर कदाचित चित्र वेगळं असतं. दक्षिण अफ्रिकन संघ दबावात असता. एडेन मार्करमने 38 धावा केल्या आणि बाद झाला. म्हणजेच जीवनदान मिळाल्यानंतर 34 धावा अतिरिक्त करून गेला. अखेर बुमराहने त्याचा त्रिफळा उडवला आणि तंबूचा रस्ता दाखवला.
