KL Rahul Century : केएल राहुलचा शतकी धमाका, ओपनरकडून इंग्लंडमध्ये कडक सुरुवात, लीड्समध्ये टीम इंडिया मजबूत स्थितीत
IND vs ENG 1st Test KL Rahul : टीम इंडियाचा सलामीवीर आणि अनुभवी फलंदाज केएल राहुल याने इंग्लंड दौऱ्यात कडक सलामी दिली आहे. केएलने लीड्समध्ये कसोटी कारकीर्दीतील पहिलंवहिलं शतक झळकावलं.

टीम इंडियाचा सलामीवीर केएल राहुल इंग्लंड विरुद्ध लीड्समध्ये पहिल्या डावात अर्धशतक करण्यात अपयशी ठरला. केएल राहुल 42 धावा करुन आऊट झाला. मात्र केएलने दुसऱ्या डावात सर्व भरपाई केली आहे. केएलने सामन्यातील चौथ्या दिवशी अप्रतिम शतक झळकावलं आहे. केएलने केलेल्या या खेळीमुळे टीम इंडिया मजबूत स्थितीत पोहचली आहे. टीम इंडियाने या सामन्यावर घट्ट पकड मिळवली आहे. केएलने या शतकी खेळीदरम्यान उपकर्णधार आणि विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत याच्यासह शानदार भागीदारी केली. त्यामुळे टीम इंडिया भक्कम स्थितीत पोहचली आहे.
केएलने 62 व्या ओव्हरमधील सहाव्या आणि शेवटच्या बॉलवर 2 धावा घेतल्या. केएलने यासह शतक पूर्ण केलं. केएलने 202 चेंडूत 49.50 च्या स्ट्राईक रेटने हे शतक पूर्ण केलं. केएलने या खेळीत 13 चौकार लगावले. अर्थात केएलने चौकारांच्या मदतीने 13 चेंडूत 52 धावा केल्या. तर उर्वरित 48 धावांसाठी केएलला 189 चेंडूंचा सामना करावा लागला. केएलच्या कसोटी कारकीर्दीतील हे एकूण नववं तर इंग्लंडमधील तिसरं शतक ठरलं.
2023 नंतर पहिलं कसोटी शतक
केएलचं कसोटी क्रिकेटमध्ये 2023 नंतर पहिलं शतक ठरलं. केएलने याआधी दक्षिण आफ्रिकेतील सेंच्युरियनमध्ये शतक केलं होतं. केएलने गेल्या इंग्लंड दौऱ्यातही (India Tour Of England 2022) शतक केलं होतं. केएलने आतपर्यंत इंग्लंड विरुद्ध सर्व फॉर्मेटमध्ये एकूण 5 शतकं झळकावली आहेत.
9 पैकी 8 शतकं विदेशात
केएलने कसोटी कारकीर्दीत 9 पैकी 8 शतंक परदेशात केली आहेत. केएलने इंग्लंडमध्ये 3, दक्षिण आफ्रिकेत 2 तर श्रीलंका, वेस्टइंडिज आणि ऑस्ट्रेलियात प्रत्येकी 1-1 शतक केलं आहे.
शतकवीर केएल राहुल
💯 𝙛𝙤𝙧 𝙆𝙇 𝙍𝙖𝙝𝙪𝙡! 👏 👏
His 9⃣th TON in Test cricket 🙌 🙌
What a wonderful knock this has been! 👌 👌
Updates ▶️ https://t.co/CuzAEnBkyu#TeamIndia | #ENGvIND | @klrahul pic.twitter.com/XBr9RiheBR
— BCCI (@BCCI) June 23, 2025
वीरेंद्र सेहवागला पछाडलं
दरम्यान केएलने त्याआधी 87 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. केएलच्या कसोटी कारकीर्दीतील हे 18 वं अर्धशतक ठरलं. ओपनर केएल यासह सेना देशात वेगवान 9 वेळा 50 पेक्षा अधिक धावा करणारा फलंदाज ठरला. केएलने याबाबतीत वीरेंद्र सेहवागला मागे टाकत मुरली विजय याच्या विक्रमाची बरोबरी केली. टीम इंडियाकडून ओपनर म्हणून कसोटीत सेना देशात सर्वाधिक 19 वेळा 50 पेक्षा अधिक धावा करण्याचा विक्रम दिग्गज सुनील गावसकर यांच्या नावावर आहे.
