KKR vs PBKS IPL 2022: आंद्रे रसेलने दाखवला पावर हिटिंगचा शो, KKR चा पंजाबवर शानदार विजय

| Updated on: Apr 02, 2022 | 4:20 PM

kolkata knight riders vs punjab kings live score in marathi: दोन्ही संघ चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. त्यामुळे सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे.

KKR vs PBKS IPL 2022: आंद्रे रसेलने दाखवला पावर हिटिंगचा शो, KKR चा पंजाबवर शानदार विजय
IPL 2022: KKR vs PBKS

KKR vs PBKS, IPL 2022: आयपीएलमध्ये तिसरा सामना खेळणाऱ्या कोलकाता नाईड रायडर्सने आज शानदार विजयाची नोंद केली. त्यांनी पंजाब किंग्सला सहा विकेटने नमवलं. कोलकाता नाइट रायडर्सच्या विजयाचे दोन हिरो होते. उमेश यादव आणि आंद्रे रसेल. उमेश यादवने भेदक गोलंदाजी करताना चार षटकात 23 धावा देत चार विकेट घेतल्या. त्यामुळे पंजाब किंग्सला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्यांचा डाव 137 धावात आटोपला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या केकेआरची चार बाद 51 अशी स्थिती होती. पण आंद्रे रसेलने 31 चेंडून नाबाद 70 धावा फटकावत केकेआरच्या विजयावर शिक्कामोर्तब केल. या खेळीत रसेलने दोन चौकार आणि आठ षटकार लगावले.

Key Events

दुसऱ्या सामन्यात कोलकाताचा पराभव

CSK विरुद्धचा सामना जिंकल्यानंतर RCB विरुद्धच्या सामन्यात KKR चा पराभव झाला होता. त्यामुळे आज KKR चा विजय मिळवण्याचा प्रयत्न असेल.

पंजाबने विजयी खात उघडलं

पंजाब किंग्सने आपला पहिला सामना जिंकला आहे. RCB विरुद्ध एका मोठ्या धावसंख्येचा त्यांनी यशस्वी पाठलाग केला होता.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 01 Apr 2022 10:44 PM (IST)

    KKR चा पंजाबवर शानदार विजय

    आंद्रे रसेलच्या 31 चेंडूतील नाबाद 70 धावांच्या खेळीच्या बळावर कोलकाता नाइट रायडर्सने पंजाब किंग्सवर सहा विकेट राखून विजय मिळवला. त्याने दोन चौकार आणि आठ षटकार लगावले. कोलकाताचा आयपीएलमधील हा दुसरा विजय आहे.

  • 01 Apr 2022 10:27 PM (IST)

    सिक्स, सिक्स, सिक्स, आंद्रे रसेलचा सुपर शो

    आंद्रे रसेलने 12 व षटक टाकणाऱ्या ओडिन स्मिथची गोलंदाजी फोडून काढली. स्मिथच्या एका ओव्हरमध्ये चार सिक्स लगावले. एकूण 29 धावा वसूल केल्या. केकेआरच्या चार बाद 109 धावा झाल्या आहेत.

  • 01 Apr 2022 10:23 PM (IST)

    सलग दोन जबरदस्त षटकार

    आंद्रे रसेलने ओडिन स्मिथची गोलंदाजीवर मिडविकेटला सलग दोन जबरदस्त षटकार ठोकले.

  • 01 Apr 2022 10:21 PM (IST)

    आंद्रे रसेलची फटकेबाजी

    आंद्रे रसेलची फटकेबाजी सुरु आहे. त्याने 15 चेंडूत 21 धावा करताना दोन षटकार लगावले आहेत. 11 षटकात चार बाद 81 अशी केकेआरची स्थिती आहे.

  • 01 Apr 2022 10:09 PM (IST)

    कोलकाता नाइट रायडर्सचा डाव अडचणीत, टॉपचे चार फलंदाज तंबूत

    9 षटकात केकेआरच्या चार बाद 56 धावा झाल्या आहेत. अजिंक्य रहाणे (12) आणि वेंकटेश अय्यरने (3) आज पुन्हा एकदा निराश केलं. कॅप्टन श्रेयस अय्यर चांगली फलंदाजी करत होता. पण राहुल चाहरच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात तो राबाडाकरवी 26 धावांवर बाद झाला. त्याने आपल्या खेळीत पाच चौकार लगावले. नितीश राणा आजही फेल ठरला. राहुल चाहरने त्याला शुन्यावप पायचीत पकडलं.

  • 01 Apr 2022 09:21 PM (IST)

    केकेआरला विजयासाठी 138 धावांचे लक्ष्य

    केकेआरच्या भेदक गोलंदाजीसमोर किंग्स इलेव्हन पंजाबचा डाव 137 धावात संपुष्टात आला आहे. उमेश यादवने सर्वाधिक चार, टिम साउदीने दोन तर शिवम मावी, सुनील नरेन आणि आंद्रे रसेलने प्रत्येकी एक विकेट घेतला. पंजाबकडून भानुका राजपक्षेने सर्वाधिक 31 धावा केल्या. डावाच्या अखेरीस राबाडाने 25 धावा केल्या. त्यामुळे पंजाबला 137 धावांपर्यंत पोहोचता आले.

  • 01 Apr 2022 09:02 PM (IST)

    पंजाबच्या 120 धावांवर 8 बाद

    पंजाबच्या 120 धावांवर 8 बाद झाले आहेत.

  • 01 Apr 2022 09:00 PM (IST)

    ओडियन स्मिथचा चौकार

    पंजाबच्या धावा 112 झाल्या असून  8 विकेट गेल्या आहेत.

  • 01 Apr 2022 08:58 PM (IST)

    कगिसो रबाडाचा षटकार

    कगिसो रबाडाने टीम साउदीच्या बॉलवर चौका मारला

  • 01 Apr 2022 08:55 PM (IST)

    राहुल चाहर उमेशच्या बॉलवर आऊट

    राहुल चाहर उमेशच्या बॉलवर आऊट, पंजाब किंग्स 102 वर 8 आऊट

  • 01 Apr 2022 08:50 PM (IST)

    हरप्रीत बरार आऊट

  • 01 Apr 2022 08:47 PM (IST)

    पंजाबचे 102 धावांवर  6 आऊट

    पंजाबचे 102 धावांवर  6 आऊट

  • 01 Apr 2022 08:42 PM (IST)

    शाहरुख खानला टिम साउदीने आऊट केलं

    शाहरुख खानला टिम साउदीने आऊट केलं. आता पंजाबचे सहा खेळाडू आऊट झाले आहेत. तर 97 धावांवर 6 आऊट

  • 01 Apr 2022 08:40 PM (IST)

    पंजाब किंग्सची सहावी विकेट

    पंजाब किंग्सची सहावी विकेट गेली आहे. शाहरुख खानला टिम साउदीने भोपळाही फोडू दिला नाही. शुन्यावर त्याला राणाकरवी झेलबाद केलं. सहा बाद 97 अशी स्थिती आहे.

  • 01 Apr 2022 08:27 PM (IST)

    पंजाब किंग्सचा डाव अडचणीत, निम्मा संघ मजबूत

    पंजाब किंग्सचा डाव अडचणीत सापडला असून निम्मा संघ तंबूत परतला आहे. लिविंगस्टोन पाठोपाठ राज बावा तंबूत परतला आहे. सुनील नरेनने त्याला क्लीन बोल्ड केलं. राज बावाने 11 धावा केल्या. पाच बाद 85 धावा झाल्या आहेत.

  • 01 Apr 2022 08:23 PM (IST)

    उमेश यादवने पंजाब दिला चौथा धक्का

    लिविंगस्टोन आणि राज बावाची जोडी मैदानात आहे. नऊ षटकात चार बाद 78 धावा झाल्या आहेत. उमेश यादवने लिविंगस्टोनची विकेट काढली. त्याने 19 धावा केल्या.

  • 01 Apr 2022 08:16 PM (IST)

    लिविंगस्टोन-राज बावा मैदानात

    आठ षटकात पंजाब किंग्सच्या तीन बाद 70 धावा झाल्या आहेत. लिविंगस्टोन 14 आणि राज बावा तीन धावांवर खेळतोय.

  • 01 Apr 2022 08:06 PM (IST)

    पावरप्लेच्या सहा ओव्हर्समध्ये पंजाबच्या तीन विकेट

    टिम साउदीच्या षटकात लियाम लिविंगस्टोनने पुढे येऊन सुंदर चौकार लगावला. पाचव्या चेंडूवर साउदीने शिखर धवनला विकेटकिपर सॅम बिलिंग्सकरवी झेलबाद केले. धवनने 16 धावा केल्या. त्याने एक चौकार आणि एक षटकार मारला. पावरप्लेच्या सहा ओव्हर्समध्ये पंजाबच्या तीन बाद 62 धावा झाल्या आहेत.

  • 01 Apr 2022 07:55 PM (IST)

    आक्रमक फलंदाजी करणारा राजपक्षे अखेर OUT

    शिवम मावीच्या षटकात आक्रमक फटकेबाजी करताना राजपक्षे आऊट झाला. राजपक्षेने नऊ चेंडूत 31 धावा केल्या. या खेळीत त्याने तीन चौकार, तीन षटकार लगावले. बाद होण्याआधी शिवम मावीच्या चार चेंडूत तीन षटकार आणि एक चौकार लगावला. चार षटकात पंजाबच्या दोन बाद 43 धावा झाल्या आहेत.

  • 01 Apr 2022 07:46 PM (IST)

    स्टेपआऊट होऊन शिखर धवनचा सुंदर षटकार

    तिसऱ्या षटकातील चौथ्या चेंडूवर स्टेपआऊट होऊन शिखर धवनने उमेश यादवला सुंदर षटकार ठोकला. तीन षटकांअखेरीस पंजाब किंग्सच्या एक बाद 21 धावा झाल्या आहेत.

  • 01 Apr 2022 07:41 PM (IST)

    शिखर धवन-राजपक्षे मैदानात

    दोन षटकात पंजाबच्या एक बाद 7 धावा झाल्या आहेत. टीम साउदीच्या शेवटच्या चेंडूवर राजपक्षेने चौकार मारला. राजपक्षे-धवनची जोडी मैदानात आहे.

  • 01 Apr 2022 07:36 PM (IST)

    उमेश यादवने पहिल्याच षटकात पंजाबला दिला झटका

    PBKS विरुद्ध KKR सामना सुरु झाला आहे. उमेश यादवने पहिलं षटक टाकलं. पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवर उमेश यादवने कॅप्टन मयंक अग्रवालला बाद केलं. अवघ्या एक रन्सवर पायचीत पकडलं. एक बाद 2 धावा अशी पंजाबची स्थिती आहे.

  • 01 Apr 2022 07:17 PM (IST)

    अशी आहे PBKS ची प्लेइंग 11

    मयंक अग्रवाल (कॅप्टन), शिखर धवन, लियाम लिविंगस्टन, भानुका राजपक्षे (विकेटकिपर), शाहरुख खान, ओडियन स्मिथ, राज बावा, अर्शदीप सिंह, हरप्रीत बराड, कगिसो रबाडा, राहुल चाहर

  • 01 Apr 2022 07:14 PM (IST)

    अशी आहे KKR ची प्लेइंग 11

    अजिंक्य रहाणे, वेंकटेश अय्यर, नितीश राणा, श्रेयस अय्यर, (कॅप्टन), सॅम बिलिंग्स, (विकेटकिपर) अँड्रे रसेल, शिवम मावी, सुनील नरेन, टीम साऊदी, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती

Published On - Apr 01,2022 7:07 PM

Follow us
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल.
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले....
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे.
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त.
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ.
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'.
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?.
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल.