6 शहरांमध्ये रंगणार आयपीएलच्या 14 व्या मोसमाचा थरार, मुंबईकर चाहत्यांसाठी निराशाजनक बातमी

IPL 2021 बाबत अजूनही कोणतीही औपचारिक माहिती देण्यात आलेली नाही. पण तरीही या पर्वाचे आयोजन 11 एप्रिल ते 6 जून दरम्यान करण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 10:39 AM, 28 Feb 2021
6 शहरांमध्ये रंगणार आयपीएलच्या 14 व्या मोसमाचा थरार, मुंबईकर चाहत्यांसाठी निराशाजनक बातमी
9 एप्रिलपासून आयपीएलच्या 14 व्या मोसमाला (IPL 2021 TimeTable) सुरुवात होणार आहे. या मोसमाचं आयोजन भारतात करण्यात आलं आहे.

मुंबई : आयपीएल लिलावानंतर क्रिकेट चाहत्यांना 14 व्या मोसमाचे (IPL 2021) वेध लागले आहे. हा मोसम खेळाडूंसह क्रिकेट चाहत्यांसह खास असणार आहे. कारण कोरोनानंतर पहिल्यांदाच आयपीएलचं आयोजन हे भारतात केलं जाणार आहे. याबाबत अजूनही कोणतीही औपचारिक माहिती देण्यात आलेली नाही. पण आयपीएल भारतातच होणार हे निश्चित मानलं (IPL 14 Season) जात आहे. दरम्यान आयपीएलचा थरार हा भारतातील 6 राज्यात रंगणार आहे. (Mumbai Ahmedabad Chennai Kolkata Bangalore and Delhi to host 14th IPL season)

याआधी फक्त 5 शहरांची नावं निश्चित होती. तर मुंबईबाबत निर्णय झाला नव्हता. पण सरकारने परवानगी दिल्याने आता मुंबईलाही आयपीएलच्या 14 व्या मोसमाच्या यजमानपदाचा मान मिळाला आहे. त्यामुळे आता मुंबईसह, दिल्ली, अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरु आणि कोलकातामध्ये सामन्यांचं आयोजन करण्यात येणार आहे.

मुंबईत अटीशर्थींसह परवानगी

सरकारने मुंबईत सामने खेळवण्याची परवानगी तर दिली आहे. पण त्यासह काही अटीशर्थीही घातल्या आहेत. म्हणजेच मुंबईत होणाऱ्या या सामन्यांमध्ये क्रिकेट रसिकांना स्टेडियममध्ये जाण्याची परवानगी नसणार आहे. म्हणजेच प्रेक्षकांच्या अनुपस्थितीतच हे सामने खेळवण्यात येणार आहेत. यामुळे मुंबईकर चाहत्यांसाठी ही निराशाजनक बाब आहे. कोरोनामुळे हा कठोर निर्णय घेण्यात आला आहे. तर मुंबई व्यतिरिक्त इतर 5 शहरांमध्ये स्टेडियमच्या 50 टक्के क्षमतेच्या प्रेक्षकांना उपस्थित राहण्याची परवानगी मिळू शकते.

अजून वेळापत्रक नाही

या 14 व्या मोसमाचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं नाही. पण या स्पर्धेचं आयोजन हे 11 एप्रिल ते 6 जून दरम्यान होईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत मार्च महिन्यात आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत वेळापत्रकाबाबतची घोषणा होऊ शकते. तसेच लवकर वेळापत्रक जाहीर करावे, अशी विनंती गव्हर्निंग काऊन्सिलला ब्रॉडकास्टर्सनी केली आहे. जेणेकरुन त्यांना नियोजन करण्यासाठी आवश्यक तेवढा वेळ मिळेल.

आयपीएलमधील सर्वात यशस्वी टीम

मुंबई इंडियन्स आयपीएलमधील सर्वात यशस्वी टीम आहे. मुंबईने एकूण 13 मोसमांपैकी 5 वेळा विजेतेपद पटकावलं आहे. मुंबईने 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 अशा एकूण 5 पर्वांमध्ये आयपीएल ट्रॉफी उंचावली आहे. मुंबईच्या गोटात यावेळेस आणखी अनुभवी खेळाडू दाखल झाले आहेत. यामुळे मुंबईकडून यावेळेसही विजेतेपदाची हॅटट्रिक पूर्ण करणार का, याकडे मुंबईच्या चाहत्यांचे लक्ष असणार आहे.

14 व्या मोसमाबाबत गांगुली काय म्हणाला होता?

कोरोनामुळे 13 व्या मोसमाचं आयोजन यूएईमध्ये करण्यात आलं होतं. यामुळे आयपीएलच्या आगामी 14 पर्वाचं आयोजन कुठे होणार, हा मोठा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. फेब्रुवारी 2021 पर्यंत कोरोनावर लस सापडल्यास नक्कीच या आगामी पर्वाचं आयोजन भारतात केलं जाईल, असा आशावाद बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने काही महिन्यांपूर्वी व्यक्त केला होता. आता कोरोना लस सापडली आहे. यामुळे या 14 मोसमाचं आयोजन हे नक्कीच भारतात केलं जाईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या :

Chris Morris | बेस प्राईज अवघी 75 लाख, मात्र ख्रिस मॉरिसला IPL इतिहासातील सर्वात मोठी किंमत!

IPL 2021 | आयपीएलच्या 14 व्या मोसमासाठी डेव्हिड वॉर्नर उत्सुक, ऑरेंज आर्मी विजेतेपद पटकावणार?

Vijay Hazare Trophy | श्रेयसची शतकी खेळी, शार्दुलचा भेदक मारा, मुंबईचा राजस्थानवर 67 धावांनी विजय

(Mumbai Ahmedabad Chennai Kolkata Bangalore and Delhi to host 14th IPL season)