IPL 2026 Retained : मुंबई इंडियन्सचा 9 खेळाडूंना दणका, पर्समध्ये उरले इतके पैसे
आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी मुंबई इंडियन्स संघांची पुनर्बांधणी केली आहे. असं असताना दोन अष्टपैलू खेळाडू ट्रेड विंडोच्या माध्यमातून संघात घेतलं तर 9 खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. विशेष म्हणजे दीपक चाहरला कायम ठेवलं आहे.

आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी पाच वेळा जेतेपदाला गवसणी घालणाऱ्या मुंबई संघात बदल केले आहेत. मिनी लिलावापूर्वी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. टीम इंडियाचा अष्टपैलू शार्दुल ठाकुर आणि वेस्ट इंडिजचा अष्टपैलू शेरफेन रदरफोर्डची यशस्वी डील केली. शार्दुल ठाकुरसाठी 2 कोटी आणि रदरफोर्डसाठी 2.60 कोटी रुपये मोजले. त्यामुळे मुंबई इंडियन्सचं पर्स मायनसमध्ये गेलं होतं. त्यामुळे कोणत्या खेळाडूंना रिलीज करणार याची उत्सुकता होती. यात दीपक चाहरचं नाव आघाडीवर होतं. पण मुंबई इंडियन्स त्याला संघात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर इतर 9 खेळाडूंना संघातून बाहेर केलं आहे. यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनचं नाव देखील आहे. मेगा लिलावात मुंबई इंडियन्सने 30 लाख रुपये खर्च करून त्याला घेतलं होतं. मात्र यावेळी त्याला रिलीज केलं आहे.
मुंबई इंडियन्सने या खेळाडूंना केलं रिटेन
मुंबई इंडियन्सने रिटेन केल्या खेळाडूंची यादी समोर आली आले. हार्दिक पंड्या (16.35 कोटी), सूर्यकुमार यादव (16.35 कोटी), रोहित शर्मा (16.30 कोटी), जसप्रीत बुमराह (18 कोटी), तिलक वर्मा (8 कोटी), ट्रेंट बोल्ट (12.50 कोटी), नमन धीर (5.25 कोटी), रॉबिन मिन्ज (65 लाख), रियान रिकेल्टन (1 कोटी), दीपक चाहर (9.25 कोटी), अल्लाग गजनफर (4.80 कोटी), विल जॅक्स (5.25 कोटी), अश्वनी कुमार (30 लाख), मिचेल सँटनर (2 कोटी), राज अंगद बाबा (30 लाख) या खेळाडूंना रिटेन केलं आहे. यात दोन खेळाडू ट्रेड विंडोतून घेतले आहेत. त्यांचासाठी 4 कोटी 60 लाख मोजले. म्हणजेत एकूण 120 कोटी पैकी 117.25 कोटी खर्च झाले आहेत.
रिलीज केलेल्या खेळाडूंची नावं
सत्यनारायण (30 लाख), रीस टॉप्ली (75 लाख), केएल श्रिजित (30 लाख), कर्ण शर्मा (50 लाख), अर्जुन तेंडुलकर (30 लाख), बेवोन जॅकब्स (30 लाख), मुजीब उर रहमान (2 कोटी), लिजाड विलियम्स (75 लाख), विग्नेश पुथुर (30 लाख) या खेळाडूंना रिलीज केलं आहे. या खेळाडूंना रिलीज करून दोन खेळाडूंना संघात घेतलं असंच म्हणावं लागेल. कारण मुंबईच्या पर्समध्ये 20 लाख होते आणि त्यात 4.60 कोटीचे दोन खेळाडू ट्रेडने घेतले. त्यामुळे या खेळाडूंना रिलीज करून हे पैसे वसूल केल्याचं दिसत आहे. आता पर्समध्ये 2.75 कोटी शिल्लक राहिलेत. आता या पैशात कोणाला संघात घेणार हा विषय चर्चेचा आहे.
