AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Test Cricket : तिसर्‍या कसोटीतून स्टार ओपनर ‘आऊट’, टीमला मोठा झटका, या खेळाडूला संधी

Cricket News : दुसऱ्या कसोटीत लाजिरवाण्या पराभवानंतर स्टार ओपनर तिसऱ्या सामन्यातून बाहेर झाला आहे. त्याच्या जागी दुसऱ्या खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे.

Test Cricket : तिसर्‍या कसोटीतून स्टार ओपनर 'आऊट', टीमला मोठा झटका, या खेळाडूला संधी
icc wtc trophyImage Credit source: Paul Kane/Getty Images
| Updated on: Dec 10, 2024 | 10:29 PM
Share

क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर स्टार ओपनर तिसऱ्या सामन्यातून बाहेर झाला आहे. न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-2025 या साखळी अंतर्गत 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. इंग्लंडने दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडवर 323 धावांच्या फरकाने विजय मिळवला. इंग्लंडने या विजयासह मालिकाही जिंकली. इंग्लंड या मालिकेत 2-0 अशा फरकाने आघाडीवर आहे. मात्र इंग्लंड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या स्पर्धेतून बाहेर झालेली आहे. तसेच न्यूझीलंडचाही पत्ता कट झाला आहे. उभयसंघातील तिसरा आणि अंतिम कसोटी सामना हा 14 डिसेंबरपासून खेळवण्यात येणार आहे. मात्र त्याआधी तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंडचा सलामीवीर डेव्हॉन कॉनव्हे खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

न्यूझीलंड टीममध्ये कॉनव्हे याच्या जागी मार्क चॅपमॅन याचा समावेश केला आहे. कॉनव्हे आणि त्याची पत्नी पहिल्यांदा आई-वडील होणार आहेत. त्यामुळे कॉनव्हे तिसऱ्या सामन्यासाठी उपलब्ध नसणार, अशी माहिती न्यूझीलंड क्रिकेट टीमच्या बॅल्ककॅप्स या सोशल मीडिया अकाउंटवरुन देण्यात आली आहे.

कॉनव्हे दोन्ही सामन्यात अपयशी

दरम्यान कॉनव्हेला पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यात काही खास करता आलं नाही. कॉनव्हेने पहिल्या सामन्यातील दोन्ही डावात 2 आणि 8 अशा धावा केल्या. तर दुसर्‍या सामन्यातील पहिल्या डावात 11 धावा केल्या. तर दुसऱ्या डावात भोपळाही फोडता आला नाही.

कॉनव्हे तिसऱ्या सामन्यातून आऊट

टेस्ट सीरिजसाठी इंग्लंड टीम : बेन स्टोक्स (कर्णधार), झॅक क्रॉली, बेन डकेट, जेकब बेथेल, जो रूट, हॅरी ब्रूक, ऑली पोप (विकेटकीपर), ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, ब्रायडन कार्स, शोएब बशीर, रेहान अहमद, ऑलिव्हर रॉबिन्सन, मॅथ्यू पॉट्स, जॅक लीच आणि ऑली स्टोन.

कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ : टॉम लॅथम (कर्णधार), मार्क चॅपमॅन, केन विल्यमसन, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, नॅथन स्मिथ, मॅट हेन्री, टिम साउथी, विल्यम ओरुर्के, मिचेल सँटनर, जेकब डफी आणि विल यंग.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.