AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बापरे! ‘या’ फलंदाजाने गोलंदाजाना सळो की पळो केलं, एका डावात ठोकल्या तब्बल 424 धावा

सामन्यात दुहेरी किंवा तिहेरी शतक ठोकताना फलंदाजाना जीवाचं रान करावं लागतं. पण या फलंदाजाने तर एका डावातच धावांचा डोंगर रचला.

बापरे! 'या' फलंदाजाने गोलंदाजाना सळो की पळो केलं, एका डावात ठोकल्या तब्बल 424 धावा
कसोटी सामना (प्रतिकात्मक फोटो)
| Edited By: | Updated on: Jul 16, 2021 | 3:44 PM
Share

मुंबई : सामन्यात तिहेरी संख्येपर्यंत पोहोचल्यानंचर कोणत्याही फलंदाजाला होणार आनंद हा त्याच्या चेहऱ्यावर लगेचच दिसतो.  त्यात जर शतकाचे दुहेरी शतक झाले तर क्या बात! कसोटी क्रिकेटमध्येतर तिहेरी शतक ठोकणारे दिग्गजही आहेत. पण आज आम्ही तुम्हाला ज्याच्याबद्दल सांगतोय त्या फलंदाजाने तर एका डावात शतक, दुहेरी शतक किंवा तिहेरी शतक नाही तर तब्बल 400 हून अधिक धावा ठोकत विश्वविक्रम प्रस्‍थापित केला. या क्रिकेटपटूने आजच्याच दिवसी म्हणजे 16 जुलैला हा पराक्रम केला होता.

आर्ची मॅक्‍कलारेन (Archie MacLaren) असे या खेळाडूचे नाव असून त्यांनी इंग्‍लंड संघाकडून 35 कसोटी सामने खेळले आहेत. आर्ची यांनी काउंटी क्रिकेट चॅम्पियनशिपमध्येही आपल्या फलंदाजीने अनेक विक्रम आपल्या नावे केले होते. पण यातील एक सामना जो 16 जुलैला लंकाशर संघाकडून त्यांनी समरसेट विरुद्ध खेळला होता. त्यात त्यांनी तब्बल 424 धावांची असामान्य खेळी केली होती. हा सामना 1895 मध्ये इंग्लंडच्या भूमित झाला होता. हा स्कोर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वात मोठा व्‍यक्तिगत स्‍कोर होता. जो 99 वर्षांनी वेस्‍टइंडीजच्या दिग्गज क्रिकेटपटू ब्रायन लारा याने 1994 मध्ये मोडला.

424 सामन्यांत 47 शतकांसह 22 हजार धावा

आर्ची मॅक्‍कलारेन यांनी इंग्‍लंडकडून 35 कसोटी सामने खेळले. ज्यात 33.87 च्या सरासरीने 1 हजार 931 धावा केल्या. ज्यामध्ये  5 शतकांसह 8 अर्धशतक ठोकली.सोबतच 29 झेल देखील आर्ची यांनी टिपले. तसेच प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आर्ची यांनी 424 प्रथम श्रेणी सामन्यांत 34.15 च्या सरासरीने 22 हजार 236 धावा ठोकल्या.  47 शतकांसह 95 अर्धशतकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यष्टीरक्षक नसूनही त्यांनी 452 झेल देखील टिपले होते.

हे ही वाचा :

अरेरे! याहून खराब गोलंदाजी पाहिली नसेल, 97 ओव्हर टाकल्या, 281 धावा लुटवल्या, तेव्हा जाऊन पहिली विकेट मिळाली

VIDEO : बाप से बेटा सवाई, मुथय्या मुरलीथरनच्या लेकाचा ‘सेम टू सेम’ पराक्रम

शिखरची बासरी, पृथ्वी शॉचं गाणं, हा सुमधूर व्हिडीओ पाहाच

(On this day England Cricketer Archie Maclaren Hits 424 run in County Cricket Against Somerset)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.