AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pakistan Cricket : मोहम्मद रिझवानची कर्णधारपदावरुन हकालपट्टी, आफ्रिदीच्या जावयाकडे नेतृत्वाची जबाबदारी

Pakistan New ODI Captain : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मोठा निर्णय घेत एकदिवसीय संघाचा कर्णधार बदलला आहे. मात्र असा निर्णय घेण्यामागे नक्की कारण काय? याबाबत समजू शकलेलं नाही.

Pakistan Cricket : मोहम्मद रिझवानची कर्णधारपदावरुन हकालपट्टी, आफ्रिदीच्या जावयाकडे नेतृत्वाची जबाबदारी
Mohammad Rizwan and Shaeen Shah AfridiImage Credit source: PTI
| Updated on: Oct 21, 2025 | 3:05 PM
Share

पाकिस्तान क्रिकेट वर्तुळातून मोठी अपडेट समोर आली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने तडकाफडकी एकदिवसीय संघाचा कर्णधार बदलला आहे. पीसीबीने मोहम्मद रिझवान याची एकदिवसीय कर्णधारपदावरुन हकालपट्टी केली आहे. तर माजी ऑलराउंडर शाहिद आफ्रिदी याचा जावई आणि पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहिन आफ्रिदी याला नेतृत्वाची जबाबदारी दिली आहे. आयसीसीने सोशल मीडियावरुन प्रसिद्धीपत्रकाद्वारे  क्रिकेट चाहत्यांना याबाबतची माहिती दिली आहे.

इस्लामाबादमध्ये पीसीबी निवड समिती आणि वनडे- टी 20i कोच माईक हेसन यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीनंतर मोहम्मद रिझवान याला कर्णधारपदावरुन हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच शाहिनची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली. मात्र पीसीबीने असा तडकाफडकी निर्णय का घेतला? हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.

रिझवानला कर्णधारपदावरुन कशामुळे हटवण्यात आलं? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. तसेच रिझवाननेही प्रतिक्रिया दिलेली नाही.

ईएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, निवड समितीच्या बैठकीत मुख्य प्रशिक्षक माईक हेसन उपस्थित होते. मात्र कुणा एकाच्या सांगण्यावरुन कर्णधारपद काढण्यात आलेलं नाही.

शाहिन दुसऱ्यांदा कर्णधारपदी

शाहिनची कर्णधारपदी नियुक्ती करण्याची ही दुसरी वेळ ठरली आहे. शाहिनने याआधी पाकिस्तानच्या टी 20i संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सांभाळली होती. मात्र शाहिनला काही खास करता आलं नव्हतं. शाहिनच्या नेतृत्वात पाकिस्तानचा 5 सामन्यांच्या मालिकेत 1-4 अशा एकतर्फी फरकाने पराभव झाला होता. त्यामुळे आता शाहिन एकदिवसीय कर्णधार म्हणून किती यशस्वी ठरेल? याबाबत आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

वेगवान गोलंदाजाकडे एकदिवसीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी

कर्णधार रिझवानची आकडेवारी

रिझवानने पाकिस्तानचं एकूण 20 एकदिवसीय सामन्यांमध्ये पाकिस्तानचं नेतृत्व केलं. रिझवानने पाकिस्तानला 9 सामन्यांमध्ये विजयी केलं. तर 11 वेळा पराभवाचा सामना करावा लागला. तसेच रिझवानने कर्णधार म्हणून 41.67 च्या सरासरीने एकूण 625 धावा केल्या होत्या. तसेच रिझवानने त्याच्याच नेतृत्वात पाकिस्तानला दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियात मालिका जिंकून दिली होती.

दरम्यान शाहिन आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारणार आहे.सध्या उभयसंघात 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. पाकिस्तान या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. त्यानंतर 3 टी 20I मालिका खेळवण्यात येणार आहे. तर 4 ते 8 नोव्हेंबर दरम्यान एकदिवसीय मालिका होणार आहे. शाहिन या मालिकेतून कर्णधार म्हणून नव्या इनिंगची सुरुवात करणार आहे.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.