Team India : भुवनेश्वरकडून जसप्रीत बुमराहची पाठराखण, इंग्लंडविरुद्ध 3 सामन्यांमध्ये खेळण्यावरुन म्हणाला….
Bhuvneshwar Kumar On Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह याला इंग्लंड दौऱ्यात फक्त 3 सामन्यांमध्येच खेळल्याने टीकेचा सामना करावा लागला. मात्र सातत्याने तिन्ही प्रकारात खेळणं किती अवघड असतं हे सांगत भारताचा गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने बुमराहची पाठराखण केलीय. जाणून घ्या.

टीम इंडियाचा मॅचविनर आणि क्रिकेट विश्वातील नंबर 1 गोलंदाज जसप्रीत बुमराह गेल्या अनेक दिवसांपासून वर्कलोड मॅनेजमेंटमुळे चांगलाच चर्चेत आहे. बुमराह कोणतीही दुखापत नसताना इंग्लंड विरुद्ध वर्कलोकमुळे 5 पैकी फक्त 3 सामन्यांमध्येच खेळला. बुमराह टीम इंडिया अडचणीत असताना निर्णायक सामन्यांमध्ये खेळला नाही. त्यामुळे बुमराहवर सडकून टीका करण्यात आली. बुमराहने वर्कलोडऐवजी देशाला प्राधान्य द्यायला हवं होतं, असं मत नेटकऱ्यांनी व्यक्त केलं. तसेच बुमराहच्या या भूमिकेकमुळे आजी-माजी खेळाडूंनीही नाराजी व्यक्त केली. मात्र भारताचा गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने बुमराहची पाठराखण केली आहे. भुवीने बुमराहबाबत काय म्हटलं? हे जाणून घेऊयात.
भुवनेश्वर कुमार याने काय म्हटलं?
भुवनेश्वर कुमार याने जसप्रीत बुमराहची बाजू घेतली. भुवीने बुमराहची पाठराखण करत त्याच्या भूमिकेचं स्वागत केलं आहे. बुमराह इंग्लंडमध्ये 3 सामने खेळला. मात्र एका खेळाडूला तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळणं किती अवघड असतं हे लोकं समजत नाहीत, असं भुवीने म्हटलं.
“बुमराहची बॉलिंग एक्शन पाहता त्याला दुखापत होणं स्वाभाविक आहे. दुखापत कुणालाही होऊ शकते. बुमराह गेल्या अनेक वर्षांपासून सर्व फॉर्मेटमध्ये खेळत आहे. तसेच सातत्याने चांगली कामगिरी करत राहणं सोपं नसतं. बुमराहने 5 पैकी 3 सामने खेळण्यावरुन मला काहीही आक्षेप नाही. जर निवड समितीला माहितीय की तो काय करु शकतो आणि त्याने ते समाधानी आहेत, याचा अर्थ असाच की त्यांनाही (निवड समितीला) विश्वास आहे की बुमराह 3 सामन्यांमध्ये छाप सोडू शकतो”, असं भुवीने एका पॉडकास्टमध्ये म्हटलं.
एखादा खेळाडू सर्वच्या सर्व 5 सामने न खेळता 3 मध्येच खेळतो आणि त्यात सर्वस्व देतो, हे पण खूप झालं. सातत्याने वेगवेगळ्या फॉर्मेटमध्ये खेळत राहणं किती अवघड असतं हे लोकांना समजत नाही”, असंही भुवीने नमूद केलं.
जसप्रीत बुमराह याची इंग्लंड दौऱ्यातील कामगिरी
दरम्यान जसप्रीत बुमराह इंग्लंड दौऱ्यातील पहिल्या, तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यात खेळला. जसप्रीत बुमराह याने या 3 सामन्यांमधील एकूण 5 डावात 14 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. बुमराहने या मालिकेत 119.4 ओव्हर टाकल्या. तसेच 2 वेळा 5 विकेट्स घेण्याची कामगिरीही केली.
