AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2021: चार वर्षानंतर भारतीय संघात ‘या’ खेळाडूची निवड, भाविनक ट्विट करत मांडल्या भावना

भारताचे अंतिम 15 शिलेदार जे टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. त्यांची नाव भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने जाहीर केली असून एका खेळाडूला तब्बल चार वर्षानंतर मर्यादीत षटकांच्या फॉर्मेटमध्ये टी इंडियामध्ये खेळायला मिळणार आहे.

T20 World Cup 2021: चार वर्षानंतर भारतीय संघात 'या' खेळाडूची निवड, भाविनक ट्विट करत मांडल्या भावना
आर. आश्विन
| Edited By: | Updated on: Sep 09, 2021 | 3:00 PM
Share

मुंबई : आगामी आयसीसी टी-20 विश्व चषकासाठी (T 20 World Cup 2021) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) भारतीय संघाची (Team India for WC) घोषणा बुधवारी (8 सप्टेंबर) केली. 15 सदस्य असणाऱ्या या संघासोबत  3 राखीव खेळाडूंचीही निवड करण्यात आली आहे. या सर्व खेळाडूंमध्ये सर्वाधिक चर्चा एका नावाची आहे. हे नाव म्हणजे भारताचा दिग्गज फिरकीपटू रवीचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin). 35 वर्षीय आश्विन तब्बल चार वर्षानंतर म्हणदे 2017 नंतर पहिल्यांदाच मर्यादीत षटकांच्या फॉर्मेटमध्ये टीम इंडियात असेल. इतक्या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी आश्विनचे संघात पुनरागमन झाल्यामुळे त्याचे चाहते खुश आहेतच पण क्रिकेट तज्ज्ञांनी देखील हा एक उत्तम निर्णय असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान या आनंदाच्या प्रसंगी आश्विनने एक भावनिक ट्विट केलं असून यामध्ये त्याने 2017 मध्ये स्वत:लाच म्हटलेली एक गोष्ट शेअर केली आहे.

बीसीसीआयने 15 सदस्यीय संघाची घोषणा करताच आश्विनने एक ट्विट केलं. यामध्ये त्याने आनंद व्यक्त करत आभारही मानले. आश्विनने ट्विटमध्ये एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यात त्याने इंग्रंजीत लिहिलेली एक शानदार पोस्ट दिसून येते. यात त्याने लिहिलं आहे की, “प्रत्येक गुहेच्या शेवटी उजेड असतोच. पण जे लोक या उजेडावर विश्वास ठेवतात त्यांनाच हा उजेड दिसेल.

आश्विनची भाविक पोस्ट व्हायरल

या वाक्याला आश्विनने त्याच्या भिंतीवर लिहून घेतलं आहे. फोटोवर त्याने लिहिलं आहे की, “2017 मध्ये मी ही गोष्ट अनेकदा माझ्या डायरीत लिहिली होती. त्यानंतर माझ्या भिंतीवरही मी तेच लिहून घेतलं. ज्या गोष्टी आपण वाचतो आणि आपल्याला आवडतात त्याला आपण लवकरात लवकर त्या आत्मसात करु शकतो. ज्याचा आपल्याला चांगलाच फायदा होऊ शकतो.

टी- 20 विश्वचषकासाठी भारतीय संघ – 

भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), के एल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, राहुल चहर, रविचंद्रन अश्विन, अक्सार पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी

राखीव: श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर आणि दिपक चहर

हे ही वाचा :

T20 world Cup 2021: शिखरच्या गैरहजेरीत रोहित बरोबर सलामीला कोण?, विराट नाही तर ‘या’ खेळाडूवर जबाबदारी

T20 world Cup 2021: भारतीय संघात 5 फिरकी गोलंदाज, इतके फिरकीपटू घेण्यामागे ‘हे’ आहे कारण

T20 world Cup 2021: विराट कोहलीचे 2 एक्के, तरीही टीम इंडियात स्थान नाहीच!

(R Ashwin Shares Emotional wall Post after seletinh in team indias squad for t20 world cup 2021)

दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.