विजय हजारे ट्रॉफीत 19 षटकार ठोकत वैभव सूर्यवंशीला टाकलं मागे, 273 धावांची केली खेळी
विजय हजारे ट्रॉफीत तिसऱ्या टप्प्याचे सामने पार पडले. रेल्वे विरुद्ध सर्व्हिसेज यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात रेल्वेने सर्व्हिसेसला 84 धावांनी पराभूत केलं. या सामन्यात रवि सिंहचा झंझावात दिसून आला.

देशांतर्गत विजय हजारे ट्रॉफी स्पर्धा प्रत्येक सामन्यानंतर एक पाऊल पुढे टाकताना दिसत आहे. तिसऱ्या टप्प्याचे सामने पार पडले. या टप्प्यात रेल्वे विरुद्ध सर्व्हिसेज हा सामना पार पडला. या सामन्यात रेल्वेने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 7 गडी गमवून 365 धावा केल्या. तसेच विजयासाठई 366 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठताना सर्व्हिसेजचा संघ 47.2 षटकात 10 गडी गमवून 281 धावांवर बाद झाला. हा सामना रेल्वेने 84 धावांनी जिंकला. या सामन्यात रेल्वेच्या रवि सिंगचा झंझावात पाहायला मिळाला. रवि सिंहने या सामन्यात 46 चेंडूत 88 धावांची खेळी केली. यात त्याने 7 षटकार मारले. तसेच षटकारांच्या बाबतीत वैभव सूर्यवंशीच्या पुढे निघून गेला. वैभव सूर्यवंशीने या स्पर्धेत एकूण 16 षटकार मारले आहेत. तर रवि सिंह त्याच्या पुढे निघून गेला. रविने या सामन्यातील 3 षटकारांसह एकूण 19 षटकार ठोकले आहेत.
विजय हजारे ट्रॉफीत रवि सिंह रेल्वेचा विकेटकीपर फलंदाज आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या तीन सामन्यात 136.5 च्या सरासरीने 273 धावा ठोकल्या आहेत. यावेळी रवि सिंगचा स्ट्राईक रेट हा 138पेक्षा जास्त आहे. रवि सिंहने हरियाणाविरुद्धच्या सामन्यातच आक्रमक बाणा दाखवून दिला होता. तेव्हा त्याने 81 चेंडूत नाबाद 109 धावांची खेळी केली होती. त्याच्या या खेळीमुळे 268 धावांच लक्ष्य 43.4 षटकात गाठता आलं होतं. त्यानंतर आंध्र प्रदेशविरुद्धच्या सामन्यात 70 चेंडूत 76 धावा केल्या होत्या. आता सर्व्हिसेजविरूद्ध 46 चेंडूत 88 धावा केल्या. यावेळी त्याने 7 षटकार आणि 6 चौकार मारले.
आयपीएल मिनी लिलावात रवि सिंहला चांगला भाव मिळाला होता. राजस्थान रॉयल्सने त्याच्यासाठी बोली लावली. राजस्थानने त्याच्या 95 लाख मोजले आणि संघात घेतलं. युपी टी20 लीग स्पर्धेतही रवि सिंहने चांगली खेळी केली होती. रवि सिंहची खासियत म्हणजे विकेटकीपिंगसोबत सामना संपण्याची ताकद त्याच्या फलंदाजीत आहे. त्यामुळे शेवटच्या षटकात कमाल करू शकतो. हातातून गेलेला सामना खेचून आणू शकतो. त्यामुळे राजस्थानला मधल्या फळीत एक चांगला फलंदाज मिळाला असं म्हणायला हरकत नाही. आयपीएल 2026 स्पर्धेत रवि सिंह प्लेइंग 11 चा भाग असू शकतो.
