Ranji Trophy : महाराष्ट्राने 144 धावांनी सामना जिंकला, तर मुंबईचा छत्तीसगड विरुद्धचा सामना ड्रॉ
रणजी ट्रॉफी स्पर्धेतील पहिल्या टप्प्यातील दुसऱ्या फेरीचे सामने पार पडले. या फेरीत महाराष्ट्राने विजय मिळवला आहे. तर मुंबईचा सामना ड्रॉ झाला आहे. विदर्भ आणि झारखंडमध्ये पहिला डावच खेळला गेला.

रणजी ट्रॉफी 2025-2026 स्पर्धेतील एलिट ग्रुप स्पर्धेत एकूण 32 संघ आहेत. ए, बी, सी, डी असे एकूण 4 गट असून प्रत्येक गटात 8 संघ आहेत. प्रत्येक गटात आता दुसरा फेरीचा सामना पार पडला आहे. मुंबईचा संघ डी गटात असून दोन पैकी एका सामन्यात विजय आणि एक सामना ड्रॉ झाला आहे. त्यामुळे 9 गुण आणि +0.267 नेट रनरेटसह अव्वल स्थानी आहे. मुंबईचा दुसरा सामना छत्तीसगडविरुद्ध होता. या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 416 धावांची मोठी खेळी केली. छत्तीगडने पहिल्या डावात 217 धावा केल्या. मुंबईकडे 199 धावांची आघाीडी होती. त्यामुळे छत्तीसगडला फॉलोऑन दिला होता. पण छत्तीसगडने दुसऱ्या डावात दमदार खेळी केली. त्यांनी 3 गडी गमवून 201 धावा केल्या आणि सामना ड्रॉ केला.
दुसरीकडे बी गटात असलेल्या महाराष्ट्राचा सामना छत्तीसगडशी झाला. या सामन्यात महाराष्ट्राने चंदीगडला 144 धावांनी पराभूत केले. चंदीगडने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्राने पहिल्या डावात 313 धावांची खेळी केली. तर चंदीगडने पहिल्या डावात 209 धावा केल्या. महाराष्ट्राकडे पहिल्या डावात 104 धावांची आघाडी होती. या धावांसह महाराष्ट्राने दुसऱ्या डावात 3 गडी गमवून 359 धावा केल्या. तसेच विजयासाठी 463 धावांचं आव्हान दिलं. पण चंदीगडचा संघ 319 धावा करू शकला. महाराष्ट्राने हा सामना 319 धावांनी जिंकला. महाराष्ट्राचा संघ बी गटात पहिल्या स्थानावर असून 9 गुण आणि -0.006 नेट रनरेट आहे.
विदर्भ आणि झारखंड यांच्यात दुसरा सामना पार पडला. हा सामना देखील ड्रॉ झाला. झारखंडने 332 धावांची खेळी केली होती. तर विदर्भने 5 गडी गमवून 492 धावा पहिल्या डावात केल्या. त्यामुळे या सामन्याचा निकाल काही लागला नाही. ए गटात विदर्भाचा संघ 10 गुण आणइ +1.295 नेट रनरेटसह पहिल्या स्थानावर आहे. 1 नोव्हेंबरपासून प्रत्येक संघ या स्पर्धेतील तिसरा सामना खेळणार आहे. मुंबईचा या स्पर्धेतील तिसरा राजस्थानशी होणार आहे. हा सामना जयपूरला होणार आहे. तर महाराष्ट्राचा सामना सौराष्ट्राशी होणार आहे. विदर्भाचा पुढचा सामना तामिळनाडूशी होणार आहे.
