RCB vs KKR, Eliminator Live Score, IPL 2021: रोमहर्षक सामन्यात केकेआर 4 विकेट्सनी विजयी, आरसीबी स्पर्धेतून बाहेर

| Updated on: Oct 11, 2021 | 11:49 PM

RCB vs KKR Live Score in Marathi: दिल्ली कॅपिल्सला नमवत धोनीचा चेन्नई संघ अंतिम फेरीत पोहोचला असून आता दुसरा संघ कोणता? ही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या दृष्टीने आजचा केकेआऱ विरुद्ध आरसीबी सामना अत्यंत महत्त्वाचा आहे.

RCB vs KKR, Eliminator Live Score, IPL 2021: रोमहर्षक सामन्यात केकेआर 4 विकेट्सनी विजयी, आरसीबी स्पर्धेतून बाहेर
आरसीबी विरुद्ध केकेआर

अंतिम सामन्याच्या दिशेने आगेकूच करण्यासाठी केकेआर आणि आरसीबी यांच्यात शारजाहच्या मैदानात सामना पार पडला. सामन्यात नाणेफेक जिंकत आरसीबीने फलंदाजी निवडली. पण हा निर्णय संघासाठी खास चांगला ठरला नाही. केकेआरच्या बोलिंग अटॅकसमोर आरसीबी गारद पडली. कर्णधार कोहली (39) सोडता एकाही खेळाडूला खास कामगिरी करता न आल्याने संघ 138 धावांपर्यंतच मजल मारु शकला. पण नंतर गोलंदाजीमध्ये आरसीबीनेही उत्तम चमक दाखवली. पण केकेआरच्या गिल, अय्यर, राणा आणि नारायण या सर्वांनी दिलासादायक फलंदाजी करत मिळून संघाला 4 विकेट्सनी विजय मिळवून दिला. अखेरच्या ओव्हरपर्यंत गेलेल्या या सामन्यात आऱसीबी पराभूत झाल्याने विराटचं विजयी कर्णधार होण्याचं स्वप्नही तुटलं आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 11 Oct 2021 11:09 PM (IST)

    RCB vs KKR: केकेआर 4 विकेट्सनी विजयी

    अखेरच्यो रोमहर्षक षटकात केकेआरने हव्या असलेल्या धावा करत चार विकेट्सनी आरसीबीला मात दिली आहे.

  • 11 Oct 2021 10:54 PM (IST)

    RCB vs KKR: 25 धावा करुन सुनील बाद

    महत्त्वपूर्ण अशा 25 धावा करुन सुनील नारायण बाद झाला आहे. मोहम्मद सिराजने त्याती विकेट घेतली.

  • 11 Oct 2021 10:43 PM (IST)

    RCB vs KKR: नितीश राणा बाद

    चांगल्या लयीत असलेला नितीश राणा 26 धावा करुन बाद झाला आहे. चहलने त्याची विकेट घेतली आहे. आता आरसीबीला विजयासाठी 4 षटकात 19 धावांची गरज आहे.

  • 11 Oct 2021 10:19 PM (IST)

    RCB vs KKR: केकेआरला मोठा झटका

    सुरुवातीपासून उत्तम फलंदाजी करत संघाचा डाव सांभाळणारा केकेआरचा सलीमीवीर व्यंकटेश अय्यर बाद झाला आहे. आरसीबीच्या हर्षल पटेलच्या चेंडूवर केएस भरतने त्याचा झेल घेतला आहे.

  • 11 Oct 2021 10:03 PM (IST)

    RCB vs KKR: राहुल त्रिपाठीही बाद

    केकेआरला काही वेळाच्याच अंतरात दोन विकेट्स गमवावे लागले आहेत. केकेआरचा राहुल त्रिपाठी आरसीबीच्या चहलच्या चेंडूवर बाद झाला आहे.

  • 11 Oct 2021 09:58 PM (IST)

    RCB vs KKR: केकेआरला पहिला धक्का

    केकेआरचा सलामवीर शुभमन गिलला आरसीबीचा आघाडीचा गोलंदाज हर्षल पटेलने बाद केलं आहे. एबीडीने त्याची कॅच घेतली आहे. गिल 29 धावा करुन बाद झाला.

  • 11 Oct 2021 09:34 PM (IST)

    RCB vs KKR: केकेआरचे सलामीवीर मैदानात

    आरसीबीने समोर ठेवलेल्या 139 धावांचा पाठलाग करण्यासाठी केकेआरचे फलंदाज मैदानात आले आहेत. सध्या सलामीवीर व्यंकटेश अय्यर आणि शुभमन गिल खेळत आहेत.

  • 11 Oct 2021 09:12 PM (IST)

    RCB vs KKR: आरसीबीची 138 धावांपर्यंत मजल

    केकेआरच्या बोलिंग अटॅकसमोर आरसीबी गारद पडली. कर्णधार कोहली (39) सोडता एकाही खेळाडूला खास कामगिरी करता न आल्याने संघ 138 धावांपर्यंतच मजल मारु शकला.

  • 11 Oct 2021 08:56 PM (IST)

    RCB vs KKR: नारायणने टीपली आणखी एक विकेट

    केकेआरचा दिग्गज खेळाडू सुनील नाराय़णने सामन्यातील चौैथी विकेट घेत ग्लेन मॅक्सवेलला 15 धावांवर तंबूत धाडलं आहे.

  • 11 Oct 2021 08:40 PM (IST)

    RCB vs KKR: एबी डिव्हीलियर्स तंबूत परत

    आरसीबीचा अनुभवी खेळाडू एबी डिव्हीलियर्स आज महत्त्वाच्या सामन्यात खास कामगिरी करु शकला नाही. अवघ्या 11 धावांवर नारायणने त्याला तंबूत धाडलं आहे.

  • 11 Oct 2021 08:31 PM (IST)

    RCB vs KKR: विराट कोहली आऊट!

    आज संघाला सांभाळत फलंदाजी करणारा कर्णधार विराट 39 धावांवर बाद झाला आहे. सुनील नारायणने कोहलीला त्रिफळाचित केलं आहे.

  • 11 Oct 2021 08:24 PM (IST)

    RCB vs KKR: केएस भरत स्वस्तात बाद

    मागील काही सामन्यात आरसीबीकडून उत्तम फलंदाजी करणारा केएस भरत आज खास कामगिरी करु शकला नाही. 9 धावांवर असताना सुनील नारायणच्या चेंडूवर व्यंकटेश अय्यरने त्याचा झेल घेतला आहे.

  • 11 Oct 2021 08:03 PM (IST)

    RCB vs KKR: देवदत्त पडीक्कल बाद

    आरसीबीचा सलामीवीर देवदत्त चांगल्या लयीत दिसत असताना केकेआरच्या लॉकी फर्ग्यूसनने त्याला बाद केलं आहे. देवदत्त 21 धावा करुन बाद झाला आहे.

  • 11 Oct 2021 07:37 PM (IST)

    RCB vs KKR: आरसीबीचे सलामीवीर मैदानात

    आरसीबी संघाने प्रथम फलंदाजी निवडली असल्याने सलामीवीर विराट कोहली देवदत्त पडीक्कलसोबत सलामीला उतरला आहे.

  • 11 Oct 2021 07:06 PM (IST)

    RCB vs KKR: विराटसेना प्रथम फलंदाजीला

    सामन्यात नाणेफेक जिंकत आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला आहे.

  • 11 Oct 2021 07:06 PM (IST)

    RCB अंतिम 11

    विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडीक्कल, केएस भारत, ग्लेन मॅक्सवेल, एबी डीव्हिलीयर्स, डॅनियल ख्रिस्टीयन, शाहबाज अहमद, जियॉर्जी गार्टन, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल.

  • 11 Oct 2021 07:05 PM (IST)

    KKR अंतिम 11

    इयॉन मॉर्गन (कर्णधार), शुभमन गिल, व्यंकटेश अय्यर, दिनेश कार्तिक, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, शाकिब अल् हसन, सुनील नारायण, लॉकी फर्ग्यूसन, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती.

Published On - Oct 11,2021 7:03 PM

Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.