ऋषभ पंत 241 लोकांकडून दर महिन्याला घेतो 399 रुपये! पण असं का ते जाणून घ्या
ऋषभ पंत टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर फलंदाज आहे. सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूपैकी एक आहे. आयपीएलमधील महागडा खेळाडू आहे. तसेच बीसीसीआय करारातूनही चांगली कमाई करतो. तसेच इतर सोर्सही आहेत.

भारताचा स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत दुखापतग्रस्त असून सध्या आराम करत आहे. त्याच्या पायाच्या बोटाला फ्रॅक्चर असल्याने त्याला सहा आठवडे आराम करण्यास सांगितलं आहे. आशिया कप स्पर्धेत दुखापतीमुळे खेळता येणार नाही. तसेच वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळणंही कठीण आहे. सध्या दुखापतग्रस्त असल्याने त्याची जागा भरून काढणही कठीण आहे. यावरून हा खेळाडू किती महत्त्वाचा आहे ते अधोरेखित होतं. आयपीएल मेगा लिलावात याची प्रचिती आली. सर्वाधिक पैसे मोजून लखनौ सुपर जायंट्स फ्रेंचायझीने त्याला संघात घेतलं. त्याच्या 27 कोटींची सर्वाधिक रक्कम मोजली. इतकंच काय तर बीसीसीआयकडून वर्षाकाठी कोट्यवधि रुपये करारातून मिळतात. त्यामुळे ऋषभ पंतवर पैशांचा वर्षाव होतो असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. असं सर्व असताना ऋषभ पंत दर महिन्याला काही लोकांकडून 399 रुपये घेतो, हे वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. पण असं का? त्या मागे नेमकं कारण काय? जाणून घ्या.
बीसीसीआयने आपल्या सेंट्रल काँट्रॅक्टमध्ये ऋषभ पंतला ए ग्रेडमध्ये ठेवलं आहे. त्याला वर्षाचे 5 कोटी रुपये मिळतात. इतकंच काय तर वर्षाला आंतरराष्ट्रीय सामने खेळतो त्या सामन्याची त्याला फी मिळते. एका कसोटीसाठी 15 लाख, वनडेसाठी 6 लाख आणि टी20 साठी 3 लाख मिळतात. आयपीएलमध्ये त्याला वर्षाला 27 कोटी रुपये मिळतात. त्याचबरोबर जाहिराती करतो ते वेगळं. पण त्याला 241 लोकांकडू प्रत्येक महिन्याला 399 रुपये मिळतात. इंस्टाग्रामच्या माध्यमातून त्याला पैसे मिळतात. 241 लोकं इंस्टाग्रामवर त्याचे फॉलोअर्स नाही तर सब्सक्राइबर्सही आहेत. या 241 लोकांसोबत ऋषभ पंत खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करतो. त्याचे हे व्हिडीओ 15 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्सला पाहता येत नाहीत.

ऋषभ पंत या स्पेशल सब्सस्क्राईबर्सच्या प्रश्नांची उत्तरंही देतो. त्याला कोणतेही प्रश्न विचारू शकतात. एक्सक्लुझिव्ह व्हिडीओच्या माध्यमातून उत्तरं देतो. पंत या माध्यमातून नेमके किती पैसे कमवतो हे मात्र सांगता येणार नाही. पण असं करणारा टीम इंडियाचा एकमेव खेळाडू आहे. दरम्यान इंग्लंड दौऱ्यातील चौथ्या कसोटी सामनयात त्याला दुखापत झाली होती. त्यामुळे पाचवा कसोटी सामना खेळू शकला नाही. त्याने इंग्लंड दौऱ्यात 479 धावा केल्या. आता वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी सामन्यात खेळेल की नाही याबाबत साशंकता आहे.
