AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“द्विशतक असो की झंझावाती फलंदाजी, रोहितच्या यशामागे सेहवागच”

भारतीय क्रिकेटमधील सर्वांत आक्रमक फलंदाज म्हणून वीरेंद्र सेहवागकडे पाहिलं जात. विरुने आपल्या कारकिर्दीत तुफान फटकेबाजीने सर्वांचीच मन जिंकली होती.

द्विशतक असो की झंझावाती फलंदाजी, रोहितच्या यशामागे सेहवागच
सक्लेन मुश्ताक
| Edited By: | Updated on: Jun 02, 2021 | 6:52 PM
Share

कराची : भारतातील सर्वांत स्फोटक फलंदाज म्हटलं तर सर्वांत पहिलं नाव येत ते म्हणजे ‘वीरेंद्र सेहवाग'(Virendra Sehwah). सेहवागने क्रिकेटच्या प्रत्येक प्रकारात आपल्या धडाकेबाज फलंदाजीनं सर्वांचीच मन जिंकली होती. दरम्यान सध्या खेळत असलेल्या एका खेळाडूने ही सेहवागच्याच पावलावर पाऊल ठेवलं आहे. असा दावा पाकिस्तानचे माजी फिरकीपटू सक्लेन सक्लेन यांनी केला आहे. तर हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून भारताचा सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) आहे. सक्लेन यांच्या मते रोहित सेहवागप्रमाणेच खेळल्याने सध्या एक अव्वल फलंदाज झाला आहे. (Rohit Sharma plays like Virendra Sehwag say Pakistan former spiner Saqlain Mushtaq)

सक्लेन आपल्या युट्यूब चॅनेलवर बोलताना म्हणाले, “रोहित शर्माचे रेकॉर्ड सेहवागच्या तुलनेत थोडे अधिक चांगले आहेत. पणे रोहित सेहवागच्या पदचिन्हांवर चालला. त्याच्याप्रमाणे आक्रमक खेळला. म्हणूनच हे सारे रेकॉर्ड करु शकला.”

रोहितच्या द्विशतकामागेही सेहवागच

सक्लेन एकदिवसीय क्रिकेटमध्ये ठोकण्यात आलेल्या द्विशतकांबद्दल बोलताना म्हणाले, ”सेहवागने भारतीय क्रिकेटसह जागतिक क्रिकेटमध्ये काही बेंचमार्क सेट केले. युवा खेळाडूंमध्ये आत्मविश्वास रुजवला. त्याने ठोकलेल्या द्विशतकांमुळेच रोहितसारख्या अनेकांना द्विशतक करणे शक्य आहे, याचा विश्वास निर्माण झाला. त्यामुळे रोहितच्या रेकॉर्ड आणि सर्वाधिक द्विशतकांमागे सेहवागच आहे.”

सेहवागची सर रिचर्डस यांच्याशी तुलना

सक्लेन  म्हणाले, ”सेहवागने स्वत:साठी खेळतानाच देशासाठी खेळणे ही तितकेच महत्त्वाचे समजले. ज्यामुळे येणाऱ्या फलंदाजाची मानसिकता त्याने बदलली. सेहवाग आधी वेस्ट इंडिज संघाचे दिग्गज क्रिकेटर सर विवियन रिचर्डसही (Sir Vivian Richards) अशी फलंदाजी करत. त्यांनी फलंदाजीतून जगावर राज्य केलं तसाच दबदबा सेहवागने देखील प्रस्थापित केला.”

हे ही वाचा :

टीम इंडियाला क्रिकेट विश्वचषक मिळवून दिला, आता 28 व्या वर्षीच भारताला बाय बाय, देशही सोडला

ICC Meeting : क्रिकेट इतिहासातील ‘ती’ मोठी स्पर्धा पुन्हा खेळवली जाणार, भारताला पाकिस्तानकडून बदला घेण्याची सुवर्णसंधी

दुबईत ठरलं…. 8 वर्षांत होणार 16 वर्ल्ड कप फायनल, प्रत्येक वर्षी भारत पाकिस्तान थरार!

(Rohit Sharma plays like Virendra Sehwag say Pakistan former spiner Saqlain Mushtaq)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.