AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Sharma : रोहितचा कसोटीतील निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटबाबत मोठा निर्णय, सोशल मीडिया पोस्ट व्हायरल

Rohit Sharma Odi Cricket : भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज आणि कर्णधार असलेल्या रोहित शर्मा याने 7 मे रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. तसेच रोहितने एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळण्याबाबत मोठा निर्णय घेतलाय.

Rohit Sharma : रोहितचा कसोटीतील निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटबाबत मोठा निर्णय, सोशल मीडिया पोस्ट व्हायरल
Team India Odi Captain Rohit SharmaImage Credit source: Rohit Sharma X Account
| Updated on: May 07, 2025 | 9:50 PM
Share

भारतीय नागरिक 7 मे 2025 ही तारीख कधीच विसरणार नाहीत. भारतीय सैन्याने बुधवारी मध्यरात्री पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवाद्यांच्या 9 तळांवर एअर स्ट्राईक करत पहलगाम हल्ल्याचा हिशोब बरोबर केला. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाचा कर्णधार आणि अनुभवी फलंदाज रोहित शर्मा याने आयपीएलच्या 18 व्या मोसमादरम्यान मोठा निर्णय घेतला. रोहितने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती जाहीर करत क्रिकेट चाहत्यांना झटका दिला. रोहितने टी 20 वर्ल्ड कप 2024 मधील विजयानंतर सर्वात छोट्या फॉर्मेटला अलविदा केला होता. रोहितने त्याच स्टाईलने आता कसोटी क्रिकेटला रामराम केला आहे. तसेच रोहितने एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळणार की नाही? याबाबतही सांगितलंय.

रोहितने इंस्टा स्टोरीद्वारे कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. रोहितने या पोस्टमधून मनातील भावना व्यक्त केली. तसेच रोहितने या पोस्टद्वारे आपला फ्यूचर प्लानही सांगितला. रोहितने इंस्टा स्टोरीतून एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळत राहणार असल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना रोहितला यापुढे फक्त आयपीएल आणि वनडेमध्येच खेळताना पाहता येणार आहे.

“भारताचं कसोटी क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व करणं हा माझा सन्मान आहे. तुमच्या समर्थन आणि प्रेमासाठी मी तुमच ऋणी आहे”, अशा शब्दात रोहितने त्याच्या चाहत्यांचे आभार मानले. तसेच रोहितने एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळत राहणार असल्याचं नमूद केलं. रोहितने सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली.

रोहितचा निवृत्तीचा झटका पॅटर्न

दरम्यान रोहितची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशापक्रारे तडकाफडतकी निवृत्ती घेण्याची ही दुसरी वेळ ठरली आहे. रोहितने याआधी काही महिन्यांपूर्वी टी 20 क्रिकेटमधून अशाच प्रकारे निवृत होत असल्याचं जाहीर केलं होतं. रोहितने टीम इंडियाला त्याच्या नेतृत्वात टी 20 वर्ल्ड कप जिंकून दिला होता. रोहितने त्या ऐतिहासिक विजयानंतर टी 20i क्रिकेटला अलविदा केला होता. तेव्हा विराट कोहली आणि रवींद्र जडेजा या दोघांनीही टी 20i क्रिकेट प्रकारातून निवृत्ती घेतली होती.

रोहितची सोशल मीडिया पोस्ट

रोहितची टेस्ट क्रिकेटमधील आकडेवारी

दरम्यान रोहितने कसोटी क्रिकेटमधील 67 सामन्यांमध्ये 4 हजार 301 धावा केल्या आहेत. रोहितने 40.57 च्या सरासरीने या धावा केल्या. रोहितने या दरम्यान 12 शतकं आणि 18 अर्धशतकं लगावली. तसेच रोहितने एकदा द्विशतकही झळकावलं होतं.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.