न्यूझीलंडचा दिग्गज खेळाडू रॉस टेलरची निवृत्तीची घोषणा, या मालिकेनंतर क्रिकेटला अलविदा करणार

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: अक्षय चोरगे

Updated on: Dec 30, 2021 | 12:37 PM

न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज रॉस टेलरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर एका ट्विट करुन ही माहिती दिली आहे.

न्यूझीलंडचा दिग्गज खेळाडू रॉस टेलरची निवृत्तीची घोषणा, या मालिकेनंतर क्रिकेटला अलविदा करणार
Ross Taylor

मुंबई : न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज रॉस टेलरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर एका ट्विट करुन ही माहिती दिली आहे. घरच्या मैदानावर बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर आणि त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड्सविरुद्धच्या सहा एकदिवसीय सामन्यांनंतर खेळातून निवृत्ती घेणार असल्याचे टेलरने म्हटले आहे. (Ross Taylor announces international retirement)

टेलरने न्यूझीलंडसाठी 110 कसोटी सामने खेळले असून त्यामध्ये 7584 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने आपल्या देशासाठी खेळलेल्या 233 एकदिवसीय सामन्यांमध्ये 10,288 धावा केल्या आहेत. त्याने कसोटीत 10 शतके आणि 35 अर्धशतके झळकावली आहेत तर एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 21 शतके आणि 51 अर्धशतके लगावली आहेत.

न्यूझीलंडचं आगामी वेळापत्रक

न्यूझीलंड 1 जानेवारीपासून घरच्या मैदानावर बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. दुसरा कसोटी सामना 9 जानेवारीपासून सुरू होणार आहे. टेलरची ही शेवटची कसोटी असेल. जानेवारीच्या अखेरीस, ते तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा करतील आणि त्यानंतर मायदेशात नेदरलँड्सविरुद्ध खेळतील.

काय म्हणाला टेलर?

टेलरने ट्विट केले आहे की, “मी आज जाहीर करतो की मी बांगलादेशविरुद्ध मायदेशात 2 कसोटी सामने, ऑस्ट्रेलिया, नेदरलँड्स विरुद्ध 6 एकदिवसीय सामन्यांनंतर माझ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. 17 वर्षांच्या शानदार क्रिकेटबद्दल धन्यवाद. माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करणे ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे.”

वेस्ट इंडिजविरुद्ध पदार्पण

टेलर हा न्यूझीलंडसाठी कसोटीत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याच्या मागे सध्याचा कर्णधार केन विल्यमसन आहे. कसोटी व्यतिरिक्त, टेलर एकदिवसीय सामन्यांमध्ये संघासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. वनडेमधली त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 181 आहे तर कसोटीत त्याची सर्वोच्च धावसंख्या 290 आहे. पर्थमध्ये त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ही खेळी केली होती. त्याने कसोटीत तीन द्विशतके झळकावली आहेत. टेलरने मार्च 2006 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. एका वर्षानंतर, तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला.

शानदार प्रवास

टेलरने न्यूझीलंड क्रिकेटने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “हा एक अद्भुत प्रवास होता. जोपर्यंत मी माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करू शकेन, तोपर्यंत मी स्वत:ला भाग्यवान समजतो. गेल्या 17 वर्षात मी खेळातील महान व्यक्तींसोबत आणि त्यांच्याविरुद्ध खेळलो. या काळात अनेक आठवणी मिळाल्या, खूप चांगले मित्र मिळाले, हा प्रवास अद्भूत होता. परंतु सर्व चांगल्या गोष्टींचा अंत होतो आणि मला वाटते की ही वेळ योग्य आहे. मी माझे कुटुंब, मित्र आणि सर्व लोकांचे आभार मानू इच्छितो ज्यांनी मला मी जिथे आहे तिथे पोहोचण्यास मदत केली.”

टेलर म्हणाला, “सर्वांचे आभार मानणे आणि कारणं सांगण्यासाठी भरपूर वेळ आहे. पण सध्या मला न्यूझीलंडसाठी तयारी आणि चांगली कामगिरी करण्यावर लक्ष केंद्रित करायचे आहे.”

इतर बातम्या

Ranji Trophy: मुंबईच्या रणजी संघात अर्जुन तेंडुलकर, पृथ्वी शॉ कर्णधार

Virat Kohli : एकच चूक वारंवार करून Out होतोय विराट कोहली, सोशल मीडियावर Troll

IND VS SA: विराटाच्या शॉट सिलेक्शनवर गावस्करांनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, म्हणाले….

(Ross Taylor announces international retirement)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI