AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आरसीबीने तीन महिन्यानंतर ‘त्या’ घटनेवर मौन सोडलं, अखेर मनातलं सगळं काही आलं बाहेर

आरसीबीने 17 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर 18 व्या पर्वात जेतेपदावर नाव कोरलं. पण जेतेपदाच्या दुसऱ्या दिवशी होत्याचं नव्हतं झालं. विजयी जल्लोष कार्यक्रमात अनर्थ घडला आणि क्रीडाप्रेमींना जीव गमवावा लागला. आता यावर तीन महिन्यांनी आरसीबीने मौन सोडलं आहे.

आरसीबीने तीन महिन्यानंतर 'त्या' घटनेवर मौन सोडलं, अखेर मनातलं सगळं काही आलं बाहेर
आरसीबीने तीन महिन्यानंतर 'त्या' घटनेवर मौन सोडलं, अखेर मनातलं सगळं काही आलं बाहेरImage Credit source: PTI
| Updated on: Aug 28, 2025 | 6:41 PM
Share

आयपीएल 2025 स्पर्धेत गेल्या अनेक वर्षांपासूनचं जेतेपदाचं स्वप्न अखेर पूर्ण झालं. त्यामुळे इतक्या वर्षानंतर आनंदाला उधाण आलं होतं. चाहतेही आपल्या संघाच्या विजयाच्या जल्लोष भारावून गेले होते. 3 जून रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पंजाब किंग्सला पराभूत केलं आणि जेतेपदावर नाव कोरलं. पण दुसर्‍या दिवशी या आनंदावर विरजन पडलं. कारण 4 जूनच्या विजयी परेडमध्ये चेंगराचेंगरी झाली आणि 11 लोकांना जीव गमवावा लागला. तर 50 हून अधिक जण जखमी झाले. या प्रकरणी गेल्या तीन महिन्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत होत्या. पण आरसीबी फ्रेंचायझीने मौन बाळगलं होतं. कोर्टाने देखील या प्रकरणी आपलं निरीक्षण नोंदवलं आहे. असं असताना तीन महिन्यानंतर आरसीबीने भावनिक पोस्ट केली आहे. यात त्यांनी लिहिलं की, 3 जूनला आम्ही खूप खुश होतो, पण 4 जूनमुळे सगळं काही बदललं. विजयानंतर आरसीबीचा संघ 4 जूनला बंगळुरु शहरात परतला होता. यावेळी एम चिन्नस्वामी स्टेडियममध्ये विजयी परेडचं आयोजन केलं होतं. पण रेकॉर्डब्रेक गर्दी झाली आणि चेंगराचेंगरी झाली.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने सोशल मिडिया पोस्टमध्ये लिहिलं की, ‘आमचं शांत असणं दु:ख होतं. ही जागा कधी एनर्जी, आठवणी आणि त्या आनंददायी क्षणांनी भरलेली होती. त्याचा तुम्ही सर्वात जास्त आनंद घेतला. पण 4 जूनच्या प्रकरणामुळे सर्व काही बदललं. त्या दिवसानंतर शांततेने आपली जागा बनवली होती. या शांततेत आम्ही शोक करत होतो. ऐकत होतो आणि शिकत होतो. हळूहळी आम्ही एका प्रतिक्रियेपेक्षा काहीतरी बनू लागलो. आता ती अशी गोष्ट आहे ज्यावर आम्ही खरोखर विश्वास ठेवतो. ‘

‘आरसीबी केअर्स अस्तित्वात आले. त्याचा जन्म आदर देण्याबरोबरच उपचार करण्याच्या आणि आमच्या चाहत्यांसह उभे राहण्याच्या उद्देशाने झाला. आम्ही आता आमच्या चाहत्यांसह उत्सव साजरा करण्याऐवजी काळजी घेऊन पुढे जात आहोत.आरसीबी केअर्स कर्नाटकचा अभिमान बनणार आहे आणि आम्ही नेहमीच असेच करत राहू.’, असंही आरसीबीने पुढे लिहिलं आहे. या अजून डिटेल्स लवकरच देऊ असं सांगितलं आहे. दरम्यान, 4 जूनच्या चेंगराचेंगरीनंतर आरसीबीने प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपयांची मदत केली आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.