IND vs SA : तिसऱ्या सामन्यात पावसाची किती शक्यता? खेळ होणार की नाही?

IND vs SA 3rd T20 Weather Report: टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा टी 20i सामना हा सेंच्युरियन येथे होणार आहे. दोन्ही संघ या 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरीत आहेत.

IND vs SA : तिसऱ्या सामन्यात पावसाची किती शक्यता? खेळ होणार की नाही?
Centurion
Follow us
| Updated on: Nov 12, 2024 | 10:04 PM

भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी 20i मालिकेतील तिसरा सामना खेळण्यासाठी सज्ज आहे. उभयसंघातील तिसरा सामना हा बुधवारी 13 नोव्हेंबरला सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट्स पार्क येथे होणार आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. ही 5 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे तिसरा सामना जिंकून दोन्ही संघांकडे मालिकेत आघाडी घेण्याची संधी आहे. दोन्ही संघांचा हा सेंच्युरियनमधील दुसरा टी 20i सामना असणार आहे.

सामन्यात पाऊस खोडा घालणार?

एक्युवेदरच्या रिपोर्टनुसार, 13 नोव्हेंबरला सेंच्युरियनमध्ये पाऊस होण्याची 8 टक्के शक्यता आहे. तसंच संध्याकाळी आकाश निरभ्र असून मुसळधार पावसाची कोणतीही शक्यता नाही. सेंच्युरियनमध्ये संध्याकाळी 5 ते रात्री 11 दरम्यान पावसाची शक्यता नाही. त्यामुळे सामना निर्विघ्नपणे पार पडण्याची आशा आहे.

टीम इंडियाच वरचढ

दरम्यान आतापर्यंत उभयसंघात एकूण 29 टी 20i सामने झाले आहेत. भारताने दक्षिण आफ्रिकेला 16 सामन्यांमध्ये पराभूत केलं आहे. तर दक्षिण आफ्रिकेने 12 वेळा पलटवार केला आहे. त्यामुळे आता तिसऱ्या सामन्यात दोघांपैकी कोण आघाडी घेतं? याकडे साऱ्याचं लक्ष असेल.

भारताचा 6 वर्षांआधी पराभव

दरम्यान 6 वर्षांआधी उभयसंघात 2018 साली टी 20i सामना खेळवण्यात आला होता. तेव्हा भारताला पराभूत व्हावं लागलं होतं. तेव्हा दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियावर 6 विकेट्सने विजय मिळवला होता. तेव्हा हेन्रिक क्लासेन याने 69 धावांची खेळी करत विजय मिळवून देण्यात निर्णायक भूमिका बजावली होती.

दक्षिण आफ्रिके विरूद्धच्या टी 20i मालिकेसाठी टीम इंडिया : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंग, तिलक वर्मा, जितेश शर्मा (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रमनदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजयकुमार वैशाख, अवेश खान आणि यश दयाल.

T20I सीरिजसाठी दक्षिण आफ्रिका टीम : एडन मार्करम (कॅप्टन), ओटनील बार्टमन, गेराल्ड कोएत्झी, डोनोव्हन फरेरा, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅन्सन, हेनरिक क्लासेन, पॅट्रिक क्रुगर, केशव महाराज, डेव्हिड मिलर, मिहलाली मपोंगवाना, न्काबा पीटर, रायन सिमलेटन, रायन रिकेल लुथो सिपमला (तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यासाठी) आणि ट्रिस्टन स्टब्स.

आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?.
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?.
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट.
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी.
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं.
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली.
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?.
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण.